(माझा आजचा लेख-:)
शिवसेनेचे शिवतेज..!
पुण्यावर भगवाच फडकवा..!
मागील आठवड्यात पुण्यात शिवसेनेचे “शिवतेज” शिबीर दणक्यात पार पडले.पुणे शहर शिवसेनेतर्फे आयोजित सातारा जिल्ह्यातील सोळशी येथे शिवसेना पदाधिकार्यांदच्या तीनदिवसीय “शिवतेज विचारमंथन” शिबिराचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले.यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंनी महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही, कोणाशी होणार या चर्चा सुरू आहेत.चर्चा होऊ द्यात,पण शिवसेना या निवडणुका लढणार आणि जिंकणारच.जे येतील त्यांच्याशी युती करू,अन्यथा आमची युती जनतेशी आहे अशी रोखठोक आणि कणखर भूमिका मांडली.
यावेळी पुढे बोलताना शिवसेना पक्षप्रमुखांनी जे करू तोच शब्द जनतेला द्या,आपल्याला खर्या ची मते हवी आहेत,असे आवाहन करताना कल्याण-डोंबिवली निवडणुकीतील उदाहरण पदाधिकार्यांीपुढे ठेवले.या निवडणुकीत २७ गावांचा प्रश्न आला तेव्हा गावकर्यांकना पाहिजे तसा आणि त्यांच्या मागणीनुसार विकास करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली,परंतु सत्ताधार्यांलनी त्यांना थेट आश्वाासन दिले.त्याचा फटका शिवसेनेला बसला.मी जर या निवडणुकीत खोटं बोललो असतो तर या गावांची मतं मिळवून एकहाती सत्ता शिवसेनेला मिळाली असती, परंतु खोटं बोलून मतं घेतली हा ‘शिक्का’ शिवसेनेला नकोय.आपल्याला मतं कमी मिळाली तरी चालतील,पण खर्या ची मतं हवी.जे बोलू ते खरं करू ही आपली भूमिका हवी अशी स्पष्ट आणि प्रामाणिक भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांनी यावेळी मांडली.
या शिबिरात शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख पुढे म्हणाले की “शिवसेनाप्रमुख म्हणायचे, माझी जीभ माझी तलवार आहे.विचारांचे अंगार त्यातून त्यांनी फुलविले.त्या विचारांचे आपण शिवसैनिक आहोत.विधानसभा निवडणुकीत मोदी लाट होती.तरी ६३ आमदार शिवसेनेचे निवडून आले.राष्ट्रीय पक्षांना जे जमलं नाही ते फक्त शिवसैनिकांनी करून दाखविले.थोडासा आणखी वेळ मिळाला असता तर शिवसेना नंबर १ वर पोहचली असती.गोरगरीब जनतेचा विश्वाचस जपला तर त्यांचे आशीर्वाद नक्कीच मिळतात”.पुण्याला स्मार्ट सिटी करण्याच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की “देशात शंभर शहरे स्मार्ट सिटी करणार, मुंबई-पुण्याप्रमाणे इतर शहरे उभी राहणार अशी अपेक्षा त्यामागे होती. म्हणून या घोषणेला आपण पाठिंबा दिला. पुणे हे अगोदरच स्मार्ट आहे. त्याला आणखी काय स्मार्ट करणार? थोडाफार पैसा टाकणार असे वाटते, परंतु पुणे स्वतःच्या ताकदीवरच पुढे जात आहे.”
यावेळी सातारा जिल्हा पालकमंत्री विजय शिवतरे यांनी “उत्तर प्रदेशात मायावती,पश्चि म बंगालमध्ये ममता बॅनर्जी,तामीळनाडूमध्ये जयललितांचा पक्ष सत्तेवर येऊ शकत असेल तर ५० वर्षे लोकांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरणारी,डोकी फोडून घेणारी शिवसेना का सत्तेवर येऊ शकत नाही? असा सवाल शिवसैनिकांना केला.मोदी लाटेत पुण्यातील सर्व आमदार भाजपचे आले,मात्र आपण ही चूक केली काय अशी भावना आता पुण्यातील सामान्यातील सामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांमध्ये निर्माण झाली आहे असेही ते म्हणाले.तसेच “शिवसेनाच जिंकली पाहिजे” हे ध्येय ठेवा असेही आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.
पुण्यात झालेल्या या तीनदिवसीय निवासी शिबिरामुळे पुण्यातील शिवसैनिकांत नवचैतन्य पसरले असून पुण्यावर भगवा फडकवणारच असा निर्धाय यावेळी शिवसैनिकांनी केलेला आहे.मुंबई-ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत.ठाणे हे शिवसेनाप्रमुखांचे आवडते शहर आहे,मात्र पुणे हे शिवसेनाप्रमुखांचे जन्मस्थान आहे.त्यामुळे आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात शिवसेनेची एकहाती सत्ता आणून शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत.त्यामुळे पुणेकरांनो शिवसेनेला साथ द्या,यंदाच्या वेळी पुण्यावर भगवाच फडकवा.शिवसेना पुणेकरांचा विश्वास सार्थ ठरवेल आणि पुण्याचा विकास अधिक गतिमान होईल.
जय महाराष्ट्र..!
No comments:
Post a Comment