हा हिंदुस्थान आहे की पाकिस्तान?
स्वातंत्र्याचा अर्थ काय?
हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन जवळ येऊन ठेपल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.तिरंग्याला वंदन करण्यासाठी आणि हिंदुस्थानचा स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यासाठी देशभरातील सर्वच स्तरांवरील देशभक्तांची लगबग सुरु आहे.१५ ऑगस्ट २०१६ रोजी हिंदुस्थानचा ६९ वा स्वातंत्र्यदिन अवघ्या हिंदुस्थानात दिमाखात,उत्साहात,जल्लोषात साजरा होईल.ठिकठिकाणी ध्वजारोहण केले जाईल,हिंदुस्थानचे राष्ट्रगीत,वंदेमातरम् म्हणून हिंदुस्थानला नमन केले जाईल.हे सगळ तर गेली ६८ वर्षेही असच होत होत आणि यापुढेही होतच राहील.हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन चिरायू होईल.हे सगळ होत असतानाच ऐन स्वातंत्र्यदिन सोहळ्यापुढे एक धक्कादायक बाब समोर आली आहे.त्याकडे खूप गांभीर्याने पाहण अत्यावश्यक आहे.
स्वतंत्र आणि प्रजासत्ताक राष्ट्र असलेल्या हिंदुस्थानात अलाहाबाद येथील एका शाळेत हिंदुस्थानच्या स्वतंत्र्यदिनी राष्ट्रगीत म्हणण्यास बंदी घातल्याची बाब समोर आली आहे.एवढेच नव्हे तर त्या शाळेत गेली १२ वर्षे राष्ट्रगीताला बंदी असल्याचेही सत्य समोर आले आहे.येत्या स्वतंत्र्यदिनी राष्ट्रगीताला परवानगी नाकारल्याने शाळेतील ८ शिक्षकांनी राजीनामे दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील नर्सरीपासून आठवीपर्यंत असलेल्या या शाळेत स्वातंत्र्यदिन कार्यक्रमाची तयारी चालू होती.शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रगीतास परवानगी देण्याची मागणी केलेली होती,मात्र देशद्रोही शाळा व्यवस्थापक जिया उल हक याने त्यावर आक्षेप घेतला.राष्ट्रागीतामधील “भारत भाग्यविधाता” या शब्दांवर जिया उल हक याने आक्षेप घेत राष्ट्रागीतावर बंदी घातली आहे.इस्लाममध्ये अल्लाशिवाय दुसरा कोणीही भाग्यविधाता नाही.त्यामुळे “भारत भाग्यविधाता” म्हणणे चुकीचे असल्याच सांगत जिया उल हकने गेली १२ वर्षे एकदाही शाळेत राष्ट्रगीत म्हटले गेलेले नसून यावेळीही राष्ट्रागीतावर बंदी असल्याचे म्हटले आहे.
हिंदुस्थानात हिंदुस्थानचे राष्ट्रगीत गायचे नाही तर मग अमेरिकन सिनेटमध्ये गायचे काय? की पाकिस्तानी संसदेत गायचे? कसली बंदी? कोण घालणार? राष्ट्रागीतावर बंदी घालणारे हे कोण? यांच्यावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करून यांना तोफेच्या तोडी द्या.तर,तर आणि तरच या हिरव्या अळ्यांची वळवळ थांबेल.१२ वर्षे हिंदुस्थानातील एका शाळेत हिंदुस्थानच्याच राष्ट्रागीतावर बंदी घातली गेली आणि कोणाला पत्ताच नाही? या प्रकारची १२ वर्षे वाच्यता होऊ शकली नाही? आस कस घडल? तेही आजच्या जमान्यात? आजकाल एखाद्या ठीकाणी काही घडलं आहे की नाही हे नेमक माहिती नसताना सर्वात आधी मिडीयावाले दाखल होतात.एखाद्या ठिकाणी चित्रीकरण करण्यास वाव नसला तरी दिसेल त्या फटीतून कॅमेरा घुसवून चित्रीकरण करतात.सर्वात आधी वृत्त देण्यासाठी वाटेल ती धडपड करतात.“सबसे तेज” अशी बिरुदावली मिरवत अनेकदा जे घडलच नाही ते घडलं अस भासवतात.कुठे होते हे सगळे १२ वर्ष? सदर शाळेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही या गोष्टीचा थांगपत्ता नव्हताच का? १२ वर्षात शाळेला एकही अधिकाऱ्याने भेट दिली नाही काय? हिंदुस्थानात १२ वर्षे हिंदुस्थानी राष्ट्रगीताला बंदी होती आणि हे सत्य झाकल? कोंबडा आरवला नाही म्हणून सूर्योदय थांबला? की सूर्योदय झाला नसल्याच भासवल गेलं? हा हिंदुस्थान आहे की पाकिस्तान?
हिंदुस्थान हा स्वतंत्र देश आहे.हिंदुस्थानातील प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे,पण स्वातंत्र्याचा अर्थ काय?ज्या देशात जन्माला आलो,जी आपली कर्मभूमी आहे तिला वंदन न करण्याचं स्वातंत्र्य कसलं ? हा देशद्रोह आहे देशद्रोह.राष्ट्रागीतावर बंदी घालणारी अवलाद चेचून ठेचून टाकली पाहिजे.हिंदुस्थानात लोकशाही आहे,प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे मात्र देशापेक्षा मोठे कोणीही नाही.धर्मांध मुस्लीम लोकांपैकी ज्यांना हिंदुस्थानात राहायचं आहे त्यांनी राष्ट्रदेवो भव हे मान्य असेल आणि राष्ट्रगीत,वंदेमातरम् म्हणायचे असेल तरच हिंदुस्थानात राहावं.अन्यथा अशांनी थेट पाकमध्ये चालत व्हावं.हिंदुस्थानात अशा वृत्तीला थारा नाही.अशा देशद्रोही अवलादी देशाबाहेर गेल्याने हिंदुस्थानला काडीमात्र फरक पडणार नाही.
हिंदुस्थानी जनतेच्या याबाबत मोदी सरकारकडून प्रचंड अपेक्षा आहेत.पंतप्रधानांनी त्यांच्या ५६ इंच छातीतील दम या देशातील देशद्रोह्यांना दाखवून द्यावा.मोदींनी या अशा धर्मांध प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी.जेणेकरून पुन्हा असा प्रकार घडणार नाही.सरकार जर अशा प्रवृत्ती ठेचणार नसेल आणि कठोर पावल उचलणार नसेल तर तमाम देशभक्त अशा प्रवृत्ती ठेचातील आणि हसतमुखाने तुरुंगातच काय फासावरही जातील.अशा देशद्रोह्यांना मृत्युदंडच द्यायला हवा.दोन-चार जणांवर जुजबी कारवाई करून प्रकरण निकाली काढण योग्य नाही.अशा प्रवृत्ती फोफावण्याच्या आधी मुळासकट उखडून टाकायला हव्यात.तरच अभिमानाने राष्ट्रगीत आणि वंदेमातरम् म्हणता येईल.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment