Friday, 8 July 2016





"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

मिशन २२८..!

मुंबई शिवसेनेचीच..!

मुंबई महानगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे भाजपचे दिवास्वप्नात रममाण झालेले नेते शिवसेनेवर टीका करून निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.लोकसभा निवडणूक स्वबळावर जिंकल्याने आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे तेवढ प्रचंड यश मिळाल्याने भाजप नेते आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर विजय मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत.मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यश मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून मते मागण्याऐवजी ते शिवसेनेवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत.मोदी लाटेत मिळालेल्या विजयाने हुरळून गेलेल्या भाजप नेत्यांना मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर जिंकण्याच्या विचारानेच गुदगुल्या होत आहेत.त्यामुळे अतिउत्साहाच्या भरात ते शिवसेनेवर तोंडसुख घेऊन प्रसिद्धी मिळवत आहेत

यात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आघाडीवर आहेत.त्यांनी मुंबईतील भाजपच्या मेळाव्यात बोलताना शिवसेनेला उद्देशून राक्षसावर वार करून त्याला मोठा करू नका,त्याला बाटलीत बंद करा आणि दुर्लक्ष करून संपवा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.त्याच मेळाव्यात महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठींब्यावर मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या देवेंद्र फडणविसांनी शिवसेनेवर “प्रायव्हेट लिमिटेड” पक्ष असल्याची टीका करत महानगरपालिका निवडणुकीत भाजपला कोणीही रोखू शकत नाही असे वक्तव्य करून कार्यकर्त्यांत हवा भरली.त्या हवेत तरंगत कार्यकर्त्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या मिशन - ११४ ची घोषणा केली.आगामी निवडणुकीत भाजपचाच महापौर बसवण्यासाठी सुरु असलेला भाजपचा हा आटापिटा पाहता त्यांची स्थिती “उतावळा नवरा,गुढग्याला बाशिंग” या म्हणीप्रमाणे झाली आहे असे दिसते.

मुंबई महानगरपालिकेवर गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून शिवसेनेचा भगवा सदैव फडकत आहे.मुंबईला मुंबई हे नाव देण्यापासून ते आजपर्यंत शिवसेनेने मुंबईसाठी अनेक विकासकाम केलेली आहेत.शिवसेनेचं हे कार्य विसरून भाजपच्या भूलथापांना बळी पडून भाजपला मतदान करायला मुंबईकर जनता खुळी नाही.त्यामुळे शिवसैनिकांनी भाजपप्रमाणे “मिशन ११४” न ठेवता मुंबईतील सर्वच्या सर्व २२८ जागांवर शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागावे.छत्रपती शिवराय मावळ्यांच्या बळावर हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकतात तर शिवसेना शिवसैनिकांच्या बळावर मुंबईत शिवराज्य का नाही आणू शकणार? मुंबई शिवसेनेचीच होती,आहे आणि राहील ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे.त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर विजय मिळवेल हे सुनिश्चित आहे.शिवसेनेचा हा विजय महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातील बदलाची नांदी ठरेल.तसेच २०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत येणाऱ्या भगव्या वादळाची चाहूल ही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत लागेल.मुंबईत शिवसेनेने विकासकामे केलेली असून जनहितासाठी झटणाऱ्या शिवसेनेला विजयाची खात्री आहे.त्यामुळे शिवसेनेने केवळ ११४ जागांचे लक्ष न ठेवता “मिशन – २२८” चे लक्ष ठेऊन संपूर्ण मुंबई भगवी करावी.

मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येऊ लागल्याने नेहमीप्रमाणे विरोधकांच्या तोंडाची गटारे वाहू लागली आहेत.त्यात इतकी वर्षे शिवसेनेच्या कृपेने मुंबईचे उपमहापौरपद भूषवलेल्या भाजपच्या नालेवाल्यांची भर पडलेली आहे.तमाम मुंबईकर जनतेने या सांडपाण्यामुळे आपल मन दुषित होऊ न देता शिवसेनवर पुन्हा एकदा विश्वास ठेवावा आणि शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी कराव.अन्यथा मुंबईत पुन्हा एकदा लुंगीवाल्यांचे,भैय्यांचे आणि गुजरातींचे वर्चस्व निर्माण होईल.मराठी माणूस हक्काच्या मुंबईत उपरा होईल.प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसाला डावलल जाईल आणि सर्वात महत्वाच म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी टपलेले कोल्हे आणि लांडगे पुन्हा आपलं डोकं वर काढतील.शिवसेनेला मुंबईची सत्ता आजवर जनतेच्या कृपा-आशीर्वादाने मिळाली आहे.तो विश्वास शिवसेनेने नेहमीच सार्थ ठरवला आहे.त्यामुळे शिवसेनेला जनतेकडे मत मागण्याचा अधिकार आहे.शिवसैनिकांनी अभिमानानं केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवून शिवसेनेच्या प्रचाराची धुरा यशस्वीपणे पेलावी.जनता नक्कीच शिवसेनेला विजयी करेल.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी आहे.मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कपट-कारस्थान अनेक वर्षांपासून चालू आहे.शिवसेना असेपर्यंत ते कदापि शक्य नाही,मात्र मुंबईत विरोधकांची सत्ता आल्यास मुंबई महाराष्ट्रात असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल.महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाच जगण मुश्कील होईल.कोल्हे-लांडगे माजतील आणि मुंबई लुटतील.हे होऊ द्यायचं नसेल तर मुंबईत शिवसेना,शिवसेना आणि शिवसेनाच विजयी झाली पाहिजे आणि बाकीच्या कोल्हया-लांडग्यांना मुंबईकरांनी धूळ चारली पाहिजे.जवळपास प्रत्येक वेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीस शिवसेनेची अग्निपरीक्षा म्हणून पहिले जाते.आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेनेची अग्निपरीक्षा नसून मुंबईतील मराठी जनतेची अग्निपरीक्षा आहे.विरोधक आमिष दाखवतील,खोटा प्रचार करतील मात्र मुंबईकर नक्कीच दाखवून देतील - मुंबई शिवसेनेचीच..!



जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment