"वाघगर्जना"
(माझा आजचा लेख:)
धर्मांधांचे थैमान..!
ही विषवल्ली ठेचायलाच हवी..!
काल फ्रान्समध्ये मानवतेला आणि माणुसकीला काळिमा लावेल असा अत्यंत निर्दयी आणि क्रूर दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्यात बॉम्ब किंवा बंदूक न वापरता दहशतवाद्यांनी चक्क ट्रक अंगावर घालत तब्बल ८४ निष्पापांचा बळी घेतला.त्याचबरोबर जवळपास ११५ लोक या दुर्दैवी प्राणघातक हल्ल्यात जखमी झाले.फ्रान्समधील नीस या शहरात फ्रान्समधील राष्ट्रीय सण “बास्तील डे” साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहाने जमलेल्या निरपराध नागरिकांना या हल्ल्यात लक्ष केले गेले.बेसावध असताना झालेल्या क्रूर हल्ल्यात फ्रान्सचे ८४ नागरिक मारले गेले.हल्ल्याच्या वेळी अतिरेक्याने कार्यक्रमस्थळी जमेल्ल्या गर्दीत सुसाट वेगाने ट्रक घालत हल्ला केला.यात बळी पडलेल्यांना वेगाने ट्रक चालवत २ किमी अंतरापर्यंत फरपटत नेले.या क्रूर हल्ल्याचे वृत्त पसरताच हल्ल्याची सर्वत्र निंदा झाली.
फ्रान्सवर झालेला हा हल्ला गेल्या दीड वर्षांतील तेरावा हल्ला आहे.फ्रान्सने अमेरिकेच्या इसिस विरोधी मोहिमेस खुले समर्थन दिलेले आहे.तसेच फ्रान्सने धर्मांधांचा नायनाट करण्यासाठी १० हजार सैनिकांची फौज तैनात केलेली आहे.याचा बदला घेण्यासाठी म्हणून इसिसने फ्रान्सला प्रमुख लक्ष केले आहे.त्याच पार्श्वभूमीवर अल कायदाच्या जूनमध्ये प्रकाशित झालेल्या “इन्स्पायर” मासिकात फ्रान्स हल्ल्याची धमकी देण्यात आलेली होती.गर्दीत ट्रक घुसवा आणि गवत कापल्यासारखी माणसे कापा असा संदेश या मासिकातून अल कायदाने दिलेला होता.नेमका तसाच हल्ला काल फ्रान्सवर झाला आहे. या मासिकात प्रत्येक अंकात हल्ल्याच्या तीन नवीन योजना सांगितल्या जातात.मे महिन्याच्या अंकात पार्सल-पॅकेज बॉम्ब, मॅग्नेट कारबॉम्ब आणि डोअर ट्रॅप बॉम्ब यांचा उल्लेख होता.याच चिथावणीखोर मासिकातील मार्ग अवलंबून आज नराधम निष्पापांचा जीव घेत आहेत.
इस्लामी धर्मांधांचे हे वाढते हल्ले केवळ फ्रान्सच नव्हे तर जगासाठी चिंतेचा विषय बनले आहेत.मुस्लीम लोकसंख्या नगण्य असलेले देश हे या जिहाद्यांचे लक्ष बनत आहेत.धर्माच्या नावाखाली ही विषवल्ली जगभर फोफावते आहे.असा हल्ला झाला कि अवघी दुनिया हादरते आणि हळहळते.सर्वत्र हल्ल्याचा निषेध केला जातो.दहशतवादी संघटनांना तीव्र शब्दात इशारे दिले जातात.हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि मदतही केली जाते.या सगळ्या गोष्टी हल्ला झाल्यावर सुरु होतात आणि हल्ल्यानंतर काही दिवसात संपतात.हल्ल्याचा निषेध करून किंवा इशारे देऊन हे हल्ले थांबणार नाहीत.त्यासाठी जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढायला पाहिजे.हे करण कदाचित अवघड असेल पण अशक्य नक्कीच नाही.या धर्मांध जिहाद्यांना आवर घालणे विश्वशांतीसाठी अत्यावश्यक आहे.हा लढा सर्वच देशांनी एकजुटीने लढायला हवा.या धर्मांध जिहाद्यांना जहन्नुममध्ये पाठवायला हवं.अन्यथा जगाचा विनाश अटळ आहे.या धर्मांधांना दुसरी भाषा समजणार नाही,किंबहुना त्यांना ती समजूनच घ्यायची नाही.तेंव्हा त्यांना समजावण्यात काहीच अर्थ नाही.जिहादच्या नावाखाली वाढणारी ही विषवल्ली ठेचायलाच हवी.
जगभर पसरत असलेले धर्मांधांचे हे थैमान आज फ्रान्समध्ये विध्वंस करत असून तीच वेळ उद्या बाकीच्या देशांवरही येणार आहे.हिंदुस्थानची स्थितीही काही फारशी वेगळी नाही.इथेही हिरवा दहशतवाद फोफावत आहे.मतांच्या लाचारीसाठी दहशतवाद्यांच्या दाढ्या कुरवाळत बसण बंद केल नाही तर एके दिवशी हिंदुस्थानात हिंदूंनाच जगण मुश्कील होईल.आजही हिंदुस्थानात असे जिहादी पकडले गेल्याच्या घटना घडत आहेतच.त्यांना पकडून चौकशी न करता थेट गोळ्या घातल्या पाहिजेत.देशाच्या मुळावर येणारी औलाद एक क्षणही जिवंत राहता कामा नये.जग काय करेल ते करेल,पण आपल्या हिंदुस्थानात शांतता नांदवायची असेल तर हा दहशतवाद मुळासकट उखडून फेकायला हवा.
दहशतवादाचा मुकाबला करायचा झाल्यास तो शांततेने करता येणार नाही.त्यासाठी साम,दाम,दंड आणि भेद अशा सर्वच शक्तींचा आणि ताकदीचा वापर करावा लागेल.ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याच्याशी बोलायला हवं.जगाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी या धर्मांध औलादींचे रक्त सांडावे लागले तर त्यात गैर काय आहे? त्यांचे रक्त वाचवण्याच्या नादात रोज निरपराध लोकांच्या रक्ताचे पाट वाहताना शांत बसून पाहत राहणे हा अक्षम्य गुन्हा आहे.फ्रान्सच काय तर आजवर जगभरात झालेल्या हल्ल्यात जीव गमावलेल्या निरपराधांना आणि शहिदांना खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर हा धर्मांध हिरवा दहशतवाद ठेचायालाच हवा.तर,तर आणि तरच त्या निरपराध जीवांच्या आत्म्यांना शांती लाभेल.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment