(माझा आजचा लेख-:)
शिवरायांची गुणवैशिष्ट्ये..!
दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न..!
कालच हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती साजरी झाली.अवघ्या जगात अनेक ठिकाणी जोशात आणि जल्लोषात,विविध स्वरुपात शिवजयंती साजरी केली गेली.“छत्रपती शिवाजी महाराज” हे नाव तमाम हिंदू-मराठी जनतेच्या हृदयावर कोरलेले आहे.त्याचप्रमाणे शिवरायांचे विचार आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये आत्मसात केल्यास महाराष्ट्र आणि हिंदुस्थानच्या जडणघडणीत त्याचे मोलाचे योगदान ठरू शकते.शिवरायांच्या वाटेवरून चालणे तस पाहिलं तर साध सोपं काम नाही,मात्र प्रत्येकाने त्यांचे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा परिणाम म्हणून प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल आणि यशाची शिखरे गाठणे प्रत्येकालाच सहज शक्य होईल.
शिवराय दूरदृष्टी असलेला महान राजा म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या दूरदृष्टीची प्रचीती देणाऱ्या अनेक घटना त्यांच्या इतिहासात आढळतील.एखाद्या घटकाचा जर विकास करायचा असेल तर त्या घटकासंबंधित भविष्यातील संभाव्य बदलांचा वेध घेणे अत्यावश्यक ठरते.आजवर ज्यांनी शिवरायांचा हा गुण आत्मसात केला ते जीवनात यशस्वी झाले आणि यशाच्या शिखरावर विराजमान झाले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे याचेच एक ज्वलंत उदाहरण आहेत.बाळासाहेब हे दूरदृष्टी असलेले नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांनी संभाव्य लोकसंख्या वाढ आणि परिणामी होऊ शकणारी वाहनसंख्येतील वाढ याची दूरदृष्टी बाळगून मोठ्या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरण करण्याचे मागील युती सरकारमधील मंत्र्यांना आदेश दिले होते.त्याप्रमाणे आज मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे,जो मागील युती सरकारच्या काळात बांधला गेला त्याचे आजच्या दळणवळणातील महत्व अनन्यसाधारण आहे हे सर्वच जाणतात.शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा रस्त्यांची पदरे वाढवण्याचा विचार बोलून दाखवला होता तो किती महत्वाचा होता हे आज दिल्लीतील “ऑड-ईव्हन” फॉर्म्युला आणि आणि मुंबईत नवी वाहने न विकण्याचा प्रस्ताव पाहता सहज लक्षात येईल.
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंक हे ही शिवसेनाप्रमुखांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे.या सागरी सेतूमुळे मुंबईची वाहतूक अधिकच वेगवान झाली आहे.दुर्दैवाने युती सरकारचा कालावधी संपल्याने दुसरा प्रस्तावित सागरी सेतू रखडला.असे असले तरीही मागील युईत सरकारच्या काळात बांधल्या गेलेल्या दर्जेदार रस्ते व पुलांमुळे आज वाहतूक नियंत्रित आणि गतिमान आहे असे म्हणता येईल.सध्या योगायोगाने युती सरकारच सत्तेवर आहे.या सरकारनेही अशीच कामगिरी केल्यास भविष्यात वाहतूक नियंत्रित आणि गतिमान राहील.
महाराष्ट्रात सध्या प्रचंड मोठा दुष्काळ पडला आहे.येत्या उन्हाळ्यात तर महाराष्ट्रात पाणीबाणी येणार हे निश्चित आहे.सध्या हि स्थिती टाळता येणे शक्य नसले तरीही भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून कायमची उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी शिवरायांच्या पाणीव्यवस्थेचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.शिवरायांची पाणीव्यवस्था आजही सुस्थितीत असल्याचे पाहायला मिळते.आजही महाराष्ट्रातील उंच डोंगरमाथ्यांवरील गडकिल्ल्यांवरही बाराही महिने पाणीसाठे भरलेले पाहायला मिळतात.यावरूनच शिवरायांच्या उत्तम नियोजन कौशल्याची प्रचीती येते.हेच कौशल्य अभ्यासून आपण त्यादृष्टीने कार्य केल्यास आगामी २५ वर्षांत महाराष्ट्र कायमचा दुष्काळमुक्त होऊ शकतो.दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न सत्यात उतरवायचे असेल तर आज महाराष्ट्राला शिवरायांच्या विचारांनी चालणाऱ्या राज्यकर्त्यांची गरज आहे.
शिवरायांचे गुण अंगीकारल्यास सध्या देशासमोर असलेल्या अनेक प्रश्नावर कायमचा तोडगा निघू शकतो.त्यामुळे शिवरायांची जयंती साजरी करतानाच त्यांचे गुण आत्मसात केल्यास देशाचे आणि राज्याचे भविष्य उज्ज्वल होईल.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment