(माझा आजचा लेख-:)
विरोधकांनो,सावधान..!
भाजपचे पोपट..!
आगामी वर्षाच्या सुरुवातीसच मुंबई,ठाणे,नाशिक,पुणे,नागपूर,सोलापूर या राज्यातील मोठ्या व महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत.त्यातही मुंबई महानगरपालिका निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे.मुंबई महानगरपालिकेवर सध्या शिवसेनेचा भगवा अभिमानानं,स्वाभिमानान डौलान आणि जबरदस्त तेजान फडकतो आहे.शिवसेनेसोबत छोटा भाऊ असलेला भाजपही मुंबई मनपात सत्तेवर आहे.पृथ्वीतलावरील सर्वात मोठा पक्ष ठरण्याईतके “मिसकॉल” जमा असणाऱ्या छोट्या भाजपला आता मुंबई महानगरपालिका स्वबळावर जिंकण्याचे स्वप्न पडत आहे.अर्थात यात नवल काहीच नाही.भाजपची नीतीच ती आहे.त्यामुळेच भाजपने विधानसभा स्वबळावर लढवली (जिंकली नाही बरं का),तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणूकही भाजपने स्वबळावर लढवली (ही पण नाही जिंकली) इतकेच नव्हे तर अनेक नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकाही भाजपने स्वबळावर लढवल्या (त्या पण नाही जिंकल्या).एकूणच काय तर पृथ्वीतलावरील सर्वात मोठा पक्ष या बिरुदावलीस शोभेल अशी कामगीरी भाजपला स्वबळावर अजिबात करता आली नाहीये.तरीही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचे स्वप्न भाजप पाहत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीस अद्याप ६ महिने आहेत,मात्र तरीही भाजपचे पोपट आत्तापासूनच पोपटपंची करत आहेत.या पोपटांना स्वतःची अशी अक्कल अजिबात नाही.त्यांना दोन मिरच्या द्या आणि वाट्टेल ते पढवा,हे पोपट मुंबईभर त्याची पोपटपंची करत फिरतात.वृत्तवाहिन्यांचे चर्चाकट्टे ही या पोपटांची आवडती जागा आहे.तिथे जाऊन पोपटपंची करत बसणे हा त्यांचा आवडता कार्यक्रम आहे.जसजशी मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ येत जाईल तसतशी या पोपटांची संख्या वाढत जाईल.एवढच नव्हे,एरवी आपल वातानुकूलित ऑफिस सोडून बाहेर न पडणारे नेते आता बाहेर पडतील आणि मुंबईत गल्लोगल्ली फिरायला लागतील.गल्लोगल्ली मुंबई महापालिकेच्या कामकाजावर चर्चासत्रे आयोजित केली जातील.या चर्चासत्रांमधून मुंबई महानगरपालिका कशी भ्रष्ट कारभार करते,मुंबई महापालिका मुंबईच्या दुरवस्थेसाठी कशी जबाबदार आहे हे मांडत असतानाच या सगळ्याला एकटी शिवसेनाच कशी जबाबदार आहे हेदेखील मराठी जनतेच्या मनावर ठसवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल.
मोदी लाटेत बेधुंद आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली भाजप हि रणनीती मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी वापरणार आहे.ज्या शिवसेनेसोबत भाजप सत्तेत आहे त्यांच्याच विरोधात जनतेच्या मनात विष कालवून,शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मुंबई महानगरपालिकेवर आपलं दुरंगी फडक फडकवण्याचा कुटील डाव भाजपने आखलेला असून आगामी काळात त्यासाठी भाजपचे गलिच्छ राजकारण पाहायला मिळणार आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवणूक स्वबळावर जिंकण्याचे दिवास्वप्न पाहत असलेल्या या भाजपचे नेते २०१२ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हातपाय गाळून बसले होते.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसेवाल्यांनी तेंव्हा आरोपांची राळ उडवली होती.मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याची बोंब अख्या मुंबईभर मारण्यात आलेली होती,मात्र तरीही या निवडणुकीत मुंबईकर मराठी जनतेने शिवसेनेलाच विजयी केले होते.याचे श्रेय केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनाच जाते.विरोधकांच्या टिकेमुळे न डगमगता,खोट्या आरोपांमुळे खचून न जाता शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी “करून दाखवलं..!” अस अभिमानानं सांगत शिवसेनेन मुंबईत केलेल्या विकासकामांचा आणि समाजकार्याचा लेखाजोखाच मुंबईकर जनतेसमोर मांडला.जी कामे काही कारणांमुळे राहिलेली होती त्याची जबाबदारी उद्धवसाहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली व ती पूर्ण करण्याचे वचन आणि विश्वास जनतेला दिला.रामदास आठवलेंच्या भीमशक्तीला सोबत घेत उद्धवसाहेबांनी शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीचा नारा दिला.परिणामी या निवडणुकीत मुंबईकरांनी पुन्हा शिवसेनेवर विश्वास दाखवला.
मागील ५ वर्षातही शिवसेनेने मुंबईत विकासकामे केलेली आहेत.तीच विकासकामे जनतेसमोर ठेऊन “करून दाखवलं..!” असं अभिमानानं सांगत शिवसेना जनतेसमोर जाणार आहे आणि मते मागणार आहे.जे करता येईल तेच बोलू आणि जे बोलू ते करून दाखवू अशी शिवसेनेची भूमिका आहे.ती भूमिका घेऊनच शिवसेना या निवडणुकीच्या रणमैदानात उतरेल.जे येतील त्यांना सोबत घेऊन,नाही येणार त्यांच्या शिवाय आणि आडवे येतील त्यांना गाडून शिवसेना मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकून दाखवेल.त्यापासून शिवसेनेला कोणीही अडवू शकत नाही,अजिबात नाही.तेंव्हा विरोधकांनो,सावधान..! गाठ शिवसेनेच्या वाघाशी आहे.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment