Saturday, 27 February 2016








“वाघगर्जना”

(माझा आजचा लेख-:)

मिशन बृहन्मुंबई महापालिका..!

आपली मुंबई आपली शिवसेना..!

आज २७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी दिन.या सुदिनी माय मराठीचे गोडवे गात असतानाच माय मराठीची अस्मिता जागी ठेवली पाहिजे याची जाणीव प्रत्येक मराठी मनाला झाली पाहिजे.मुंबई,महाराष्ट्र आणि मराठी हे नातंही अतूट आहे ते अतुटच राहील याची जबाबदारी आपण घ्यायला हवी.गेल्या १७ फेब्रुवारीला शिवसेनेच्या मुंबई महानगरपालिकेच्या विजयाला ४ वर्षे पूर्ण झाली.पुढील वर्षी साधारणतः जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे.या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून फडकत असलेला शिवसेनेचा भगवा पुन्हा मोठ्या डौलाने,अभिमानाने आणि स्वाभिमानाने फडकावत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक मराठी माणसाची आहे.आज मराठी दिनाचे औचित्य साधून मराठी माणसाने हे पवित्र कार्य हाती घ्यायला हवे.

मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसाने आणि शिवसेनेने लढा दिलेला आहे.त्यानंतर शिवसेनेने मुंबई महानगरपालिका अनेक वर्षे सांभाळून मुंबईचा विकास केलेला आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका,हिंदुस्थाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराची महानगरपालिका अशी बिरुदावली लाभलेल्या मुंबई महानगरपालिकेवर कब्जा करण्याचे स्वप्न प्रत्येक पक्षाला पडते,मराठी मुंबईकर जनतेच्या कृपाआशीर्वादाने शिवसेनेने विरोधकांचे हे स्वप्न कित्येकदा धुळीस मिळवले आहे.महाराष्ट्राची राजधानी असलेल्या या मुंबई महानगरपालिकेवर फक्त आणि फक्त शिवसेनेचीच सत्ता कायम राहिली तर आणि तरच मुंबई महाराष्ट्रात राहील आणि मुंबईत मराठी माणूस राहील.त्यामुळे सध्या मुंबईवर शिवसेनेची सत्ता आहेच,आगामी निवडणुकीत शिवसेनेची एकाहाती सत्ता यायला हवी यासाठी शिवसैनिकांनी आणि मराठी जनतेने जीवाचे रान करायला हवे.

शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेवर सत्ता हवी आहे ती केवळ मुंबई,महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठीच.शिवसेनेने केवळ मुंबई महापालिकेवर सत्ता असताना अनेक विकासकामे करून दाखवली आहेत.सध्या शिवसेना केंद्रात आणि राज्यातही सत्तेत सहभागी आहे.२०१७ साली जेव्हा शिवसेनेचा भगवा मुंबईवर डौलान फडकेल आणि शिवसेनेची एकहाती सत्ता मुंबई महानगरपालिकेवर येईल तेंव्हा शिवसेना काय करून दाखवू शकते याचा अंदाज शिवसेनेने मुंबईत केलेल्या विकासकामांवरून बांधता येईल.सध्या मुंबईवर शिवसेनेचीच सत्ता आहे.शिवसेनेने जनतेसाठी अनेक कामे केली आहेत.त्याच विकासकामांच्या बळावर मुंबईवर शिवसेनेची सत्ता कायम राहणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे,मात्र ती एकहाती सत्ता असावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी.तसे होणे ही आज महाराष्ट्राचीच नव्हे तर हिंदुस्थानची गरज आहे.

इतर काही राज्यांची उदाहरणे पाहिल्यास त्या त्या राज्यांच्या प्रादेशिक पक्षांकडेच राज्याची आणि राज्यातील प्रमुख शहरांची सत्ता आहे.इतकेच नव्हे तर विरोधी पक्षही प्रादेशिकच आहेत.याच गोष्टीमुळे त्या राज्यांची राज्यभाषा आणि प्रादेशिक अस्मिता जपली गेली आहे.प्रादेशिक अस्मिता हाच त्या राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा प्रमुख अजेंडा असल्याने त्या राज्यांची संकृतीही कायम राहिली आहे.महाराष्ट्रातही असे घडल्यास निश्चितच मराठी माणसाच्या मराठी अस्मितेचा गजर हिंदुस्थानात घुमेल.शिवसेनेसाठी हिंदुत्व आणि मराठी या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत.मराठी तर शिवसेनेचा पाया आहे.शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसाच्या न्याय,हक्क आणि सेवेसाठी झाली आहे.सत्ता असल्यास समाजकार्यासाठी ती उपयुक्त ठरते यासाठी शिवसेना निवडणुका लढवते,सत्तेच्या खुर्च्यांसाठी नाही.त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचीच सत्ता यायला हवी.आज मराठी दिनाचे औचित्य साधून शिवसैनिकांनी “मिशन बृहन्मुंबई महापालिका” सुरु करायला हवे.

शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याने देशद्रोही,देशविघातक वृत्तीवर आळा बसेल.हिंदुस्थान आणि महाराष्ट्राच्या गद्दारांवर,खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्या देशद्रोह्यांवर वचक ठेवायचा असेल तर शिवसेनाच सत्तेवर हवी.अन्यथा आज जे जेएनयुमध्ये घडत आहे तेच उद्या मुंबई विद्यापीठात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे “आपली मुंबई–आपली शिवसेना” या भावनेने मराठी माणसांनी आणि शिवसैनिकांनी पुढील मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवून देण्यासाठी कामाला लागावे.मराठी माणसाने ठरवल तर काय अवघड आहे?

जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment