Saturday, 10 September 2016



"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

विलास शिंदेंच हौतात्म्य..!

त्यांच्या खांडोळ्या करा..!

मुंबईत धर्मांध गुंडाच्या भ्याड हल्ल्यात जबर जखमी झालेल्या वाहतूक पोलीस दलातील विलास शिंदेंची मृत्यूशी सुरु असलेली झुंज तब्बल आठ दिवस चालूच होती.आपल कर्तव्य बजावत असताना धर्मांध मवाली आणि गुंड प्रवृत्तीला भिक न घालता विलास शिंदे यांनी हौतात्म्य पत्करलं.कर्तव्यनिष्ठा न सोडता मागून केलेला भ्याड वार झेलत पत्करलेलं विलास शिंदे याचं हौतात्म्य जगाला खूप काही शिकवून जात.अशा या जिगरबाज आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास आम्ही सलाम करतो.अशाच कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमुळे आज आपण आपापल्या घरात,शहरात आणि राज्यात सुरक्षित आहोत.महाराष्ट्र पोलिसांवर नेहमीच प्रचंड टीकाही होत असते,मात्र हैदोस घालणाऱ्या धर्मांध मवाल्यांना न जुमानता,त्यांची गुंडगिरी मोडून काढत प्राण गेले तरी कर्तव्यात कसूर न पडू देणारे विलास शिंदे आणि इतरही जिगरबाज पोलीस अधिकारी आजही आपल्या महाराष्ट्र पोलीस दलात आहेत आणि राज्यात जेवढी शांतता आणि सुव्यवस्था आहे ती त्यांच्यामुळे आणि त्यांच्यामुळेच आहे हे विसरुन चालणार नाही.   

महाराष्ट्रात पोलिसांवर हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाही.यापूर्वीही अनेकदा असे प्रकार झालेले आहेत.मुंबईत निघालेल्या रझा अकादमीच्या मोर्चातही पोलिसांना मारहाण केली गेली होती.इतकच नव्हे तर शहीद जवान स्मारकाला लाथाडण्याची मस्ती आणि उद्दामपणा धर्मांधांनी दाखवून दिलेला होता.अशा घटनांमुळे चक्क पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.जे पोलीस सर्वांना सुरक्षित ठेवतात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित व्हावा अशी परिस्थिती का निर्माण झाली? कायदे मोडणाऱ्यांना आणि शांतता भंग करणाऱ्यांना “पोलिसी खाक्या” दाखवून वठणीवर आणणे हे पोलिसांचं काम आहे,मात्र सध्या अनेकदा पोलिसांनाच धर्मांधांचा आणि गुंडांचा मार खावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते.याचा अर्थ काय घ्यायचा? ज्या राज्यात पोलिसच सुरक्षित नाहीत त्या राज्यातील सामान्य जनता सुरक्षित आहेत असं कसं म्हणता येईल?

पोलीस हे समाजात शांतता-कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी घरदार सोडून आणि सण-वार,वेळ-काळ न पाहता अहोरात्र झटत असतात.धर्मांधांना,गुंडांना आणि मवाल्यांना कायद्याचा धाक दाखवून सरळ करण हे पोलिसांचं काम आहे.त्यासाठी कायदेही आहेत.सर्वांनी कायद्यानुसार चालावं आणि कायद्याचा भंग होऊ नये याची खबरदारी पोलिसच घेत असतात.त्यामुळे पोलिसांना “कायद्याचे रक्षक” असं म्हटल जातं.असं असलं तरी अनेकवेळा या कायद्यांमुळेच पोलिसांचा घात होतोय.आपल्या पोलिसांकडे पुरेशी शस्त्रे नाहीत.असतील तर अत्याधुनिक नाहीत.स्वतःच्या बचावासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सुविधा नाहीत.मुळात हे सगळ असलं—नसल तरी कुठे फरक पडतोय? आपले जिगरबाज पोलीस जीवाची पर्वा न करता लढायला आणि प्रसंगी शहीद व्हायलाही तयार आहेत,मात्र त्यांना लढायचा आदेशच दिला जात नाही.आदेश मिळाल्याशिवाय काही केलं तर पोलिसांवरही गुन्हा दाखल होऊ शकतो.आदेश मिळणं आणि त्यानुसार कारवाई होण हा कायद्याचा भाग असला तरी आदेश मिळेपर्यंत पोलिसांनी मार खावा असा याचा अर्थ नाही.समोरच्याने पोलिसांवर हात टाकायचा प्रयत्न केला तरी तो हात जागीच धडावेगळा करण्याचा अधिकार पोलिसांना हवा.तरच अशा धर्मांध आणि गुंडावर कायद्याचा वचक बसेल आणि तरच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील आणि राज्यात शांतता नांदेल.

महाराष्ट्र पोलीस असोत किंवा हिंदुस्थानी जवान असोत,सगळेच महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी बलिदान द्यायला तयार आहेत.आपल्या मातीसाठी लढायला आणि प्रसंगी मरण पत्करायला हे पोलीस आणि जवान कदापि मागेपुढे पाहणार नाहीत, मात्र काही कारण नसताना अशा वीरांच रक्त का सांडलं जावं? फडतूस मवाल्यांच्या हल्ल्यात या जिगरबाज पोलिसांनी आपले प्राण का गमावावेत? हे थांबलंच पाहिजे.पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना कठोर शासन झालचं पाहिजे.पोलिसांवर हात उचलणाऱ्यांना पकडा आणि त्यांच्या खांडोळ्या करा.त्यांच्या शरीराचे तुकडे कोल्हया-लांडग्यांना खायला टाका.ही शिक्षा फक्त दोन-चार वेळा अंमलात आणून बघा.पोलिसांवर हात टाकायची आणि कायदे मोडायची हिंमत कोणीही कधीही करणार नाही.नुसते न्यायालयात खटले टाकल्याने आणि कोठडीत डांबल्याने यांची मस्ती उतरणार नाही.त्यांना मृत्युदंडच हवा.


जय महाराष्ट्र..!    

No comments:

Post a Comment