लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
“वाघगर्जना: दिवाळी विशेष
लेखमाला”
दिवस दुसरा – लेख चौथा
कसं आहे उद्धव ठाकरेंच नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
यांच्यावर अगदी सुरुवातीपासूनच प्रचंड टीका झाली. विशेषतः राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासारख्या शिवसेनेच्या गद्दारांनी बाळासाहेबांवर टीका करता
येत नाही म्हणून उद्धव ठाकरेंना टीकेच लक्ष केलं. त्यांच्यावर भलते-सलते आरोप केले.
उद्धवजींचा एकेरी शब्दात उल्लेख करत “हे काय शिवसेनेच नेतृत्व करणारं?” पासून “उद्धव
ठाकरे शिवसेना संपवणार” पर्यंत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका केली
गेली. नेतृत्वाबरोबरच बाळासाहेबांचा मुलगा असल्याने “उद्धव ठाकरेंना सगळं आयतं मिळालं, त्यांचं कर्तृत्व काय?”, “उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांसारखं
बोलता येत नाही, त्यांचं वक्तृत्व मवाळं आहे” अशा प्रचंड टीकेचा
मारा उद्धवजींवर करण्यात आला. हे सगळं पाहात, ऐकत असताना सुद्धा
उद्धव ठाकरे नावाचा “खिलाडी” अगदी शांतपणे आपले राजकीय डावपेच रचण्यात व्यस्त होता.
याचच फलित म्हणून उद्धव ठाकरे आज सगळ्याच टिकाकारांना आणि विरोधकांना अक्षरशः पुरून
उरलेले दिसतात.
उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व कसं
आहे? हे समजून घ्यायचं झाल्यास त्यांच्या कार्याध्यक्ष पदाच्या कारकीर्दीपासून
सुरुवात करायला हवी. तेंव्हापासूनच उद्धवजी शिवसेनेच्या मुख्य नेतृत्वप्रवाहात सामील
झाले. उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं म्हणून राज ठाकरेंनी
शिवसेना सोडली. तसेच नुकतच कॉंग्रेसमध्ये गेलेल्या नारायण राणेंनीसुद्धा टीकेच प्रमुख
लक्ष केलं. राज ठाकरेंबरोबर शिवसेनेतून अनेक नेते/पदाधिकारी बाहेर पडून “मनसे” मध्ये
सामील झाले. बाळासाहेबांसारखं वक्तृत्व, राहणीमान, नकला करून विरोधकांची खिल्ली उडवण्याची शैली असल्याने सुरूवातीला राज ठाकरेंच्या
मागे मोठी सहानुभूती उभी राहिली.त्यांच्या सभांना मोठी गर्दी उसळू लागली व उद्धव ठाकरेंवर
टीका होऊ लागली. राज ठाकरेंच्या मागे संपूर्ण मीडियाची फौज उभी होती. तउद्धव ठाकरेंना
बेदखल करत फक्त उद्धव ठाकरे विरोधकांचीच दखलं घेऊन त्यांनाच प्रसिद्धी द्यायची असा
वसाच जणू सगळ्यांनी घेतला होता.
उद्धव ठाकरे मात्र अगदी शांतपणे अपमान
सहन करत राहिले,पण तो सहन करत असतानाच त्याची नोंद ठेवायलाही
ते विसरले नाहीत. त्यांचा मुळं भर हा संघटना बांधणी, कार्यकर्त्यांची
जोडणी अशा गोष्टींवर होता, व म्हणूनच ते टीकाकारांना फार क्वचितच
प्रत्युत्तर देत असत. उद्धव ठाकरेंना शिवसेनेत असलेल्या त्यांच्यापेक्षा जेष्ठ व बाळासाहेबांसोबत
काम केलेल्या नेत्यांच नेतृत्व करण्याचं आव्हानसुद्धा पेलायचं होत. त्यामुळे उद्धव
ठाकरेंनी पक्षसंघटनेवरची पकड अधिकाधिक मजबूत करण्यावर भर दिला. परिणामी शिवसेना पक्षप्रमुख
पदाची सूत्रे हातात आल्यानंतर त्यांना ती सांभाळण जास्त अवघड गेलं नाही. त्यांनी मीडियासमोर चमकोगिरी
न करता आपलं काम सुरू ठेवलं. त्यांच्याचं नेतृत्वाखाली शिवसेनेचे “न भूतो..” असे १८
खासदार निवडून आले. ”न भविष्यती” असं मुद्दाम म्हटलं नाही कारण शिवसेना यापेक्षाही
पुढे नेण्याच कार्य उद्धवसाहेब करतील याची खात्री आहे. विधानसभा निवडणुकीत सुद्धा उद्धव
ठाकरेंनी मोदींचा चौफेर उधळलेला अश्व एकहाती रोखत ६३ जागा मिळवून दाखवल्या. मुंबई महानगरपालिकेतसुद्धा
संख्याबळ जवळपास सारखं असतांनाही भाजपला माघार घ्यावी लागली ती उद्धव ठाकरेंच्या कुशल
रणनीती आणि डावपेचांमुळेच. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे म्हणजे बाजारात
जाणार्या हत्तीवर भुंकणारेच म्हणावे लागतील. “कुत्रे” शब्द वापरला नाही कारण कुत्र्याचा
अवमान नको.
त्यानंतर प्रश्न विचारला जातो तो
म्हणजे उद्धव ठाकरेंच कर्तृत्व काय? उद्धव ठाकरेंनी २००७ ते २०१७ या कालखंडात तब्बल
३ वेळा मुंबई-ठाण्यावर शिवसेनेचा भगवा फडकावला.त्याच श्रेय विरोधकांनी बाळासाहेबांना
देऊन उद्धवजींच नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न
केला.उद्धव ठाकरे मात्र “मी जो काही आहे, तो केवळ बाळासाहेबांमुळे”
असं म्हणत विजयाच संपूर्ण श्रेय शिवसेनाप्रमुखांना देत राहिले. बाळासाहेबांच्या महानिर्वाणानंतर
झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने लढवलेल्या २० पैकी १८ जागांवर विजय मिळवला
आणि उद्धवजींच नेतृत्व जगासमोर आलं.विरोधक आणि टीकाकारांनी पुन्हा “रडीचा डाव” खेळत
यात उद्धव ठाकरेंच कर्तृत्व नसून मोदी लाटेत शिवसेनेला यश मिळालं अशी टीका केली. उद्धव
ठाकरेंनी मात्र विजयाच सारं श्रेय शिवसैनिकांना दिलं. त्यानंतर आलेल्या विधानसभेत शिवसेनेने
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली स्वबळावर ६३ जागा मिळवून दाखवल्या.मागील वर्षी मुंबई-ठाणे
व इतर अनेक पालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकला. उद्धवजींच कर्तृत्व पुन्हा सिद्ध झालं.
आजही शिवसेना विरोधक उद्धवजींच्या कर्तृत्वावर प्रश्न विचारतात आणि त्यांचं कर्तृत्व
झाकोळून टाकण्याचा प्रयत्न करतात मात्र कोंबड झाकल म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही
याचा त्यांना विसर पडला आहे.
उद्धव ठाकरेंच्या बाबतीत विचारला
जाणारा अजून एक प्रश्न म्हणजे त्यांचं वक्तृत्व काय? त्यांना बोलता येत
नाही,ते खूप मवाळं भाषणं करतात,त्यांच्या
सभांना जल्लोष नसतो,त्यांच्या सभांना गर्दी जमतं नाही,ते आक्रमक वक्तृत्व करू शकत नाहीत अशी टीका त्यांच्यावर आजही होताना दिसते.
महत्वाच म्हणजे ज्यांना कधी वर्गात उभं राहून बोलणं जमलं नाही ते “उद्धव ठाकरेंना बोलता
येतं का?” असे प्रश्न विचारताना दिसतात.उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा
सांगितलं आहे की “मी बाळासाहेबांची “कॉपी” करणारं नाही. मी आहे हा असा आहे, जे करतोय ते प्रामाणिकपणे करतोय.एक तर मला स्वीकारा अथवा मला नाकारा”. उद्धव
ठाकरेंची भाषणशैली बाळासाहेबांसारखी नाही हे ते स्वतः मान्य करतात, पण म्हणून त्यांना बोलता येत नाही असं म्हणणं केवळ मूर्खपणा आहे. उद्धव ठाकरे
संयमी आणि आक्रमक असे दोन्ही गुण असलेले उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांची भाषण शिवसैनिकांमध्ये
जोश-जल्लोष निर्माण करणारी असतात.प्रसंगी विरोधकांची पिसं काढयलाही उद्धव ठाकरे कमी
ठेवत नाहीत.भाषणातून जनतेचे प्रश्न मांडण्यात ते अग्रेसर असतात. त्यांच्या सभांनाही
लाखोंची गर्दी होते. ज्यांच्या बोलण्याला काडीची किंम्मत नाही त्यांनी “उद्धव ठाकरेंना
बोलता येतं का?” असे प्रश्न विचारून स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी
दाखवू नये.
शिवसेनेला सदैव पुढेच नेणारं आणि
शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी असं आहे उद्धव ठाकरेंच नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व.
लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
Uddavji is great leader &speaker go head Saheb jay Maharashtra
ReplyDeleteJay Maharashtra
DeleteJay Maharashtra
ReplyDelete