केंद्रात नरेंद्र मोदी सरकार दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर चर्चा सुरु झाली ती मंत्रिपद आणि खातेवाटपाची. २०१४ प्रमाणेच यंदाही भाजपने संपूर्ण बहुमतासह सत्ता मिळवल्याने मित्रपक्षांच्या वाट्याला नेमकं काय येणार यावर चर्चा सुरु झाल्या. अखेर मोदींच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि त्यात २०१४ प्रमाणेच प्रत्येक मित्रपक्षाला एक मंत्रिपद हे सूत्र भाजपने कायम ठेवले. त्यानुसार शिवसेनेचे अरविंद सावंत कॅबिनेट मंत्री झाले, तर रामदास आठवले यांनाही पुन्हा मंत्रिपद मिळाले. शिवसेनेचे १८ खासदार असल्याने शिवसेना एनडीए मधला भाजपचा सर्वात मोठा पक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा समोर आली. साहजिकच त्यामुळे शिवसेनेला एकपेक्षा जास्त मंत्रीपदे मिळतील असं बोललं गेलं मात्र तसं झालं नाही. त्याउलट एकही खासदार लोकसभेत नसलेल्या रामदास आठवलेंच्या रिपाइंला एक मंत्रिपद मिळालं आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली.असं का झालं आपण जाणून घेऊया:
-भाजपच्या सूत्रानुसार सर्व मित्रपक्षांना एक मंत्रिपद मिळालं. यावेळी कोणत्याच पक्षाच्या खासदारांची संख्या लक्षात घेतली गेली नाही.
-रामदास आठवलेंच्या रिपाईचे लोकसभेत शून्य खासदार आहेत म्हणून त्यांना मंत्रिपद देणं टाळलं असत तर आगामी महाराष्ट्र विधानसभेत भाजपला दलितांची मते मिळण्यास अडचण ठरली असती.
-आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होईल तेंव्हा शिवसेनेला आणखी मंत्रीपदे मिळतील परंतु त्यावेळी रिपाइंला मंत्रिपद मिळणार नाही.
-भाजपला केंद्रात बहुमत मिळालं नसतं तर शिवसेनेला चार केंद्रीय मंत्रीपदे आणि लोकसभा उपाध्यक्ष / लोकसभा अध्यक्ष किंवा थेट उप पंतप्रधान पद द्यायलाही भाजपने कमी केलं नसत मात्र तेंव्हा रिपाइंला मिळालेलं एकमेव मंत्रिपदं सुद्धा दुसऱ्या एखाद्या पाठिंबा देणाऱ्या पक्षाला मिळालं असत.
वरील मुद्द्यांवरून आपल्याला समजू शकेल की "एकही खासदार नसताना आठवलेंना मंत्रीपद तर तब्बल १८ खासदार असून शिवसेनेला एकच मंत्रिपद" या सोशल मीडियावरील चर्चेत काहीही तथ्य नाही.
No comments:
Post a Comment