आजघडीला महाराष्ट्रातच नव्हे तर देशात असलेलं एकमेव परिपक्व व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे.
उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार म्हटलं की विरोधक कोणत्या मुद्द्यावरून टीका करतील ते आधीच ओळखून त्यांनी विरोधकांचे सगळे मुद्दे संपवले आणि म्हणूनच विरोधकांचा तिळपापड सुरू आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना अयोध्या दौरा कशाला? हा प्रश्न उद्धव ठाकरेंनी दिवाळीतच सोडवला. शिवसेना व युवासेना यांच्यामार्फत हजारो शेतकरी कुटुंबांना तब्बल दोन महिने पुरेल इतकं अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू शिवसेनेने मोफत दिल्या.
बाळासाहेबांचं स्मारक बांधता नाही आलं अयोध्येत जाऊन काय करणार? असाही एक प्रश्न सध्या विरोधक शिवसेनेला विचारत आहेत. मुळात बाळासाहेबांचं स्मारक आणि राम मंदिर मुद्दा पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी सरकारी निविदा प्रक्रिया सुरू आहे. ती एकदा पूर्ण झाली की बाळासाहेबांचं भव्य स्मारक उभारलं जाईल. त्याला इतका वेळ लागत आहे याचं कारण सरकारी प्रक्रिया व इतर बाबी. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वाभिमानी नेते होते.त्यांच्या स्मारकासाठी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख कोणाकडेही काहीही मागणार नाहीत. अगदीच गरज पडल्यास २०१९ मध्ये शिवसेनेचं सरकार येताच शिवसेना स्वतः स्मारकाची प्रक्रिया व बांधकाम पूर्ण करेल. बाळासाहेबांच्या स्मारकासाठी स्वाभिमान गहाण ठेवलेल्या अथवा भ्रष्टाचारी नेत्यांच्या मदतीची शिवसेनेला गरज नाही.
अयोध्येला जाणार पण शिवरायांना विसरले अशी टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचं आराध्या दैवत आहे. शिवरायांचं जन्मस्थान शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवरायांचं दर्शन घेतलं व तिथल्या पवित्र मातीचा कलश घेऊन ते अयोध्येला जाणार आहेत.
हिंदुत्वाचा मुद्दा घेतला मग मराठीच काय झालं? हा एक प्रश्न शिवसेनेला विचारलं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासूनच महाराष्ट्रात मराठी आणि हिंदुस्थानात हिंदू ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्रात मराठी व हिंदुस्थानात हिंदू ही बाळासाहेबांची भूमिका कायम ठेवली आहे.
राम मंदिर मुद्दा निवडणूक व मतांसाठी घेतला ही टीका शिवसेनेवर होत आहे. प्रत्यक्षात शिवसेनेने भाजप, संघ व विहिंप यांचा राजकारणासाठी व २०१९ ला मतांसाठी वापरला जाऊ शकेल असा मुद्दा निवडणुकीआधीच निकालात काढायचं ठरवलं आणि त्यामुळेच या बेगडी हिंदुत्ववादी संघटना व भाजपची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. राहिला प्रश्न इतर विरोधकांचा. शिवसेना या मुद्द्याच राजकारण कायमच संपवण्यासाठी "मिशन अयोध्या" राबवत आहे.
यापुढेही जर शिवसेनेवर टीका केली जात असेल तर अशा सर्व विरोधकांच्या बुध्दीची कुवत आम्हाला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी खुशाल टीका करावी. त्यांच्या त्रस्त व अतृप्त आत्म्यांना शांती लाभो. जय महाराष्ट्र...! जय श्रीराम..!
Jay shivsena.....virodhkachi tika chaluch rahnar Karan Sena kary krte etr krt nahi mhnun te tika krta ....Jay shree RAM
ReplyDeleteJay Maharashtra Jay Shriram
ReplyDelete