Sunday, 25 December 2016


“वाघगर्जना”

(कृतज्ञता दिन विशेष लेख:)

यावेळी सगळचं बदललय..!

लाख-लाख धन्यवाद..!

माझ्या फेसबुकवरील शिवसैनिक बांधवांनो..आज २५ डिसेंबर.आज “कृतज्ञता दिन”.आजपासून तीन वर्षांपूर्वी आम्ही लेखणी हातात घेतली.तेंव्हापासून ते आजपर्यंतचा हा तीन वर्षांचा अविरत प्रवास तुमच्या साथीने आणि सोबतीने यशस्वी झाला आहे आणि आपल्या कृपा-आशीर्वादाने तो यापुढेही अखंड सुरु राहील हीच आई तुळजाभवानी मातेचरणी प्रार्थना..!

आज लेखाच्याच माध्यमातून आपल्याशी संवाद साधावा,आपले आभार मानावेत म्हटलं.खरतर आजचा दिवस माझा नसून तुमचा आणि तुमचाच आहे.प्रत्येक लेख लिहिल्यानंतर त्याला मिळणारा प्रतिसाद हा आमच्यासाठी शक्तिवर्धक म्हणून काम करतो.त्यासाठी आपले सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.प्रत्येक लेखांवर लाईक,कमेंट्स आणि शेअर्सचा पाऊस पाडणाऱ्या माझ्या शिवसैनिक बंधू-भगिनींशी प्रत्येकवेळी संवाद साधून आभार मानण शक्य होत नाही.त्यासाठीच आज “कृतज्ञता दिन” हा आपल्या सर्वांचे आभार मानण्यासाठी आणि आपणास लाख लाख धन्यवाद देण्यासाठी प्रतिवर्षीप्रमाणेच आयोजित केला आहे.२५ डिसेंबर २०१३ रोजी सुरु झालेल्या माझ्या लेखांचं प्रकाशन आठवड्यात एक दिवस फेसबुक अकाऊंट आणि पेजेसवरून व्हायचं.सुरुवातीपासूनच लेखांना उदंड प्रतिसाद मिळाल्याने त्यातून प्रेरणा घेऊन २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या प्रचारातील खारीचा वाटा उचलायचा म्हणून लेखणीच्या माध्यमातून तोफा डागण्याच शिवधनुष्य आम्ही यशस्वीपणे पेलवल.

२०१४ साली आपले आभार मानण्याच्या उद्देशाने पहिल्यांदाच कृतज्ञता दिन साजरा झाला.ज्या दिवशी लेखणी हातात घेतली तो दिवसच या प्रवासात साथ देणाऱ्या शिवसैनिक बांधवांना अर्पण करण्याचा निर्णय घेत पहिला कृतज्ञता दिन आयोजित केला गेला.त्याच दिवशी या लेखमालेच नामकरण “वाघगर्जना” अस करण्यात आलं.त्यानंतर २०१५ साली कृतज्ञता दिनाच औचित्य साधून “वाघगर्जना” च्या ब्लॉगसाईट,ट्विटर,युट्युब आणि जीमेल अकाऊंटसचा मोठ्या थाटामाटात शुभारंभ करण्यात आला.या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे या चारही अकाऊंटसचा उद्घाटन सोहळा आम्हाला साथीदार म्हणून लाभलेल्या शिवसैनिकांच्या हस्ते पार पडला.ऑनलाईन पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याचे आपण साक्षीदार आहातच.

आज आम्ही हा प्रवास सुरु करून तब्बल तीन वर्षे लोटली आहेत.असं असलं तरी आपल्याला अजूनही हा प्रवास असाच सुरु ठेवायचा आहे.आता झालंय काय की मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांच्या आणि इतर ८ महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत.मुंबई आणि ठाण्यावर भगवा,भगवा आणि भगवाच फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.त्याचबरोबर इतरही आठ महानगरपालिका जिंकण्यासाठी आपल्याला जिवाच रान करायचं आहे.आपण सगळे आपापल्यापरीने प्रचाराचा धडाका उडवत आहातच.लवकरच त्यात आम्हीही सामील होऊ.यावेळी सगळचं बदललय..! सकाळपासून ते पार संध्याकाळपर्यंत आमच वेळापत्रक व्यस्त होऊन गेलंय.त्यामुळे आमच्या पोस्टचं प्रमाण कमी झाल असलं तरी “वाघगर्जना” मात्र अविरत घुमत आहे.वेळात वेळ काढून लेख लिहिण आम्ही सांभाळल आहे,मात्र ते पूर्वीइतके पसरवण्यासाठी वेळ देता येत नाही.काय करणार? असो.दिवसभर व्यस्त असलो तरी मन शांत नसतच.शिवसेनेवर टीका करणारी माकड पाहिली की व्यंगचित्र काढायला हात आतुर असतो.व्यंगचित्रकार नसलो तरी मागे आम्ही जी व्यंगचित्र काढलेली होती ती गाजली होती.ठीक आहे.नाहीतरी या किरीट सोमय्या,आशिष शेलार आणि अमित शहांची व्यंगचित्र काढायची गरजचं काय आहे? त्यांच्याकडे बघितलं तरी कार्टूनच दिसेल.     

तो टकला गेंडा अमित शहा मुंबई स्वबळावर जिंकण्यासाठी डावपेच आखतोय.पंतप्रधान मोदीही मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी प्रचारात उतरणार असल्याच वृत्त आहे.अहो,तुमच्या सगळ्या फौजा घेऊन या,पण एक लक्षात ठेवा गाठ शिवसैनिकांशी आहे.तुम्हाला धूळ चारल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही.येत्या वर्षातील या दहा महानगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा स्वबळावर फडकवायचा असल्यास त्याच्या तयारीला आत्तापासूनच लागायची गरज आहे.त्यासाठी आपण सगळे अहोरात्र झटत आहातच.आम्हीही लवकरात लवकर या रणमैदानात उडी घेत विरोधकांना पळता भुई थोडी करू असं आपणा सर्वांना वचन देतो.नेहमीप्रमाणे “वाघगर्जना” बुलंद करण्यासाठी आपली साथ लाभेल अशी अपेक्षा आणि विश्वास व्यक्त करतो.आपणा सर्वांना लाख-लाख धन्यवाद देतो.आपणा सर्वांना कृतज्ञता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन तूर्तास आपली रजा घेतो.लाख-लाख धन्यवाद..!



जय महाराष्ट्र..!             

No comments:

Post a Comment