(माझा आजचा लेख:)
दिव्यांगांचा दिव्यपराक्रम..!
हम भी कुछ कम नही..!
ब्राझील देशात नुकतीचच खेळांचा महाकुंभ म्हणून नावजलेली आणि अत्यंत प्रतिष्ठेची अशी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली.त्यात हिंदुस्थानी पथकाला केवळ दोनच पदके मिळाली.ऑलिम्पिक स्पर्धेत जाऊन पदक पटकावण आणि तिरंगा फडकावण सोपं नसलं तरी अशक्य नक्कीच नाही.याच ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता झाल्यानंतर अल्पावधीतच दिव्यांग खेळाडूंसाठी भरणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत हिंदुस्थानी पथकाने अत्यंत चमकदार कामगिरी केलेली पाहायला मिळाली.त्यांच्या या कामगिरीच्या बळावर आजपर्यंत हिंदुस्थानला पॅरालिम्पिक – २०१६ स्पर्धेत चार पदकं मिळाली आहेत.दिव्यांगांचा हा दिव्यपराक्रम निश्चितच कौतुकास्पद,अभिमानास्पद आहे.हिंदुस्थानच्या दिव्यांग खेळाडूंनी यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण,एक रौप्य आणि एक कांस्यपदक पटकावत “हम भी कुछ कम नही” हे दाखवून दिलेलं आहे.
काही दुर्दैवी अपघातांमुळे किंवा जन्मतःच वाट्याला आलेल्या शारीरिक व्यंगावर मात करत,त्यामुळे होणाऱ्या टिंगलटवाळीवर मत करत पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंगा डौलान फडकवण्याची कामगिरी हिंदुस्थानी दिव्यांग खेळाडूंनी केली आहे.त्यासाठी प्रचंड मेहेनत,जिद्द आणि लढवय्या बाणा दाखवण अत्यंत महत्वाच ठरत.हिंदुस्थानी दिव्यांगांची ही नेत्रदीपक,दिग्विजयी कामगिरी प्रत्येकालाच आयुष्य कस जगावं आणि आयुष्यात कसं लढाव आणि जिंकावं हे दाखवून देणारी आहे.आजकाल अनेक धडधाकट,तरुण-तरुणी हे अगदी लांच्छनास्पद जीवन जगतात.ज्या वयात कष्ट करायचे,घाम गाळायचा त्या वयात आजकाल असे लोक लोकल ट्रेन,रेल्वे किंवा मंदिराबाहेर भिक मागताना दिसतात.काहींवर अत्यंत दुर्दैवी परिस्थितीमुळे ती वेळ आलेली असते,मात्र आजकाल भिक मागण हा सुद्धा एक धंदा बनला आहे.हे कसलं जीवन?
ज्यांच्याकडे धडधाकट शरीर आहे त्यांनी घाम गाळायला,कष्ट करायला काय हरकत आहे? मुळात अशा वेळी मिळेल ते काम करण्याची तयारी असावी लागते.आज कष्टात काढलेल्या दिवसांमुळेच उद्याचे सोन्याचे दिवस येत असतात.अनेकदा अगदी उच्चशिक्षित तरुण-तरुणींना “तुम्ही काय करता?” हा प्रश्न विचारल्यावर मिळणारं उत्तर फारच दुर्दैवी असतं.ते उत्तर असतं “इंजिनियरींग झालय,नोकरी मिळत नाहीये त्यामुळे सध्या निवांत आहे.” असं निवांत राहून कसं चालेल हो? बर,त्यापुढचा भाग तर आणखी चक्रावून टाकणारा असतो.त्यांना पुढचा प्रश्न विचारायचा “पुढे काय करणार मग?”.उत्तर मिळत “माहिती नाही,काय करावं तेच कळत नाही”.आता एवढ शिकून आणि मोठ होऊन पुढे काय आणि कस करायचं कळत नसेल तरं एवढ शिकून उपयोग काय? त्याचा उपयोग कधी करणार? नुसतं कोणत्या तरी कंपनीच्या जॉबची ऑफर घेऊन तो जॉब करण म्हणजे जीवन आहे का? बर,एक-दोन कंपन्यांनी जॉब नाकारला तर निराश होऊन घरी बसणारे वेगळेच.त्यांच एकच चालू होत “आपलं काही होऊ शकत नाही.”तुम्ही घरी बसणार तर तुमच काही कसं होणार?
हिंदुस्थानात बेरोजगार युवावर्ग प्रचंड मोठा आहे.या युवावर्गातून अनेकदा थेट हिंदुस्थानलाच जबाबदार धरत बेरोजगारीच खापर देशावर फोडल जातं.“हिंदुस्थानात असच होत राहणार.जॉब नाहीत,हिंदुस्थानात आम्हाला भविष्य नाही.” असा नाराजीचा सूर आळवत आजकाल बेरोजगार आयुष्य जगत असतात.नव्हे,आयुष्य एक-एक दिवसाने पुढे ढकलत असतात.जीवनांत करण्यासारख किती काही असतं.ते विसरून फक्त “जॉब करण म्हणजे जीवन” अस समजून आजकाल बेरोजगारांची वाटचाल सुरु असते.विशेषतः मराठी बेरोजगारांनी तर स्वतःचा उद्योग सुरु करण्याचा निदान प्रयत्न केल्याचीही उदाहरणे अत्यल्प आहेत.सगळ्यांना जॉब पाहिजेत.जॉब कुठून येणार? जॉब कंपन्या देतात.तुम्हाला कंपनी जॉब देत नाही तर तुम्ही एखादी कंपनी काढा आणि इतरांना जॉब द्या.त्यासाठी धाडस जरूर लागत.आधी छोटी कंपनी सुरु करायची आणि तोटा झाला तरी तो सहन करायचा.जिद्दीने आणि मेहेनतीने ती मोठी करायची.यात सर्वात महत्वाची गोष्ट असते ती संयम.संयम नसला तर उद्योग करणच अवघड आहे.उद्योग क्षेत्रात काहीच झटपट होत नसत.त्यासाठी झाडाचं उदाहरण घेता येईल.औदुंबर,वड,पिंपळ,आंबा कोणतही झाड असो,ती आधी “बी”च असते ना? मग त्याच रोपट होत.अनेक वर्षे उन,वारा,पाऊस सहन केल्यानंतर मग त्याचा मोठा वृक्ष होतो.तसचं उद्योगाचं आहे.“आपल काही होऊ शकत नाही” असं म्हणत घरी बसलात तर काहीच होणार नाही.
हिंदुस्थानी पॅरालिम्पिकवीरांची कामगिरी ही इतर दिव्यांगांनाही प्रेरणादायी आहे.दिव्यांग आहोत म्हणून निराश होण्यापेक्षा आणि आयुष्यभर रडत जीवन जगण्यापेक्षा जिद्द आणि मेहेनेतीच्या बळावर जग जिंकून दाखवलं तर तुमचं आयुष्यही सोनेरी होऊ शकत.जन्मतःच दिव्यांगत्व असण हा आपला दोष नसतो.त्यावर मात करता यायला हवी.दिव्यांगत्व हे अपघातात एखादा अवयव निकामी झाल्याने येऊ शकत,पण तस झालं म्हणजे सगळ संपल अस नाही.दिव्यांगत्व येण हे बहुतांश वेळा आपल्या हातात नसतच.ते दुर्दैवानेच येत असतं.आजपर्यंत धडधाकट आणि सुदृढ असलेल्या व्यक्तीलाही उद्या अपघात झाल्यास दिव्यांगत्व येऊ शकत.दिव्यांगत्व येण हे दुर्दैवी असलं तरीही तो काही शाप नाही.जीवनात कधीच हर मानायची नसते.जिद्दीने,प्रामाणिकपणे मेहेनत केल्यास एक न एक दिवस यश मिळतच.
दिव्यांग आणि इतरांमध्ये काय फरक असतो? दिव्यांगांना एखादा अवयव कमी शारीरिक क्षमतेचा असतो अथवा निकामी झालेला असतो किंवा शरीरापासून वेगळा आलेला असतो.असं असल तरी काहीतरी करून दाखवायची इच्छा आणि तयारी असेल,जिद्द आणि मेहेनत करण्याची तयारी असेल तर दिव्यांग व्यक्तीही सामन्यांच्या बरोबरीने किंवा त्यापुढे जाऊनही यशाची शिखरे गाठू शकतात.उदाहरण घ्यायचे झाल्यास रिओ ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला मिळालेल्या पदकांची संख्या ही दिव्यांग खेळाडूंनी रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत आजपर्यंत मिळवलेल्या पदकांच्या संख्येच्या निम्मी आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढत यश मिळवण्याची जिद्द असेल तर यश तुमचच आहे हेच सिद्ध होत.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment