लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
“वाघगर्जना: दिवाळी विशेष
लेखमाला”
दिवस पाचवा – लेख नववा
बाळासाहेबांनंतर पॉवरफुल कोण?
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख
हे हिंदुस्थानातलं आणि जगातलं एक उत्तुंग नेतृत्व होत. जागतिक कीर्तीचे
व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांच्या एका आदेशावर मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदुस्थान चालत असे. बाळासाहेबांच व्यक्तिमत्व हे
आभाळएवढं उत्तुंग आणि समुद्राएवढं अथांग होतं. शिवसैनिकांसाठी तर बाळासाहेब दैवतच, पण सामान्य मराठी आणि हिंदूंना बाळासाहेब आधारवड वाटायचे. विरोधी
पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सुद्धा बाळासाहेबांचा आधार वाटत होता.
बाळासाहेबांच्या एका आदेशावर “हिंदुस्थान बंद” व्हायचा. त्यांच्या एका गर्जनेने
सत्तासिंहासन हादरून जायचे. बाळासाहेबांच्या पाकिस्तान विरोधी भूमीकेची पाकला
अक्षरशः धडकी भरली होती. त्यामुळे बाळासाहेबांच्या महानिर्वाणानंतर हिंदुस्थान एका
“पॉवरफुल” नेत्याला मुकला असल्याचं वाटत होतं. बाळासाहेबांच्या
महानिर्वाणाला येत्या १७ नोव्हेंबर रोजी सहा वर्षे पूर्ण होतील. त्यांची जागा घेणं
हे कोणत्याही नेत्याला अशक्य असलं तरी बाळासाहेबांनंतर पॉवरफुल कोण? या प्रश्नांच उत्तर आज महाराष्ट्रसमोर आणि देशासमोर अगदी सुस्पष्ट आहे.
“बाळासाहेबांनंतर पॉवरफूल कोण?” या प्रश्नाचं उत्तर शोधताना प्रथम नाव यायचं ते नरेंद्र मोदींचं. देशात
२०१३ पासून मोदीलाट असल्याचं म्हटलं जातं. ती आता राहिली की संपली हे येत्या काळात
दिसून येईल. २०१२ च्या शेवटी झालेली गुजरात विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकत
मोदींनी “अब दिल्ली दूर नही” हे दाखवून
दिलं होतं. तिथूनच देशात मोदीलाट येण्यास सुरुवात झाली. २०१३ च्या शेवटी
झालेल्या राजस्थान, मध्य प्रदेश,
छत्तीसगड राज्यांच्या निवडणुकीत भाजपने कॉंग्रेसच्या अक्षरशः चिंध्या केल्या
होत्या. भाजप-एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झालेल्या मोदींनी
पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे देशभर सभा घेऊन कॉंग्रेसविरोधी वातावरणाचा
ज्वालामुखी भडकवला होता. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तब्बल २८२
जागा मिळाल्या आणि स्पष्ट बहुमत मिळालं. २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर
मोदींचा अहंकार वाढीस लागला होता. बाळासाहेबांनंतर मोदीच आता देशातील “पॉवरफुलं” नेते असतील असं म्हटलं जाऊ
लागलं होतं. अनेकांनी तर मोदी “दुसरे
हिंदूहृदयसम्राट” होतील असंही भाकीत केलं होतं. मोदींनी सुद्धा बाळासाहेबांनंतर
आपणच मोठे नेते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न अनेकदा केला. बाळासाहेबांच्या
स्मृतिदिनाला हजेरी न लावणं, मुंबईत झालेल्या जाहीर सभेत
बाळासाहेब आणि शिवसेनेचं नाव सुद्धा न घेणं यातूनच त्यांचा सर्वशक्तिमान असल्याचा
अहंकार वाढीस लागल्याच दिसून आलं होतं. २०१४ विधानसभा
निवडणुकीत तर त्यांनी आपल्या संपूर्ण फौजफाटयासह शिवसेनेवर चाल करून येत शिवसेना
संपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पंतप्रधानपद मिळाल्यानंतर मोदींनी
पृथ्वीप्रदक्षिणा करत जगभरात आपले नेतृत्व ठसवण्याचा प्रयत्न केला. २०१४ लोकसभा
निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पूर्ण करणं मात्र त्यांना जमलं नाही.
बाळासाहेबांनंतर राष्ट्रवादी
कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हेच देशातील “पॉवरफुल” नेते असतील असही म्हटलं जात
होतं. प्रत्यक्षात मात्र देशातील राजकरणात “पवार पॉवर”चा प्रभाव कमी झालेला दिसून
आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी मोदीलाट आणि कॉंग्रेसविरोधी वातावरण
पाहून वाढत्या वयाचं कारण पुढे करत न लढण्याचा निर्णय घेतला आणि ते राज्यसभेत
गेले. बारामती मतदारसंघातून त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांना महायुतीचे उमेदवार
महादेव जानकर यांनी रासपचे “कपबशी” चिन्ह घेऊन दरदरून घाम फोडला. त्यांचा पराभव
थोडक्यात टळला. लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीची वाताहत झाली. केवळ ४ खासदार विजयी
झाले. पुढे विधानसभेत सुद्धा पवारांची जादू चालली नाही. राष्ट्रवादीला केवळ ४१
जागा मिळाल्या. शिवसेना-भाजप मधील वाद विकोपाला गेल्यामुळे त्याचा फायदा शरद पवार
घेतील अशी चर्चा रंगत होती. पवारांनी तसे प्रयत्नही करून पाहिले. शरद पवार
शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवतील असंही म्हटलं गेलं मात्र गेल्या 4 वर्षात
पवारांची डाळ अजिबात शिजली नाही. देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांपैकी मोठं वलय
असलेला आणि सर्वात अनुभवी नेता म्हणून शरद पवारांकडून अनेकांना विशेष अपेक्षा होती, पण पवारांची कामगिरी फारशी उल्लेखनीय नाही. मोदींची
गुरूदक्षिणा म्हणून पवार राष्ट्रपती होतील असाही अंदाज वर्तवला गेला, मात्र तोही फोलं ठरला. एकूणच पवारांचा करिश्मा कमी होत गेल्याच पाहायला
मिळालं.
“बाळासाहेबांनंतर पॉवरफुल कोण?” यावर चर्चा करताना शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी सोडून शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे यांच नाव कोणीही घेत नव्हतं. बाळासाहेबांच्या
महानिर्वाणानंतर “शिवसेना पक्षप्रमुख” पदाची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी स्वीकारली. तेंव्हा
विरोधक आणि राजकीय विश्लेषक इत्यादींनी “उद्धव ठाकरे शिवसेना संपवतील” असं भाकीत
वर्तवलं होतं आणि उद्धव ठाकरेंवर प्रचंड टीका केली. महाराष्ट्र आणि देशातील
मीडियाने सुद्धा उद्धव ठाकरेंची दखलं न घेता त्यांचं नेतृत्व दाबून टाकण्यात
हातभार लावायला सुरुवात केली. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या
महानिर्वाणानंतर शिवसेनेचे कुटुंबप्रमुख या नात्याने “रडायचं नाही लढायचं” हा
संदेश देण्यासाठी २०१२ च्या शेवटीच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचा दौरा केला होता.
२०१३ मध्ये त्यांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा करत दुष्काळग्रस्तांचा आवाज बुलंद
केला. या दौर्याच्या सुरुवातीलाच जालन्यात झालेल्या सभेला लाखोंची विराट गर्दी
उसळली होती. हेच चित्र पुढेही कायम राहिलं. महत्वाचं म्हणजे या दौर्यात शिवसेना
पक्षप्रमुखांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर टीकेचे आसूड तर ओढलेच, पण ते एवढयावरच थांबले नाहीत. त्यांनी दुष्काळी भागात शिवसेनेचा “मदतयाग”
सुरू केला. “दुष्काळ गंभीर –शिवसेना खंबीर” हा नारा देत दुष्काळग्रस्तांना शक्य
तेवढी मदत केली.
२०१३ च्या शेवटी नुकत्याच
झालेल्या राजस्थान-गुजरात-मध्यप्रदेश राज्यांच्या निवडणुकीत अतिप्रचंड यश
मिळाल्याने गर्वाची बाधा झालेल्या मोदींनी महाराष्ट्रात मुंबई येथे भाजपची विराट
जाहीर सभा घेऊन शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी मोदींनी शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचा
उल्लेख न करता जमलेली गर्दी केवळ मोदी आणि भाजपची आहे असा संदेश दिला. त्यावर
विश्लेषकांनी आता मोदी शिवसेनेचा प्रभाव कमी करतील असं भाकीत केलं. त्यानंतर
शिवसेना पक्षप्रमुखांनी २३ जानेवारी २०१४ रोजी बाळासाहेबांच्या जन्मदिनाचे औचित्य
साधून मुंबईतच शिवसेनेची “प्रतिज्ञा दिन” महासभा घेतली आणि लाखो शिवसैनिकांना
शिवबंधन बांधलं.या सभेला मोदींच्या सभेपेक्षा जास्त गर्दी लोटलेली पाहून सर्वच
विश्लेषक आणि विरोधक आश्चर्यचकित झाले. मोदींना सुद्धा योग्य तो इशारा मिळाला. पुढे
२०१४ च्या लोकसभा निवडणूकित शिवसेनेने २० जागा लढवल्या. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र
पिंजून काढला. शिवसेनेचे तब्बल १८ खासदार निवडून आले आणि शिवसेना एनडीए मधील
भाजपनंतरचा सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना विरोधकांनी आणि मोदीभक्तांनी हे यश
उद्धव ठाकरेंच नाही असं म्हटलं. शिवसेनेचे खासदार केवळ मोदींच्या नावामुळे निवडून
आले अशी टीका झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेनेला
कमी लेखण्यासाठी केवळ एकच मंत्रिपद दिलं.
लोकसभेनंतर भाजपला महाराष्ट्रात
भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्नं पडायला सुरुवात झाली. युती तोडण्याचे प्रयत्न
सुरू झाले. शिवसेनेला अंधारात ठेऊन महायुतीतील इतर पक्षांना साथीला घेऊन भाजपने
ऐनवेळी युती तोडली. भाजपचे अनेक राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, नेते, पंतप्रधान
राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्रातील नेते
शिवसेना संपवण्याचा विडा उचलून महाराष्ट्र काबिज करायला उतरले. भाजप आणि इतरांना
एकाकी टक्कर देत शिवसेनेने तब्बल ६३ जागांवर विजय मिळवला आणि मोदींचा चौफेर
उधळलेला रथ उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात रोखला. तरीही भाजपचा माज कायम होता.
त्यांनी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवत शपथविधी उरकण्याचा डाव रचला. राष्ट्रवादीची
छुपी साथ घेत बहुमत सिद्ध केलं. शिवसेनेची गरज आम्हाला नाही असं दाखवण्याचा भाजपने
पुरेपूर प्रयत्न केला. शिवसेना फोडण्याचे प्रयत्न केले. सार काही करून यश येत नाही
हे लक्षात येताच भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी हालचाली सुरू
केल्या. भाजप राष्ट्रवादीला दूर ठेवत नाही तोपर्यंत सत्तेत येणार नाही अशी कणखर
भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतली. त्यासाठी अगदी त्यांनी मोदींच्या
मंत्रिमंडळातील मंत्रीपदाला लाथाडण्याच धाडस
दाखवलं. शेवटी भाजप नरमली आणि शिवसेना सत्तेत सहभागी झाली.
सत्तेत सहभागी असताना सुद्धा
शिवसेना सरकारच्या नोटबंदी, भूसंपादन, नाणार
प्रकल्प यांसारख्या अनेक न पटणार्या आणि जनहिताच्या विरोधात असलेल्या निर्णयांना
प्रखर विरोध करत आली आहे. तसेच महागाई आणि शेतकरी कर्जमाफी यांसारख्या प्रश्नांवर
शिवसेनेने रस्त्यावर उतरून सरकरविरोधात आंदोलनही केलेलं आहे. शिवसेना सत्तेत राहून विरोध करते अशी टीका होत असली तरी आजघडीला देशात
नरेंद्र मोदींच्या एकाधिकारशाहीला आणि निर्णयांना विरोध करण्याचे सामर्थ्य शिवसेना
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातच आहे हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे. मोदींना
विरोध करण्याचं आव्हान राहुल गांधी आणि शरद पवारांनाही पवारांनाही पेलवल नाही, पण सत्तेत राहून मोदींच्या नाकावर टिच्चून उद्धव ठाकरेंनी ते गेली
साडेचार वर्षे करून दाखवलं आहे. मुंबई मनपा निवडणुकीवेळीसुद्धा शिवसेनेची कोंडी
करण्याचा प्रयत्न भाजपने केला, मात्र शिवसेनेण स्वबळावर लढून
मुंबई ठाण्यावर भगवा फडकवून दाखवला. मुंबईत संख्याबळ जवळपास समान असतांनाही
मुख्यमंत्र्यांना माघार घेण्यास उद्धव ठाकरेंनी मजबूर केलं. यापुढील प्रत्येक
निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. राममंदिराच्या
निर्माणासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. तमाम हिंदूंना भगव्याखाली एक
आणण्याचे बाळासाहेबांचे कार्य ते पुढे नेत आहेत. त्यामुळे “बाळासाहेबांनंतर
पॉवरफुल कोण?” या प्रश्नाच उत्तर शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे हेच आहे.
२०१४ नंतर देशात अमित शहा आणि
राहुल गांधी यांचे नेतृत्व पुढे आले आहे. “बाळासाहेबांनंतर पॉवरफुल कोण” यावर ही
नावं पर्याय अजिबात नाहीत. देशातील सध्याचे प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहता
येईल. तरीही या नेत्यांपेक्षा उद्धव ठाकरे सर्वार्थानं सरस ठरतात. राहुल गांधी या
कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नेत्यापेक्षा मोदींच्या निर्णयाल
उद्धव ठाकरेच प्रभावीपणे विरोध करतात. अमित शहा यांना फोडफोडीचे राजकारण करून कमळ
फुलवण्यात तोड नाही. असं असलं तरी शिवसेनेचा मात्र काही आमदार-खासदार-नगरसेवक अथवा
नेता त्यांना फोडता आला नाही. २०१४ नंतर शिवसेनेचे आमदार फोडून भाजपच्या तिकीटावर
निवडून आणायचे आणि शिवसेना संपवायची हे अमित शहाचे मनसुबे उद्धव ठाकरेंनी धुळीस
मिळवले आहेत. हेच अमीत शहा आणि भाजप नेते आज युती करण्यासाठी शिवसेनेला विनवण्या
करत आहेत आणि “मातोश्री” च्या पायर्या जीजवत आहेत. त्यामुळे आजघडीला देशात असलेल्या
नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे सर्वार्थानं “पॉवरफुल” असे श्रेष्ठ नेते आहेत.
लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
ऊतु नका मातु नका घेतला वसा टाकु नका
ReplyDeleteबाऴासाहेब हे एकमाद्वीतीय नेते होते
जय महाराष्ट्र जय शिवसेना
तुमचा लेख वाचून आवडला शिवसेनाप्रमुखानंतर पाॅवर फुल नेता श्री उध्दवजी ठाकरे हेच आहेत
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. जय महाराष्ट्र
DeleteOnly uddavji is great power full shivsena pakshpramukha jay Maharashtra jay shivsena
ReplyDeleteJay Maharashtra
DeleteOnly uddavji is great power full shivsena pakshpramukha jay Maharashtra jay shivsena
ReplyDeleteJay Maharashtra
DeleteUddhavsaheb Thakre
ReplyDeleteJay Maharashtra
Deleteएकही व्यक्ती शिवसेना सोडून गेला नाही व कोणी ती फोडूही शकला नाही हेच उद्धव यांचे यश आहे
ReplyDeleteछाती मधे दोन दोन स्टेन असताना शिवसेना वाचवण्यासाठी आदिलशाह व इतर विरोधक नुसते आंगावर घेतले नाही त्यांना चारिमुंड्या चीत करून त्यांना मातोश्रीच्या वाऱ्या करायला भाग पाडले हे तर अफाट पराक्रम आहे
Jay Maharashtra
Deleteभाजप म्हणजे गाजराची शेती ......
ReplyDeleteउध्दवसाहेब ग्रेट ....
शांतता आणि संयम हीच जमेची बाजू
Jay Maharashtra
Deleteबाळासाहेबांनंतर पॉवरफुल नेता फक्त उध्ददवसाहेब ठाकरेच
ReplyDeleteJay Maharashtra
Deleteछान विश्लेशण केलंत. उद्धवजींनी बिकट स्थीतीतुन पक्ष सावरलाय. त्याला अखंड ठेवला, पक्ष वाढ केली.. आणि आता राममंदिराच्या मुद्द्यावर महाराष्ट्राबाहैरही ते हिंदूंचा विश्वास जिंकतायत..
ReplyDeleteधन्यवाद जय महाराष्ट्र
DeleteOnly one shivsena.
ReplyDeleteJay Maharashtra
ReplyDelete