Sunday, 28 February 2016



“वाघगर्जना”'


(माझा आजचा लेख-:)

मिशन ठाणे महानगरपालिका..!

“माझे ठाणे-खणखणीत नाणे”

आगामी २०१७ साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीसोबत ठाणे महानगरपालिका निवडणुकही आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून ते आजतागायत ठाण्यावर शिवसेनेचा भगवा अभिमानाने,स्वाभिमानाने,डौलाने तेजाने आणि दिमाखात फडकत आहे.शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेनेला सर्वप्रथम ठाणे महानगर पालिकेचीच सत्ता मिळाली,शिवसेनेचा पहिला महापौर ठाण्याचाच.त्यामुळे ठाणे हे शिवसेनाप्रमुखांच आवडत शहर होते.आजही ठाण्यावर शिवसेनेचीच सत्ता आहे.या समिकरणांमुळे “शिवसेनेचे ठाणे-ठाण्याची शिवसेना” असे नाते आजवर कायम राहिलेले आहे.ते यापुढेही कायम राहील हे सुनिश्चित आहे.

ठाण्यावर सुरुवातीपासूनच शिवसेनेची सत्ता असल्यामुळे आजवर ठाण्यात झालेल्या लोकोपयोगी विकासकामांचे श्रेय आपसूकच शिवसेनेला जाते.याच विकासकामांच्या बळावर ठाणेकरांनी नेहमीच शिवसेनेवर विश्वास ठेवलेला आहे.शिवसेनेही तो नेहमीच सार्थ ठरवला आहे.आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ठाणेकरांचा शिवसेनेवरील असलेला विश्वास वृद्धिंगत व्हावा आणि विकास आणि विश्वासाचं हे नात अधिक दृढ व्हाव आणि ठाण्यावर शिवसेनेची एकहाती सत्ता यावी यासाठी शिवसैनिकांनी आणि ठाणेकरांनी लढण्याची गरज आहे.

मुंबई महानगरपालिकेसोबतच विरोधकांना सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाण्याची सत्ता मिळवण्याचे दिवास्वप्न नेहमीच पडत असते.ठाणेकरांच्या कृपाआशीर्वादाने ते नेहमीच धुळीस मिळत असते आणि जनता ठाण्याची ठाणेदारी शिवसेनेकडेच सोपवत असते.हीच परंपरा आगामी निवडणुकीतही टिकवायची आहे.फरक एवढाच की यंदा शिवसेनेची केवळ एकहाती नव्हे तर “शत-प्रतिशत” सत्ता आणायची आहे.शिवसेनेने ठाण्याच्या विकासासाठी नेहमीच कार्यतत्परता दर्शवली आहे.आज ठाणे शहर राज्यातील एक मोठे आणि विकसित शहर म्हणून नावारूपाला आले आहे.ठाण्यात वाहत असलेल्या विकासगंगेने ठाण्याला स्वच्छ,सुंदर आणि विकसित केले आहे.त्यामुळेच “माझे ठाणे-खणखणीत नाणे” अशी अभिमानास्पद भावना आज प्रत्येक ठाणेकरांच्या मनात आहे.हेच नाते आगामी निवडणुकीत अधिक आत्मीयतेने पुढे येईल यात तिळमात्र शंका नाही.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीप्रमाणेच ठाणे महानगरपालिका निवडणुकीतही शिवसेनेला विरोधकांचा सामना करायचा आहे.त्यात घरच्या-दारच्या विरोधकांचा आणि मधल्या मित्रवर्यांचाही समावेश असू शकतो.आज मित्र म्हणून सोबत असलेलेच उद्या विरोधक म्हणून उभे राहून शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करतील.ठाणेकरांनी सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाप्रमाणे समोर कोण आहे याचा विचार न करता धनुष्यातून बाण सोडावा आणि विरोधकांना नेस्तनाभूत करून शिवसेनेला विजयी करावे.शिवसेना नेहमीप्रमाणे जनतेचा विश्वास सार्थ ठरवेल.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला केवळ बहुमत नव्हे तर सर्वच जागांवर विजय मिळवून देण्याचे पवित्र कार्य शिवसैनिक आणि ठाणेकरांनी हाती घ्यावे.विरोधकांची पर्वा न करता,अपप्रचाराला बळी न पडता,कोणत्याही प्रलोभनांना न भूलता आणि कोणतेही गाजर पाहून खुश न होता ठाणेकरांनी आजवरची परंपरा कायम ठेऊन शिवसेनेलाच साथ द्यावी आणि शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि विरोधकांना कायमचे घरी बसवावे.हे प्रत्यक्षात येण्यासाठी अपार मेहनत लागेल हे सत्य आहे पण हे घडल्यास ठाणे शहराच्या विकासाचा आलेख अधिक उंचावेल आणि प्रगतीचा बाण सुसाट वेगाने भविष्याचा वेध घेईल.त्यासाठी शिवसैनिक आणि ठाणेकरांनी “मिशन ठाणे महानगरपालिका” हे एकच लक्ष डोळ्यांसमोर ठेवावे आणि कामाला लागावे.विजय आपलाच आहे.

जय महाराष्ट्र..!



Saturday, 27 February 2016








“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

मिशन बृहन्मुंबई महापालिका..!

आपली मुंबई आपली शिवसेना..!

आज २७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी दिन.या सुदिनी माय मराठीचे गोडवे गात असतानाच माय मराठीची अस्मिता जागी ठेवली पाहिजे याची जाणीव प्रत्येक मराठी मनाला झाली पाहिजे.मुंबई,महाराष्ट्र आणि मराठी हे नातंही अतूट आहे ते अतुटच राहील याची जबाबदारी आपण घ्यायला हवी.गेल्या १७ फेब्रुवारीला शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेच्या विजयाला ४ वर्षे पूर्ण झाली.पुढील वर्षी साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे.या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून फडकत असलेला शिवसेनेचा भगवा पुन्हा मोठ्या डौलाने,अभिमानाने आणि स्वाभिमानाने फडकावत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे.आज मराठी दिनाचे औचित्य साधून मराठी माणसाने हे पवित्र कार्य हाती घ्यायला हवे.

मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसाने आणि शिवसेनेने लढा दिलेला आहे.त्यानंतर शिवसेनेने मुंबई महानगरपालिका अनेक वर्षे सांभाळून मुंबईचा विकास केलेला आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका,हिंदुस्थाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराची महानगरपालिका अशी बिरुदावली लाभलेल्या मुंबई महानगरपालिकेवर कब्जा करण्याचे स्वप्न प्रत्येक पक्षाला पडते,मराठी मुंबईकर जनतेच्या कृपाआशीर्वादाने शिवसेनेने विरोधकांचे हे स्वप्न कित्येकदा धुळीस मिळवले आहे.महाराष्ट्राची राजधानी असलेल्या या मुंबई महानगरपालिकेवर फक्त आणि फक्त शिवसेनेचीच सत्ता कायम राहिली तर आणि तरच मुंबई महाराष्ट्रात राहील आणि मुंबईत मराठी माणूस राहील.त्यामुळे सध्या मुंबईवर शिवसेनेची सत्ता आहेच,आगामी निवडणुकीत शिवसेनेची एकाहाती सत्ता यायला हवी यासाठी शिवसैनिकांनी आणि मराठी जनतेने जीवाचे रान करायला हवे.

शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता हवी आहे ती केवळ मुंबई,महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठीच.शिवसेनेने केवळ मुंबई महापालिकेवर सत्ता असताना अनेक विकासकामे करून दाखवली आहेत.सध्या शिवसेना केंद्रात आणि राज्यातही सत्तेत सहभागी आहे.२०१७ साली जेव्हा शिवसेनेचा भगवा मुंबईवर डौलान फडकेल आणि शिवसेनेची एकहाती सत्ता मुंबई महानगरपालिकेवर येईल तेंव्हा शिवसेना काय करून दाखवू शकते याचा अंदाज शिवसेनेने मुंबईत केलेल्या विकासकामांवरून बांधता येईल.सध्या मुंबईवर शिवसेनेचीच सत्ता आहे.शिवसेनेने जनतेसाठी अनेक कामे केली आहेत.त्याच विकासकामांच्या बळावर मुंबईवर शिवसेनेची सत्ता कायम राहणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे,मात्र ती एकहाती सत्ता असावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.तसे होणे ही आज महाराष्ट्राचीच नव्हे तर हिंदुस्थानची गरज आहे.

इतर काही राज्यांची उदाहरणे पाहिल्यास त्या त्या राज्यांच्या प्रादेशिक पक्षांकडेच राज्याची आणि राज्यातील प्रमुख शहरांची सत्ता आहे.इतकेच नव्हे तर विरोधी पक्षही प्रादेशिकच आहेत.याच गोष्टीमुळे त्या राज्यांची राज्यभाषा आणि प्रादेशिक अस्मिता जपली गेली आहे.प्रादेशिक अस्मिता हाच त्या राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा प्रमुख अजेंडा असल्याने त्या राज्यांची संकृतीही कायम राहिली आहे.महाराष्ट्रातही असे घडल्यास निश्चितच मराठी माणसाच्या मराठी अस्मितेचा गजर हिंदुस्थानात घुमेल.शिवसेनेसाठी हिंदुत्व आणि मराठी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.मराठी तर शिवसेनेचा पाया आहे.शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसाच्या न्याय,हक्क आणि सेवेसाठी झाली आहे.सत्ता असल्यास समाजकार्यासाठी ती उपयुक्त ठरते यासाठी शिवसेना निवडणुका लढवते,सत्तेच्या खुर्च्यांसाठी नाही.त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचीच सत्ता यायला हवी.आज मराठी दिनाचे औचित्य साधून शिवसैनिकांनी “मिशन बृहन्मुंबई महापालिका” सुरु करायला हवे.

शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याने देशद्रोही,देशविघातक वृत्तीवर आळा बसेल.हिंदुस्थान आणि महाराष्ट्राच्या गद्दारांवर,खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्या देशद्रोह्यांवर वचक ठेवायचा असेल तर शिवसेनाच सत्तेवर हवी.अन्यथा आज जे जेएनयुमध्ये घडत आहे तेच उद्या मुंबई विद्यापीठात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे “आपली मुंबई–आपली शिवसेना” या भावनेने मराठी माणसांनी आणि शिवसैनिकांनी पुढील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवून देण्यासाठी कामाला लागावे.मराठी माणसाने ठरवल तर काय अवघड आहे?

जय महाराष्ट्र..!

Saturday, 20 February 2016








“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

शिवरायांची गुणवैशिष्ट्ये..!

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न..!

कालच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती साजरी झाली.अवघ्या जगात अनेक ठिकाणी जोशात आणि जल्लोषात,विविध स्वरुपात शिवजयंती साजरी केली गेली.“छत्रपती शिवाजी महाराज” हे नाव तमाम हिंदू-मराठी जनतेच्या हृदयावर कोरलेले आहे.त्याचप्रमाणे शिवरायांचे विचार आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये आत्मसात केल्यास महाराष्ट्र आणि हिंदुस्थानच्या जडणघडणीत त्याचे मोलाचे योगदान ठरू शकते.शिवरायांच्या वाटेवरून चालणे तस पाहिलं तर साध सोपं काम नाही,मात्र प्रत्येकाने त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा परिणाम म्हणून प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल आणि यशाची शिखरे गाठणे प्रत्येकालाच सहज शक्य होईल.

शिवराय दूरदृष्टी असलेला महान राजा म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या दूरदृष्टीची प्रचीती देणाऱ्या अनेक घटना त्यांच्या इतिहासात आढळतील.एखाद्या घटकाचा जर विकास करायचा असेल तर त्या घटकासंबंधित भविष्यातील संभाव्य बदलांचा वेध घेणे अत्यावश्यक ठरते.आजवर ज्यांनी शिवरायांचा हा गुण आत्मसात केला ते जीवनात यशस्वी झाले आणि यशाच्या शिखरावर विराजमान झाले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे याचेच एक ज्वलंत उदाहरण आहेत.बाळासाहेब हे दूरदृष्टी असलेले नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांनी संभाव्य लोकसंख्या वाढ आणि परिणामी होऊ शकणारी वाहनसंख्येतील वाढ याची दूरदृष्टी बाळगून मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याचे मागील युती सरकारमधील मंत्र्यांना आदेश दिले होते.त्याप्रमाणे आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे,जो मागील युती सरकारच्या काळात बांधला गेला त्याचे आजच्या दळणवळणातील महत्व अनन्यसाधारण आहे हे सर्वच जाणतात.शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा रस्त्यांची पदरे वाढवण्याचा विचार बोलून दाखवला होता तो किती महत्वाचा होता हे आज दिल्लीतील “ऑड-ईव्हन” फॉर्म्युला आणि आणि मुंबईत नवी वाहने न विकण्याचा प्रस्ताव पाहता सहज लक्षात येईल.

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक हे ही शिवसेनाप्रमुखांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे.या सागरी सेतूमुळे मुंबईची वाहतूक अधिकच वेगवान झाली आहे.दुर्दैवाने युती सरकारचा कालावधी संपल्याने दुसरा प्रस्तावित सागरी सेतू रखडला.असे असले तरीही मागील युईत सरकारच्या काळात बांधल्या गेलेल्या दर्जेदार रस्ते व पुलांमुळे आज वाहतूक नियंत्रित आणि गतिमान आहे असे म्हणता येईल.सध्या योगायोगाने युती सरकारच सत्तेवर आहे.या सरकारनेही अशीच कामगिरी केल्यास भविष्यात वाहतूक नियंत्रित आणि गतिमान राहील.

महाराष्ट्रात सध्या प्रचंड मोठा दुष्काळ पडला आहे.येत्या उन्हाळ्यात तर महाराष्ट्रात पाणीबाणी येणार हे निश्चित आहे.सध्या हि स्थिती टाळता येणे शक्य नसले तरीही भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून कायमची उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी शिवरायांच्या पाणीव्यवस्थेचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.शिवरायांची पाणीव्यवस्था आजही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळते.आजही महाराष्ट्रातील उंच डोंगरमाथ्यांवरील गडकिल्ल्यांवरही बाराही महिने पाणीसाठे भरलेले पाहायला मिळतात.यावरूनच शिवरायांच्या उत्तम नियोजन कौशल्याची प्रचीती येते.हेच कौशल्य अभ्यासून आपण त्यादृष्टीने कार्य केल्यास आगामी २५ वर्षांत महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त होऊ शकतो.दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर आज महाराष्ट्राला शिवरायांच्या विचारांनी चालणाऱ्या राज्यकर्त्यांची गरज आहे.

शिवरायांचे गुण अंगीकारल्यास सध्या देशासमोर असलेल्या अनेक प्रश्नावर कायमचा तोडगा निघू शकतो.त्यामुळे शिवरायांची जयंती साजरी करतानाच त्यांचे गुण आत्मसात केल्यास देशाचे आणि राज्याचे भविष्य उज्ज्वल होईल.




जय महाराष्ट्र..!

Friday, 12 February 2016






“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

कोलकात्याचा काळाकुत्रा..!

बॉम्बे नाही मुंबईच..!

ब्रिटनमधील “द इंडिपेंडंट” या वर्तमानपत्राच्या संपादकास अचानक मुंबईला बॉम्बे म्हणण्याची उचकी लागली.आम्हाला ही बातमी समजली तेंव्हा ब्रिटीश वर्तमानपत्र आहे म्हणजे एखाद्या ब्रिटीश अधिकाऱ्याला मस्ती आली असावी असे आम्हाला वाटले.आमची मुंबई,आम्ही रक्त सांडून मिळवली आणि त्या मुंबापुरीस बॉम्बेच लेबल पुन्हा लावणारा हा कोण मस्तवाल ? या विचाराने आमच्या अंगातील मराठी रक्त सळसळले.पूर्ण बातमी पाहिली तेंव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यास नव्हे तर कोलकात्याच्या काळ्याकुत्र्यास माज आला असल्याचे समजले.आपल्या वर्तमानपत्रात यापुढे मुंबईचा उल्लेख बॉम्बे असाच केला जाईल हा निर्णय जाहीर करणारा संपादक कोलकात्यात जन्मलेला आणि ब्रिटनमध्ये वाढलेला बाटगा हिंदुस्थानी निघाला.हिंदुस्थानचे दुर्दैव हेच की या पवित्र मातीत हा बाटगा जन्मला ज्याने आपल्याच मातृभूमीच्या आर्थिक राजधानीवर टांग वर करण्याचा प्रयत्न केला.

“द इंडिपेंडंट या इंग्लिश वृत्तपत्राचा संपादक असलेल्या अमोल राजन नामक कोलकात्याच्या काळ्याकुत्र्याने संकुचित विचार करणाऱ्या हिंदू राष्ट्रवाद्यांच्या विरोधात मुंबईला बॉम्बे म्हणण्याचे पाउल उचलण्याचा निर्णय जाहीर केला.इतकेच नव्हे तर जगासाठी या शहराचे दरवाजे उघडे असल्याच जाहीर केल.अरे तू कोण? तुझी औकात काय? ब्रिटनमध्ये बसून मुंबईचे दरवाजे काय उघडतोस? सगळा अक्कलशून्य लोकांचा कारभार आहे.बॉम्बेची ओळख ही एक खुल शहर आणि हिंदुस्थानच प्रवेशद्वार अशी आहे,ज्याचे दरवाजे संपूर्ण जगासाठी उघडे आहेत.जर तुम्ही त्या शहराचा उल्लेख मुंबई असा केलात तर ते हिंदू राष्ट्रवाद्यांच्या हिताचचं आहे अस म्हणत या बाटग्याने आपली अक्कल पाजळली.

मुंबईला मुंबई नाव देणे आणि हिंदू राष्ट्रवादाचा काय संबंध आहे? मुंबईला मुंबई नाव देणे हा मराठी अस्मितेचा प्रश्न आहे.त्यासाठी शिवसेना लढली आहे.मुंबई नाव हे मुंबादेवीच्या नावावरून ठेवण्यात आल असून कायदेशीर होऊनही आज २० वर्षे झाली आहेत.बर,यात शिवसेनेचा स्वार्थ तो काय होता? ब्रिटिशांनी दिलेले नाव बदलून आपल्या राज्याच्या राजधानीला आणि हिंदुस्थानच्या आर्थिक राजधानीला मुंबई नाव देण्यात गैर ते काय आहे? मुळात महाराष्ट्राला मुंबई आणि मुंबईतील मराठी माणसाला मान मिळवून देण्याच काम शिवसेनेने केल आहे.हा सर्वमान्य इतिहास आहे.अस असताना पुन्हा हा विषय उकरून काढून राजनला काय सध्या करायचे आहे? ब्रिटनमध्ये बसून अशी वक्तव्ये करून हिंदुस्थानात कलह निर्माण करण्यात कोणते देशकार्य आहे?

राजनने पुढे असेही सांगितले की “एका पत्रकार आणि वृत्तपत्राच एडिटिंगकरणारा त्याच्या शब्दावलीबाबत स्पष्ट असावा.मी हिंदुस्थानचा तोच वारसा आत्मसात करेन जो जगासाठी खुला आहे,ना की सत्तेत असलेल्या संकुचित विचारधारा असलेल्या पक्षाचा”.अरे पण मुंबईला मुंबई म्हणण्यात संकुचित विचारधारा कसली आली? मग याच न्यायाने कोलकाता आणि चेन्नई या दोन शहरांच्या नामांतराबद्दल राजनची काय भूमिका आहे? त्याबद्दल तो कधी बोलणार? स्वातंत्र्यानंतर मुघलांनी,इंग्रजांनी दिलेली नावे बदलून शहरांना हिंदुस्थानी संस्कृतीप्रमाणे नावे देण्यात हरकत काय आहे? जर असेल तर मग कसल स्वातंत्र्य? आणि आम्ही कोण ते ठरवणारा हा कोण दीड दमडीचा पत्रकार?

मुंबईला बॉम्बे करण्याचे कपटकारस्थान करू नका.क्खा महाराष्ट्र आणि मराठी माणूस पेटून उठेल.ज्यांना देशात राहायचं नाही त्यांनी बाहेर जाऊन हिंदुस्थानी जनतेला अक्कल शिकवू नये.हिंदुस्थानात काय व्हावे काय होऊ नये ते ठरवण्यास हिंदुस्थानी समर्थ आहेत.मुंबईला बॉम्बे करायची एवढी खुमखुमी आली असेलच महाराष्ट्रात येऊन हे बोलून दाखवा.बॉम्बे नाही मुंबईच हे व्यवस्थित,मायेने समजावून सांगू.

जय महाराष्ट्र..!