Saturday, 3 November 2018

गांधी घराणेशाही आणि ठाकरे घराणे वेगळे कसे?




लेखक : शशांक देशपांडे 

(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )


“वाघगर्जना: दिवाळी विशेष लेखमाला”

दिवस पहिला – लेख पहिला

गांधी घराणेशाही आणि ठाकरे घराणे वेगळे कसे?

देशाच्या राजकारणातील दोन अत्यंत महत्वाची घराणी म्हणजे गांधी आणि ठाकरे घराणं.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर नेहमीच गांधी घरण्यावर टीका केली.बाळासाहेबांच्या सोबतच शिवसेनेत कार्यरत झालेल्या शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्यावरही घराणेशाही म्हणून टीका झाली.उद्धव व आदित्य ठाकरेंच्या नियुक्तिनंतर विरोधक व इतर लोकांनीसुद्धा बाळासाहेबांवर टीका केली.गांधीं घराणेशाहीवरून टीकेची झोड उठवणार्‍या बाळासाहेबांनी स्वतः काय वेगळं केलं असे प्रश्न विचारले जाऊ लागले.मुळात ही टीका करण्यापूर्वी  गांधी घराणेशाही आणि ठाकरे घराणे वेगळे कसे हे समजून घ्यायला हवं.

गांधी घराणेशाहीवर बाळासाहेबांनी टीका केली ती प्रामुख्याने पंतप्रधान पदाच्या मुद्दयावरुन. गांधी घराण्यात आधी इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या.त्यानंतर राजीव गांधी.त्यांच्या निधनानंतर कॉंग्रेसकडून सोनिया गांधींच नाव पंतप्रधान पदासाठी पुढे येऊ लागलं.सोनिया गांधी मूळच्या इटलीच्या.त्यांचं मूळ परदेशी असल्यामुळे बाळासाहेबांनी त्यांच्या पंतप्रधान बनण्याला कडाडून विरोध केला.युपीए सरकारच्या शेवटच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली, पण त्यांच्या कार्यकाळातच पंतप्रधान पदासाठी राहुल गांधींच नाव पुढे येण्यास सुरुवात झाली.राहुल गांधीच्या नेतृत्वावर तर सर्वच स्तरांतून सडकून टीका झाली.राहुल गांधींवर “पंतप्रधानपद सोडा राहुल नेतृत्वाच्या लायकीचा नाही” अशी टीका बाळासाहेबांनी केली होती. साधा सरळ विचार केला असता गांधी घराणेशाहीत “पंतप्रधानपद” हा मुद्दा कॉमन दिसून येतो.

ठाकरे घराण्याच याउलट आहे.बाळासाहेब ठाकरेंसोबत आधी राज व नंतर उद्धव ठाकरे शिवसेनेत कार्यरत झाले.पुढे उद्धव ठाकरे शिवसेना कार्याध्यक्ष झाले व राज शिवसेनेतून बाहेर पडले.गेल्या ८-१० वर्षांत प्रामुख्याने युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेसुद्धा राजकरणात आले.यावरून शिवसेनेवर घराणेशाहीची टीका झाली. पुत्रप्रेमापोटी बाळासाहेबांनी राजना डावलून उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं असं म्हटलं गेलं.स्वतः राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका केली. असं असलं तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना कार्याध्यक्ष पदावर नियुक्ति राज ठाकरे यांनीच महाबळेश्वरच्या शिबिरात ठराव मांडून केली व त्यावेळी बाळासाहेब तिथे उपस्थित नव्हते.हा संपूर्ण किस्सा शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या भाषण व मुलाखतीतून अनेक वेळा सांगितलेला आहेच.

आदित्य ठाकरेंच नेतृत्व सुद्धा आधी विद्यार्थ्यांनी उभं केलं.शिक्षकांचा संप सुरू असताना विद्यार्थ्यांच नुकसान होत असल्याच लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांनीच आदित्य ठाकरेंना पुढाकार घेण्याची विनंती केली आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच एक शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला गेलं. राज्यपालांनी तो प्रश्न सोडवला. तिथेच आदित्य ठाकरेंच नेतृत्व पुढे आलं.पुढे युवासेनेची स्थापना झाली व आदित्य ठाकरे युवासेनाप्रमुख झाले. यात उद्धव ठाकरेंच तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष व सध्याच शिवसेना पक्षप्रमुख हे पद असेच आदित्य ठाकरेंच युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते हे पद पाहिलं असता ही पदे शिवसेना पक्षांतर्गत असल्याच सहज लक्षात येईल.स्वतः बाळासाहेबांनी सत्तेच कोणतंही पद घेतलं नाही.ठाकरे घराण्यात अजून एकही व्यक्ति सत्तेच्या सरकारी पदांवर बसली नाही.


तसं पाहिलं ठाकरे घराणे हे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्यापासून महाराष्ट्रसेवेत कार्यरत आहे. त्यांच्या हयातीतच शिवसेनेची स्थापना झाली व बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले.त्यांनातर उद्धव,राज आणि आदित्य ठाकरे कार्यरत झाले. बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून एक विचार महाराष्ट्राला आणि देशाला दिला.तो विचार पुढे नेण्याच काम शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आज उद्धवजी ठाकरे व युवासेनाप्रमुख,शिवसेना नेते म्हणून आदित्य ठाकरे करत असतील तर यात गैर ते काय? याशिवाय स्वतः बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंची नियुक्ति मान्य नसल्यास ती मी रद्द करतो असं सर्वांसमोर जाहीररीत्या म्हटलं होतं.शिवसेना पक्षप्रमुखसुद्धा शिवसैनिकांना जोपर्यंत माझं नेतृत्व मान्य असेल तोपर्यंत मी ते करेन असं अनेक वेळा जाहीर सभेत बोलले आहेत. त्यामुळे शिवसेनेत घराणेशाही लादली असल्याचा प्रश्नच येत नाही.याला घराण्याचा वारसा चालवण म्हणतात, आणि वारसा चालवण ही सोपी वा क्षुल्लक गोष्ट नसून ती अत्यंत जबाबदारीची व अवघड गोष्ट आहे.

गांधी घराण्यातसुद्धा पक्षाच्या अध्यक्षपदी बहुतांश वेळा गांधीच असण्याची परंपरा आहे.पक्षांतर्गत पदे व नेमणुका ही वेगळी बाब झाली मात्र तीच बाब जर देशातील महत्वाच्या अशा पंतप्रधान पदासाठी होत असेल तर हे चुकीच आहे.एकाच घरातील व्यक्ति पंतप्रधान होण्याची घराणेशाही ही देशहिताची नाही  व ते कदापि मान्य होऊ शकत नाही.देशातील महत्वाच्या पदांवर एकाच घराण्यातील नव्हे तर त्या पदासाठी योग्य आणि सक्षम असलेली व्यक्ती विराजमान झाली पाहिजे यातच देशहित आहे.म्हणूनच गांधीच्या पंतप्रधानपदाच्या घराणेशाहीला बाळसाहेबांनी कडाडून जाहीरित्या विरोध केला.



लेखक : शशांक देशपांडे 

(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )

6 comments:

  1. होय, बरोब लिहिले आहे आपण.मी आपल्या बरोबर सहमत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, जय महाराष्ट्र

      Delete
  2. स्वतः राज ठाकरेंनी उध्दवजींना पक्षप्रमुख करावे असा ठराव मांडला,, नंतर असा ठराव मांडून मी पायावर धोंडा मारून घेतला हे ही कबुल केले,, केली

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, जय महाराष्ट्र

      Delete