Sunday, 28 February 2016



“वाघगर्जना”'


(माझा आजचा लेख-:)

मिशन ठाणे महानगरपालिका..!

“माझे ठाणे-खणखणीत नाणे”

आगामी २०१७ साली मुंबई महानगरपालिका निवडणुकीसोबत ठाणे महानगरपालिका निवडणुकही आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेपासून ते आजतागायत ठाण्यावर शिवसेनेचा भगवा अभिमानाने,स्वाभिमानाने,डौलाने तेजाने आणि दिमाखात फडकत आहे.शिवसेनेच्या स्थापनेनंतर शिवसेनेला सर्वप्रथम ठाणे महानगर पालिकेचीच सत्ता मिळाली,शिवसेनेचा पहिला महापौर ठाण्याचाच.त्यामुळे ठाणे हे शिवसेनाप्रमुखांच आवडत शहर होते.आजही ठाण्यावर शिवसेनेचीच सत्ता आहे.या समिकरणांमुळे “शिवसेनेचे ठाणे-ठाण्याची शिवसेना” असे नाते आजवर कायम राहिलेले आहे.ते यापुढेही कायम राहील हे सुनिश्चित आहे.

ठाण्यावर सुरुवातीपासूनच शिवसेनेची सत्ता असल्यामुळे आजवर ठाण्यात झालेल्या लोकोपयोगी विकासकामांचे श्रेय आपसूकच शिवसेनेला जाते.याच विकासकामांच्या बळावर ठाणेकरांनी नेहमीच शिवसेनेवर विश्वास ठेवलेला आहे.शिवसेनेही तो नेहमीच सार्थ ठरवला आहे.आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ठाणेकरांचा शिवसेनेवरील असलेला विश्वास वृद्धिंगत व्हावा आणि विकास आणि विश्वासाचं हे नात अधिक दृढ व्हाव आणि ठाण्यावर शिवसेनेची एकहाती सत्ता यावी यासाठी शिवसैनिकांनी आणि ठाणेकरांनी लढण्याची गरज आहे.

मुंबई महानगरपालिकेसोबतच विरोधकांना सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाण्याची सत्ता मिळवण्याचे दिवास्वप्न नेहमीच पडत असते.ठाणेकरांच्या कृपाआशीर्वादाने ते नेहमीच धुळीस मिळत असते आणि जनता ठाण्याची ठाणेदारी शिवसेनेकडेच सोपवत असते.हीच परंपरा आगामी निवडणुकीतही टिकवायची आहे.फरक एवढाच की यंदा शिवसेनेची केवळ एकहाती नव्हे तर “शत-प्रतिशत” सत्ता आणायची आहे.शिवसेनेने ठाण्याच्या विकासासाठी नेहमीच कार्यतत्परता दर्शवली आहे.आज ठाणे शहर राज्यातील एक मोठे आणि विकसित शहर म्हणून नावारूपाला आले आहे.ठाण्यात वाहत असलेल्या विकासगंगेने ठाण्याला स्वच्छ,सुंदर आणि विकसित केले आहे.त्यामुळेच “माझे ठाणे-खणखणीत नाणे” अशी अभिमानास्पद भावना आज प्रत्येक ठाणेकरांच्या मनात आहे.हेच नाते आगामी निवडणुकीत अधिक आत्मीयतेने पुढे येईल यात तिळमात्र शंका नाही.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीप्रमाणेच ठाणे महानगरपालिका निवडणुकीतही शिवसेनेला विरोधकांचा सामना करायचा आहे.त्यात घरच्या-दारच्या विरोधकांचा आणि मधल्या मित्रवर्यांचाही समावेश असू शकतो.आज मित्र म्हणून सोबत असलेलेच उद्या विरोधक म्हणून उभे राहून शिवसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न करतील.ठाणेकरांनी सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाप्रमाणे समोर कोण आहे याचा विचार न करता धनुष्यातून बाण सोडावा आणि विरोधकांना नेस्तनाभूत करून शिवसेनेला विजयी करावे.शिवसेना नेहमीप्रमाणे जनतेचा विश्वास सार्थ ठरवेल.

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला केवळ बहुमत नव्हे तर सर्वच जागांवर विजय मिळवून देण्याचे पवित्र कार्य शिवसैनिक आणि ठाणेकरांनी हाती घ्यावे.विरोधकांची पर्वा न करता,अपप्रचाराला बळी न पडता,कोणत्याही प्रलोभनांना न भूलता आणि कोणतेही गाजर पाहून खुश न होता ठाणेकरांनी आजवरची परंपरा कायम ठेऊन शिवसेनेलाच साथ द्यावी आणि शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि विरोधकांना कायमचे घरी बसवावे.हे प्रत्यक्षात येण्यासाठी अपार मेहनत लागेल हे सत्य आहे पण हे घडल्यास ठाणे शहराच्या विकासाचा आलेख अधिक उंचावेल आणि प्रगतीचा बाण सुसाट वेगाने भविष्याचा वेध घेईल.त्यासाठी शिवसैनिक आणि ठाणेकरांनी “मिशन ठाणे महानगरपालिका” हे एकच लक्ष डोळ्यांसमोर ठेवावे आणि कामाला लागावे.विजय आपलाच आहे.

जय महाराष्ट्र..!



No comments:

Post a Comment