Sunday, 18 December 2016



"वाघगर्जना”

(माझा आजचा लेख:)

जातीयवादी सर्प ठेचायलाच हवा..!

अटलजी आओ,बीजेपी बचाओ..!

भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान असणाऱ्या अमित शहाचे आदिलशाही मनसुबे काल प्रसारमाध्यमांतून झळकल्याने भाजपतील अंतर्गत घडामोडी जगासमोर आल्या.गुजरात राज्यातून तडीपार करण्यात आलेल्या अमित शहाला महाराष्ट्रातील निष्कलंक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राजकीय अडचण होत असल्याच वृत्त आहे.अर्थात हा सगळा प्रकार भाजपचा अंतर्गत मामला असला तरी जातीयवादी अमित शहाच्या टकलावर तबला वाजवण्याची वेळ आता जवळ आलेली आहे.केवळ ब्राह्मण आहेत म्हणून फडणविसांना मुख्यमंत्री पदावरून हटवले जाणार असेल आणि मुख्यमंत्री पदावर मराठा व्यक्तीस बसवण्याचे गाजर दाखवून मराठा समाजाचा रोष शमवणे असा डाव अमित शहा रचत असल्याचे भाजपच्याच सूत्रांनी सांगितले आहे.हा प्रकार महाराष्ट्रात जातीयवाद भडकवणारा असून याची सर्वांनीच दखल घ्यायला हवी.तरच महाराष्ट्रात जातीयवादी विष पसरणार नाही.महाराष्ट्रहितासाठी हा जातीयवादी सर्प ठेचायलाच हवा..!

महाराष्ट्रात सध्या मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे.कित्येक वर्षांनी एकत्र आलेला मराठा समाज लाखोंच्या संख्येने क्रांती मोर्चाचा रुपात न्याय आणि हक्कासाठी पेटून उठलेला आहे.मराठा समाजाच्या या मोर्चात फक्त मराठा म्हणून एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन आयोजकांनी केलेलं असून या मोर्चांमध्ये सर्वच स्तरावरील लोक केवळ समाजाच्या हितासाठी एकत्र आलेले आहेत.मराठा क्रांती मोर्चा हा कोणत्याही जातीविरोधात नसून आपल्या हक्कांपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी उठवला जाणारा आवाज आहे.यात ब्राह्मण मुख्यमंत्री बदलून मराठा मुख्यमंत्री करण्याची मागणी कुठे आहे? मराठा मुख्यमंत्री करण्याचे गाजर दाखवून मराठ्यांचे आपल्या मागण्यांवरून लक्ष विचलित करायचे आणि मराठा मोर्चाचे लोण कमी करायचे असा अमित शहाचा डाव असावा.मराठा मुख्यमंत्री बसवण्याच्या गाजराला भुलून पेटून उठलेला मराठा शांत होणार नाही हे गुजरातच्या टकल्याने लक्षात घ्याव.

महाराष्ट्र शिवछत्रपतींचा मुलुख आहे.मराठा समाज हा छत्रपती शिवरायांच्या संस्कारात घडलेला आहे.शिवरायांनी कधीच जातीयवाद केला नाही.त्यांच्यासोबत स्वराज्याच्या लढाईत सर्वच जातीधर्माचे मावळे होते.“गोब्राह्मण प्रतिपालक” अशी कीर्ती असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेला मराठा समाज कधीच कोणत्याही जातीविरोधात नव्हता.त्यांच्या सध्या जो लढा सुरु आहे तो कोणत्याही जातीविरोधात नाही.मराठ्यांची माथी भडकावून आणि त्यांच्या मनात जातीयवादी विष कालवून महाराष्ट्र काबीज करण्याचा अमित शहाचा डाव असून मराठे त्याला भिक घालणार नाहीत.

शिवरायांच्या कार्यकाळापूर्वी मोगलांनी जो प्रकार करून महाराष्ट्र काबीज करण्याचा डाव यशस्वी केला होता तोच प्रकार आजही सुरु आहे.महाराष्ट्रातील लोकांना एकमेकांच्या विरोधात भडकावून त्यांना आपले सामर्थ्य परस्परांत भांडण्यात खर्च करायला लावून स्वतः महाराष्ट्रावर सत्ता गाजवायची असे मनसुबे अमित शहाचे आहेत.हे मनसुबे उधळून लावायला महाराष्ट्रातील मराठी माणूस समर्थ आहे.या मातीने अनेक विडे उचलणाऱ्यांना मूठमाती दिलेली आहे.शिवरायांच्या महानिर्वाणानंतर महाराष्ट्र काबीज करायला स्वतः औरंगजेब बादशहा महाराष्ट्रात उतरला होता.औरंगजेबाला महाराष्ट्र जिंकता आला नाहीच,मात्र त्या औरंग्याची कबर महाराष्ट्रातच बांधली गेली हा इतिहास अमित शहाने वाचला आहे काय?

महाराष्ट्रावर एकहाती सत्ता गाजवण्याचे दिवास्वप्न पाहणाऱ्या अमित दीडशहाण्याने म्हणे शिवसेनेच्या २० आमदारांना लालच दाखवून फोडायचा प्रयत्न केला होता.अरे गेंड्या,हा महाराष्ट्र आहे,ही शिवसेना आहे.इथे निष्ठेला किंमत आहे.शिवसेनेचे आमदार फुटणार नाहीत आणि फुटले तरी टिकणार नाहीत.मुळात शिवसेनेची ताकद ही आमदारांच्या संख्येवर अवलंबून नसून शिवसैनिकांच्या निष्ठेवर अवलंबून आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही सेना शिवरायांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन आणि रक्ताचं पाणी करून उभी केली आहे.तुमच्यासारखी फोडाफोडी करून शिवसेना उभी राहिलेली नाही.शिवसेना संपवायला निघालेले संपले,पण शिवसेना अजून जिवंत आहे आणि ज्वलंत आहे.

अमित शहा नामक टकल्या गेंड्याची कार्यपद्धती ही मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या निष्ठावंतांना मान्य नाही.फक्त प्रश्न एवढाच आहे की मोदी-शहा जोडीच्या विरोधात जाण्याच धाडस कोण दाखवणार? हे धाडस दाखवणारा पुढे येई तेंव्हा येईल,मात्र तो येईपर्यंत हा दीडशहाणा भारतीय जनता पक्षाची वाट लावणार हे निश्चित.आम्ही शिवसैनिक असलो तरी एकेकाळी मित्रपक्ष म्हणून भाजपच्या सोबत काम केलेलं आहे.आज भाजपमध्ये जे घडतय ते आम्हाला बघवत नाही.सत्तेचा माज,सत्तेची नशा चढण वाईट असत अस म्हणतात तेच खरं.अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणींच्या काळात अस कधी घडल नाही.आज खरचं अटलबिहारी वाजपेयींची भाजपला गरज आहे.अन्यथा बीजेपीचा विनाश अटळ आहे.अटलजी आओ,बीजेपी बचाओ..!



जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment