लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
“वाघगर्जना: दिवाळी विशेष
लेखमाला”
दिवस पाचवा – लेख दहावा
शिवसेनेच्या स्वबळाचं भवितव्य काय?
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी
भाजपने लोकसभेतील विजयाची हवा डोक्यात गेलेली असल्यामुळे युती तोडली. २५ वर्षे मैत्रीचं
नातं निस्वार्थीपणे निभावणार्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेबांच्या
अनुपस्थितीत साम-दाम-दंड-भेद वापरुन शिवसेना संपवण्याचे प्रयत्न केले. शिवसेनेने स्वबळावर
सगळ्यांना टक्कर देत ६३ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही
आणि झाली तरी सरकार तरु शकत नाही हे लक्षात आल्याने भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी
होण्याचे आमंत्रण दिले आणि शिवसेना सत्तेत सहभागी झाली. २०१७ साली मुंबई-ठाणे महानगरपालिका
जिंकण्याचे मनसुबे बाळगणार्या भाजपने “पारदर्शकता” हवी म्हणत पुन्हा विधानसभेसारखी
नाटकं सुरू केली. विधानसभेला २५ वर्षांच्या मैत्रीकडे पाहून काहीसं
बेसावध असणारी शिवसेना यावेळी मात्र सावध होती. शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजपचे चाळे
आणि युती टिकवायची आहे असा आव आणून सुरू असलेले ढोंग पाहून युती तोडली आणि सर्व महानगरपालिका
आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला. “शिवसेना यापुढे
कोणाशीही युती करणार नाही, स्वबळावर महाराष्ट्रावर भगवा फडकवेल”
अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी जाहीर करताच तमाम शिवसैनिक आणि
शिवसेना प्रेमींनी एकचं जल्लोष केला. तेंव्हापासून शिवसेनेची नवी वाटचाल सुरू झाली.
या नवीन वाटचालीच्या सुरुवातीलाच
शिवसेनेने ठाण्यात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवलं. मुंबईत शिवसेना-भाजपला जवळपास समान
जागा मिळाल्या, मात्र शिवसेना पक्षप्रमुखांच्या आक्रमक चाली
आणि चाणाक्ष डावपेचांमुळे भाजपला महापौरपदाची निवडणूक लढण्यापूर्वीच माघार घ्यावी लागली.
मुंबई-ठाण्यावर स्वबळावर भगवा फडकला. त्याचबरोबर नाशिक,उल्हासनगर
आणि सोलापूर महानगरपालिकांमध्ये शिवसेनेला स्वबळावर लक्षणीय यश मिळालं. नाशिक आणि उल्हासनगरमध्ये
शिवसेनेची सत्ता थोडक्यात हुकली. सोलापूरमध्ये शिवसेनेचा विरोधी पक्षनेता झाला. इतर
५ महापालिकांत शिवसेनेला अपयश आल असलं तरी ५ महापालिकांत जे यश मिळालं ते यश केवळ आणि
केवळ शिवसेनेचचं आहे. त्या निवडणुकीत भाजपसमोर इतर कोणत्याच पक्षाचा निभाव लागला नाही.
पुणे, पिंपरी-चिंचवड या राष्ट्रवादीचा गड असलेल्या आणि निवडणुकीपूर्वी
भाजप नगरसेवक नगण्य असलेल्या पालिकांवर सुद्धा प्रचंड बहुमताने भाजपची सत्ता आली, पण शिवसेनेचे मुंबई-ठाणे गड अबाधित राहिले आणि इतर ३ ठिकाणी शिवसेनेची कामगिरी
उत्तम झाली. त्यामुळे शिवसेनेच्या स्वबळाची सुरुवात जोरदार झाली असंच म्हणावं लागेल.
“शिवसेनेच्या स्वबळाचं भवितव्य काय?” या प्रश्नाच उत्तर शोधताना महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय सद्यस्थिती
लक्षात घेणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीला जवळपास ४-५ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
इतके दिवस स्वबळाच्या हवेत असलेले भाजप नेते आता जमिनीवर आलेले आहेत. शिवसेनेने भाजपसोबत
युती करून आगामी निवडणुका लढवाव्यात यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करताना दिसत आहेत.
यात सावध असलेल्या शिवसेनेला पुन्हा गाफिल ठेवण्याचा हेतु असण्याची शक्यता नाकारता
येत नाही. त्यामुळे शिवसेना स्वबळावर ठाम आहे. सध्या शिवसेना पक्षप्रमुखांनी “चलो अयोध्या-चलो
काशी” चा नारा देत तमाम हिंदूंना साद घातली आहे. भाजपने गेल्या चार वर्षात सर्वत्र
बहुमत असून राममंदिराच्या मुद्द्याला दुर्लक्षित केलं. त्यामुळे तमाम हिंदू जनता आता
शिवसेनेच्या सोबत येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख या महिन्यात अयोध्येला जाणार आहेत. त्यावेळी
जी हिंदुत्वाची लाट उसळेल ती आगामी सर्व निवडणुकांवर परिणामकारक ठरेल. भाजपला त्याची
धडकी भरली आहे. सोबतच राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत
भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागेल असे सर्व्हे समोर येत आहेत. त्यामुळे भाजपची
चिंता वाढली आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांत भाजपचा दारुण पराभव
होऊन कॉंग्रेस सत्तेवर आल्यास आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रचंड बॅकफुटवर जाईल
आणि कॉंग्रेस मजबूत स्थितीत पोहोचेल. या परिस्थितीत कोणत्याही जागावाटपाच्या सूत्रानुसार
युती करण्यास भाजप तयार होऊ शकतो. शिवसेना स्वबळावर लढल्यास महाराष्ट्रात आणि देशात
भाजपला प्रचंड नुकसान होईल. हिंदुत्व आणि राममंदिर मुद्यांमुळे शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर
सुद्धा प्रतिसाद मिळेल आणि भाजपला त्याचा फटका बसेल असं चित्र दिसतं. या ३ राज्यात
भाजपला बहुमत मिळाल्यास भाजपची बाजू मजबूत होईल आणि कॉंग्रेस मरणासन्न अवस्थेत जाईल.
शिवसेनेवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना लोकसभा निवडणुकीत
स्वबळावर लढल्यास शिवसेनेचा फारसा तोटा होणार नाही मात्र भाजपचं प्रचंड नुकसान होऊ
शकतं. कदाचित शिवसेनेच्या खासदांरांच्या संख्येपेक्षा शिवसेनेमुळे भाजपच्या पराभूत
झालेल्या उमेदवारांची संख्या भाजपला त्रासदायक ठरेल आणि त्यामुळे लोकसभेतील बहुमताचं
भाजपचं गणित चुकेल.
लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विधानसभेची
परिस्थिति अवलंबून असेल. विधानसभेला मागच्या वेळी सर्व पक्ष स्वबळावर लढले होते आणि
त्यात शिवसेना ६३ जागांसाह दुसर्या स्थानावर
होती. त्यामुळे २०१४ प्रमाणे लोकसभेत भाजपला बहुमत मिळालं तरी विधानसभेत शिवसेनेला
त्याचा फारसा फटका बसेल असं चित्र नाही. शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेत
पुढे येऊ शकते. तसं न झाल्यास शिवसेना-भाजप मधलं अंतर मुंबई मनपा प्रमाणे जवळपास असेल
आणि शिवसेना-भाजप हेच पक्ष पहिल्या दोन स्थानांवर असतील. लोकसभेला भाजपला बहुमत न मिळाल्यास
भाजप विधानसभेत बॅकफुटवर जाईल. त्या परिस्थितीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो
आणि भाजप दुसर्या क्रमांकावर घसरू शकतो. लोकसभेत
भाजपचा पराभव होऊन कॉंग्रेस सत्तेत आल्यास महाराष्ट्र विधानसभेत सुद्धा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा
जोर वाढेल, पण सद्यस्थितीनुसार शिवसेनेला महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष म्हणून जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
शिवसेना २०१९ महाराष्ट्र विधानसभा
निवडणुकीत पहिल्या दोन स्थानांच्या खाली घसरणार नाही अशी सद्यस्थिती आहे. शिवसेनेचं
२०१९ ला महाराष्ट्रात स्वबळावर सरकार येईल अथवा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेलं. स्वबळावर सत्ता मिळणं हे केवळ जनतेच्या कौलावर अवलंबून राहील. अर्थात या सगळ्या
घडामोडींना अजून जवळपास दहा महिन्यांचा कालावधी आहे. राजकरणात “जर- तर” ला फारसा अर्थ
नसतो. २०१९ विधानसभेत शिवसेनेला स्वबळावर बहुमत मिळालं नाही तरी स्वबळाच भवितव्य चांगलंच
असेल. २०२४ आणि २०२९ च्या निवडणुकांपर्यंत शिवसेना केवळ महाराष्ट्रातीलचं नव्हे तर
देशातील प्रमुख बलाढ्य पक्ष बनलेला असेल आणि त्याची तयारी म्हणजेच हे आजच स्वबळ आहे.
इतके दिवस युतीच राजकारण केलं ते आता पुरे झालं. इथून पुढे महाराष्ट्रचं नाही तर हिंदुस्थानात
सुद्धा मोठ्या प्रमाणावर शिवसेनेला आपले उमेदवार निवडून आणायला हवेत. शिवसेना देशव्यापी
राष्ट्रीय पक्ष झाला पाहिजे यातच हिंदुस्थानचं हित आहे. ही गोष्ट झटपट होणारी नसून
याला वेळ आणि शिवसैनिकांचे परिश्रम या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरेंच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसैनिक मेहनत करून शिवसेनेला देशव्यापी
पक्ष करतील आणि भारताला पुन्हा हिंदुस्थान बनवतील.
लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
Yes
ReplyDeleteJay Maharashtra
ReplyDeleteAata pkakt shivsena
ReplyDeleteJay Maharashtra
Deleteजय महाराष्ट्र
ReplyDeleteJay Maharashtra
DeleteJai Maharashtra
ReplyDeleteJay Maharashtra
DeleteJai Maharashtra
ReplyDeleteJay Maharashtra
DeleteJai maharashtra
ReplyDeleteJay Maharashtra
Delete