(माझा आजचा लेख-:)
देवनारच्या आगीचा धूर..!
भाजपचे गुढग्याला बाशिंग..!
गेल्या काही दिवसात मुंबई डंपिंग ग्राउंडला आग आग लागण्याच्या घटना घडत आहेत.देवनारच्या या आगीतून पडणाऱ्या धुरामुळे पर्यावरण आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.अशा परिस्थितीत या आगीची कारणे आणि त्यावरील उपाययोजना शोधण्याऐवजी भाजप नेते या आगीसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवण्यात दंगले आहेत.राजकीय फायद्यासाठी सोडला जाणारा हा देवनारच्या आगीचा धूर म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे गुढग्याला बांधलेले बाशिंग आहे.राष्ट्र जिंकले,राज्य जिंकले,आता मुंबई जिंकू अशी असे मनसुबे असलेल्या भाजपने देवनारच्या आगीचे अत्यंत घाणेरडे आणि गलिच्छ राजकारण चालवलेले आहे.
भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी देवनार डंपिंग ग्राउंडला लागलेली आग शिवसेनेनेच लावली असा बिनबुडाचा आरोप केला.ही आग शिवसेनेने लावली हे सोमय्यांना कसे समजले? शिवसेना आग लावत असताना ते काय देवनारच्या कचऱ्याच्या ढिगाआड लपून बसलेले होते काय? की देवनारच्या दुर्गंधी हवेत पर्यटनास आलेले होते? सोमय्यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे देऊन भुजबळांच्या विरोधात जशी कायदेशीर तक्रार ते शिवसेनेविरोधात करणार आहेत का? त्यांच्याकडे या गोष्टीचे पुरावे असतील तर नेहेमीप्रमाणे त्यांनी पुरावे देत तक्रार का केली नाही,आणि संध्याकाळी वृत्तवाहिनीवरील चर्चेत त्या पुराव्यांचे कागद का झळकावले नाहीत? या सगळ्या प्रश्नांना सोमय्यांकडे उत्तर नसेलच कारण त्यांनी हे आरोप करताना पुराव्यापेक्षा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवली.शिवसेनेवर असे आरोप व्हायला लागले की मुंबई महानगरपालिका निवडणूक जवळ आली हे पाळण्यातील बाळही सांगेल.
सोमाय्यांच्या साथीला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही भुंकायला लागले.नगरसेवक व्हायची लायकी नसलेले शेलार मोदी लाटेत आमदार झाले आणि आता ते शिवसेनेविरोधात भुंकायला प्रसिध्द झाले आहेत.मागील वर्षी पावसाळ्यात त्यांनी शिवसेनेवर नालेसफाईत घोटाळा केल्याचा आरोप केला.त्याचे काय झाले? आरोप सिध्द व्हायचं तर सोडाच,त्या आरोपातून शिवसेनेला “क्लीन चीट” मिळाली.मुंबईत अतिवृष्टी झाली की समुद्राला भरती आलेल्या काळात समुद्राचे पाणी शहरात घुसते.जमिनीची उंची ही समुद्रसपाटीपासून कमी असल्याने आणि जमिनीचा भाग सखोल असल्याने ते पाणी जमिनीवर साचते.वरून सतत पडणाऱ्या पावसाचे पाणीही वाहत जाऊन सखोल भागात साचते हे सांगायला कुणा तज्ञाची गरज नाही.सामान्य बुद्धीमत्ता असलेली व्यक्ती हे सहज सांगू शकते.इतकी वर्ष शिवसेनेच्या कृपेमुळे मुंबईत सत्तेवर असलेल्या भाजपला आता स्वबळावर मुंबई जिंकण्याचे दिवास्वप्न पडलेले असून त्यात ते पूर्ण आंधळे झालेले आहेत.त्यामुळे आता एकट्या शिवसेनेवर आरोप करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची आणि मते मिळवायची असा भाजपवाल्यांचा डाव आहे.
शिवसेनेने देवनार आग प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी करत भाजपच्या फुग्यातील हवाच काढून घेतलेली आहे.देवनार डंपिंग ग्राउंडचा प्रश्न तीन महिन्यात सोडावा असे शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजपला ठणकावले आहे.केंद्र,राज्य आणि महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत आहे.मुंबई महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक सुद्धा राज्य सरकार म्हणजेच भाजपनेच केली आहे.अशा परिस्थितीत भाजपने देवनार डंपिंग ग्राउंडचा प्रश्न ३ महिन्यात सोडवावा असे रोखठोक मत शिवसेना पक्षप्रमुखांनी मांडले आहे.देवनार डंपिंग ग्राउंडचा प्रश्न अत्यंत जटील होत चालला असून देवनारच्या कचऱ्याच्या आगीवर राजकीय पोळ्या भाजण्याचे घाणेरडे राजकारण केले जात आहे,मात्र हे राजकारण करण्यापेक्षा लोकांना होणाऱ्या त्रासावर आधी इलाज करायला हवी अशी स्पष्ट भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी मांडली आहे.शिवसेनेने आजवर जनतेचे प्रश्न सोडवायचे बाजूला ठेऊन त्याचे घाणेरडे राजकारण केलेले नाही आणि आम्ही ते करणारही नाही.
भाजपला महापालिका निवडणुकीपुढे मुंबईकरांचा पुळका आला आहे.त्यामुळे आंधळे झालेले भाजप नेते आज खाल्ल्या घराचे वासे मोजताना दिसत आहेत.आज देवनार आगीला त्यांनी शिवसेनेला जबाबदार ठरवलेले आहे.अजून दोनच महिन्यात पावसाळा येईल.पुन्हा नालेसफाईचे मढे उकरून त्याची राख मुंबईकरांच्या डोळ्यात फेकली जाईल.मुंबई पालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कदाचित समुद्राला येणाऱ्या-भरती ओहोटी,मुंबईत दिवसेंदिवस कोसळणाऱ्या पावसालाही शिवसेनेलाच जबाबदार ठरवू शकते.शिवसेना जर भ्रष्टाचार करते तर मग भाजप मुंबईचे उपमहापौरपद सोडून सत्तेतून बाहेर का पडत नाही? राज्यात त्याच शिवसेनेचा पाठींबा भाजपला कसा लागतो? केंद्रात तीच शिवसेना सोबत कशी चालते? एकीकडे शिवसेनेच्या कृपाशीर्वादाने सत्ता मिळवायची आणि दुसरीकडे स्वार्थासाठी शिवसेनेवर बिनबुडाचे घाणेरडे आरोप करायचे असे भाजपचे धोरण आहे.“कामापुरता मामा” या म्हणीप्रमाणे भाजप वागत असून ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे.तुमचे असले घाणेरडे खेळ न ओळखता तुमच्या धूळफेकीस बळी पडायला आणि कावळ्याच्या हाती मुंबईचा दरबार द्यायला जनता वेडी नाही हो.पहायचच असेल तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालादिवशी पहा.भगव्याच्या तेजात होरपळून तुमची राख होईल.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment