(माझा आजचा लेख:)
स्वबळाची व्याख्या काय?
मोदीजी याच..!
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानुसार भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला.भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले.नेहमीप्रमाणे या वेळीही यशामुळे भाजप नेत्यांचा अतिउत्साह ओसंडून वाहिला.भाजपच्या अनेक नेत्यांनी आगामी वर्षात होणार महाराष्ट्रातील प्रमुख दहा महानगरपालिकांच्या निवडणुकांत स्वबळावर लढण्याचा मानस व्यक्त केला.त्यासाठी त्यांना शुभेच्छा,पण आमच्या मनात काही प्रश्न आहेत.त्या प्रश्नांची उत्तरे भाजप नेत्यांना देता आली तर आमचं शंकानिरसन होईल.त्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे भाजपची स्वबळाची व्याख्या काय? एखाद्या पक्षाने स्वतंत्र राहून निवडणूक लढवल्यास त्या पक्षाने ती निवडणूक स्वबळावर लढवली अस म्हटलं जातं. उदाहरणार्थ, शिवसेनेने २०१४ साली झालेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली.भाजप नेते नेहमीच स्वबळाचा शंख फुंकत असतात.प्रत्यक्षात मात्र भाजप स्वबळावर लढताना दिसत नाही.
२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढत प्रचंड यश मिळवलं,मोदींच्या लाटेत भाजपचे तब्ब्ल १२३ ओंडके तरंगले असं नेहमीच बोललं जात.प्रत्यक्षात मात्र भाजपने स्वबळावर निवडणूक लढवलीच नाही.त्यांच्यासोबत रिपाई(आ), स्वाभिमानी शेतकरी संघटना,राष्ट्रीय समाज पक्ष,शिवसंग्राम असे तब्बल चार मित्रपक्ष होते.शिवाय एवढं करूनही जिथं उमेदवार देता येत नव्हता तिथे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयात उमेदवारांना भाजपचं लेबल चिकटवून निवडणुकीत उतरवलं होत.आता महायुतीत जनसुराज्य पक्षाचीही भर पडली आहे.असं असताना भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असं कसं म्हणता रावं? स्वबळाच्या नावाखाली तब्बल सहा पक्ष एकत्र येऊन शिवसेना संपवण्याचा डाव रचणे आणि महाराष्ट्र काबीज करणे आणि नंतर त्याची शकले करून वेगळा विदर्भ,वेगळी मुंबई करणे हा भाजपचा मनसुबा आहे.
या प्रश्नासोबतच आमच्या मनात सध्या अजून काही प्रश्न आहेत.मुंबई-ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढण्याइतपत उमेदवार आणि कार्यकर्ते भाजपकडे आहेत काय? बाकीच्या पक्षातील उमेदवार फोडूनही भाजपाला सगळ्या जागांवर उमेदवार देता येतील काय? मित्रपक्षांना गाजर दाखवून सोबत घेण्याचा प्रकार यावेळीही पाहायला मिळणार आहे काय? जवळपास संपलेल्या मनसेला सोबत घेऊन राज ठाकरेंच्या भाषणबाजीचा वापर शिवसेनेविरोधात करून मराठी मतात फूट पाडण्याचं आणि मुंबई बळकावण्याचं स्वप्नं भाजप नेत्यांना सतावतंय काय? या प्रश्नांची उत्तरं जर "हो" अशी असतील तर भाजपकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याइतपत सामर्थ्य नाही असच म्हणावं लागेल.असो.तुमच्या "त्वबलाला" शुभेच्छा.भाजपने मुंबई आणि ठाणे महानगरपालिका संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर (म्हणजे भाजप,रासप,रिपाई(आ.),स्वा.शे.संघटना,शिवसंग्राम,मनसे,जनसुराज्य (अजून कोणी राहिलं काय?) मिळून) लढवावी.इतक्या पक्षांची मोट बांधल्यावर प्रचारकार्य सोपे व्हावे म्हणून या महायुतीचा झेंडा पांढरा ठेवावा.त्याचे दोन फायदे होतील.एक तर सर्व पक्षांना त्यांच्या झेंड्यातील रंग महायुतीच्या झेंड्यात असल्याचे समाधान लाभेल,कारण सगळे रंग मिसळल्यास पांढरा रंग तयार होतो.दुसरं म्हणजे शिवसेनेच्या वाघाचे "फटकारे" बसल्यानंतर आणि शिवसेना विजयी झाल्यानंतर हाच पांढरा झेंडा फडकवून पराभव मान्य (भाजपकडे तेवढं मोठ मन आहे काय?) करता येईल.
या प्रश्नासोबतच आमच्या मनात सध्या अजून काही प्रश्न आहेत.मुंबई-ठाण्यात स्वबळावर निवडणूक लढण्याइतपत उमेदवार आणि कार्यकर्ते भाजपकडे आहेत काय? बाकीच्या पक्षातील उमेदवार फोडूनही भाजपाला सगळ्या जागांवर उमेदवार देता येतील काय? मित्रपक्षांना गाजर दाखवून सोबत घेण्याचा प्रकार यावेळीही पाहायला मिळणार आहे काय? जवळपास संपलेल्या मनसेला सोबत घेऊन राज ठाकरेंच्या भाषणबाजीचा वापर शिवसेनेविरोधात करून मराठी मतात फूट पाडण्याचं आणि मुंबई बळकावण्याचं स्वप्नं भाजप नेत्यांना सतावतंय काय? या प्रश्नांची उत्तरं जर "हो" अशी असतील तर भाजपकडे स्वबळावर निवडणूक लढवण्याइतपत सामर्थ्य नाही असच म्हणावं लागेल.असो.तुमच्या "त्वबलाला" शुभेच्छा.भाजपने मुंबई आणि ठाणे महानगरपालिका संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर (म्हणजेभाजप,रासप,रिपाई(आ.),स्वा.शे.संघटना,शिवसंग्राम,मनसे,जनसुराज्य (अजून कोणी राहिलं काय?) मिळून) लढवावी.इतक्या पक्षांची मोट बांधल्यावर प्रचारकार्य सोपे व्हावे म्हणून या महायुतीचा झेंडा पांढरा ठेवावा.त्याचे दोन फायदे होतील.एक तर सर्व पक्षांना त्यांच्या झेंड्यातील रंग महायुतीच्या झेंड्यात असल्याचे समाधान लाभेल,कारण सगळे रंग मिसळल्यास पांढरा रंग तयार होतो.दुसरं म्हणजे शिवसेनेच्या वाघाचे "फटकारे" बसल्यानंतर आणि शिवसेना विजयी झाल्यानंतर हाच पांढरा झेंडा फडकवून पराभव मान्य (भाजपकडे तेवढं मोठ मन आहे काय?) करता येईल.
आणखी एक अतिमहत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा.मुंबई,ठाण्यात आणि पुण्यात साक्षात पृथ्वीतलावरील सर्वात मोठ्या पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची बातमी आहे.मुंबईवर भाजपचाच झेंडा फडकावा यासाठी भाजपचे देशभरातील राष्ट्रीय,राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय,तालुकास्तरीय नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री,आमदार,खासदार रिंगणात उतरण्याचीही शक्यता आहे.पंतप्रधान मोदी या लढाईचे नेतृत्व करण्यासाठी आणि भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी येऊन सभा घेण्याचीही शक्यता आहे.मोदीजी याच..! गाठ शिवसेनेशी आहे.विधानसभेला वाघाच्या तावडीतून सुटला असाल,पण आता नाही.महाराष्ट्रात तुमचे जेवढे आमदार आहेत त्याच्या दुप्पट मुंबईत शिवसेनेच्या शाखा आहेत.प्रत्येक शाखेत शेकडो-हजारो शिवसैनिक आहेत.महत्वाचं म्हणजे शिवसेनेची पक्षबांधणी अगदी मजबूत आहे.मराठी,महाराष्ट्र आणि मुंबई यासाठी शिवसेनेने कायम जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी केलेलं आहे.मुंबईतील मराठी आणि हिंदू शिवसेनेच्या पाठीशी आहे.आम्ही पॅकेजचे गाजर दाखवून नव्हे तर आम्ही केलेल्या विकासकामांच्या बळावर जनतेचा विश्वास जिंकणार आहोत.तेंव्हा मोदीजी,तुम्ही याच.एकटं नको,फौजफाटा घेऊन या.तुम्हाला शिवरायांच्या गनिमी काव्याची पुनरावृती करून धूळ चारायला आणि मुंबई जिंकायला शिवसैनिक समर्थ आहे.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment