लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
“वाघगर्जना: दिवाळी विशेष
लेखमाला”
दिवस दुसरा – लेख तिसरा
बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव
ठाकरेंची शिवसेना यांत फरक आहे?
शिवसेनेचं हे ५३ व वर्ष सुरू आहे.
या ५३ वर्षांच्या कलावधीत तब्बल ४६ वर्षे शिवसेनेचं नेतृत्व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब
ठाकरेंनी एकहाती सांभाळलं. २००३ सालापासून शिवसेना कार्याध्यक्ष पदावर असणारे उद्धवजी
ठाकरे हे शिवसेनेचा बराचसा कार्यभार सांभाळत होते, पण शिवसेनेच्या प्रथेनुसार
शिवसेनाप्रमुखांचा शब्दच अंतिम मानला जायचा. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांच महानिर्वाण
झालं. पुढे २३ जानेवारी २०१३ रोजी उद्धवजींची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सर्वानुमते
निवड करण्यात आली. तेंव्हापासून ते आजपर्यंत उद्धवजी एकहाती शिवसेना सांभाळत आहेत.
४६ वर्षे एकच नेता असलेल्या शिवसेनेला गेल्या ५ वर्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब
ठाकरेंच्या रुपानं नवीन नेतृत्व मिळालं. साहजिकच त्यांची तुलना बाळासाहेबांशी होऊ लागली.
टीकाकारांनी आणि विरोधकांनी शिवसेनेवर टीका करताना या तुलनेचा वापर करायला सुरुवात
केली. अगदी आजही अनेक वेळा “ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही” असा टीकेचा सुर
विरोधक अथवा टीकाकार आळवत असतात. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना
यांत फरक आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे
यांनी शिवसेनाप्रमुखांच्या महानिर्वाणानंतर “शिवसेनाप्रमुख एकचं” असं नम्रपणे सांगत शिवसेनाप्रमुख पद न घेता शिवसेना पक्षप्रमुख पदाची जबाबदारी
स्वीकारली. शिवसेनाप्रमुखांसारखी दुसरी व्यक्ति आणि दुसरा नेता होणे नाही असं उद्धवजी
नम्रपणे सांगत असतात. त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे यांची तुलना न करता तत्कालीन शिवसेना आणि सध्याची शिवसेना यातील कार्यपद्धती,ध्येयधोरणे इत्यादींचा अभ्यास केला असता शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना
यांत फरक आहे का ? या प्रश्नाचे उत्तर सहज मिळेल.
यातील पहिला मुद्दा म्हणजे शिवसेनेची
कार्यपद्धती. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेनेत शिवसेनेच्या प्रमुख नेत्याचा “आदेश”
अंतिम मानला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना ४६ वर्षे
मार्गक्रमण करत होती. गेली ५ वर्षे शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा “आदेश”
अंतिम मानला जातो. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना २०१४ च्या विधानसभेला स्वबळावर
लढली. त्यानंतर त्यांचा आदेश अंतिम मानून शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी
“केंद्रीय राज्यमंत्री” पदाला लाथ मारली. एकीकडे मोदींच्या मंत्रिमंडळतील मंत्री होण्यासाठी सुरेश प्रभू यांनी “भाजपा”मध्ये प्रवेश केला तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार स्थापनेसाठी
“भाजपा” “राष्ट्रवादी कॉंग्रेस”ची साथ घेणार का याबद्दल भाजप नेत्यांनी सुस्पष्ट भूमिका
न घेतल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार
राज्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी गेलेले अनिल देसाई दिल्ली विमानातळवरून माघारी फिरले.
यातून शिवसैनिकांची शिवसेना पक्षप्रमुखांबद्दल असलेली निष्ठा आणि शिवसेनेत त्यांचा
आदेश अंतिम आहे हेच अधोरेखित होतं. हीच गोष्ट बाळासाहेब असताना होती.
शिवसेना नेतृत्व म्हणजे ताठ बाणा
आणि कणखरपणा. बाळासाहेबांनी एकदा घेतलेला निर्णय आणि दिलेला शब्द कधीही मागे घेतला
नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनी सुद्धा हाच कणखरपणा वेळीवेळी दाखवून दिला. शिवसेनेचा
“मिशन-१५०” चा नारा असतांनाही युती तोडण्यासाठी भाजपने शिवसेनेला १५० पेक्षा कमी जागा
लढवल्यास युती टिकेल अशी अट घातली. या अटीला भीक न घालता शिवसेना पक्षप्रमुख ठाम राहिले
आणि शिवसेनेचे ६३ वाघ भाजपाच्या छाताडावर भगवा नाचवत विधानसभेत गेले. नोटबंदीसारख्या
मोदींच्या महत्वाकांक्षी आणि प्रथमदर्शनी ऐतिहासिक निर्णयाला विरोध करताना उद्धवजी
ठाकरेंनी जो कणखर बाणा दाखवला तो दाखवणं शरद पवारांसारख्या नेत्यालाही जमलं नाही. विरोधक
सुद्धा संभ्रमात असताना उद्धवजी ठाकरेंनी दुरादृष्टी दाखवत “नोटबंदी जनहिताची नाही”
अशी ठाम भूमिका घेतली. शेवटी तेच सत्य असल्याचे “आरबीआय” सह इतरांच्या अहवालातून जगासमोर
आले.
शिवसेना नेतृत्व म्हणजे स्पष्टवक्तेपणा, जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारं वक्तृत्व आणि लाखोंच्या जाहीर सभा.बाळासाहेब
स्पष्टवक्ते होते. त्यांची भाषांची शैली आक्रमक होती आणि त्यांच्या सभांना लाखोंची
गर्दी उसळत असे. उद्धवजी सुद्धा स्पष्टवक्ते आहेत. त्यामुळेच त्यांनी सरकारमध्ये असताना
सरकारच्या चुकीच्या निर्णयांना असलेला विरोध वेळोवेळी बोलून दाखवला आहे. टीकाकारांनी सडकून टीका करून सुद्धा उद्धवजी सरकारच्या चुकीच्या धोरणांना
अथवा निर्णयांना विरोध करतातच.बाळासाहेबांप्रमाणे आक्रमक वक्तृत्व नसलं तरी शांत,संयमी पण वेळ येताचं विरोधकांना खडे बोल सुनावत रुद्रावतार धारण करणारं वक्तृत्व
उद्धवजींकडे आहे. त्यांच्या सभांनाही लाखोंची गर्दी उसळते. यंदाच्या दसरा मेळाव्याला
उसळलेल्या “विराट शिवसागराचे” ड्रोन कॅमेरात कैद झालेले दृश्य पाहून विरोधकांना धडकी
भरली आहे.
शिवसेना नेतृत्व म्हणजे तमाम हिंदू-मराठी,गोरगरीब,कष्टकरी,शेतकरी जनतेला
आधार. शिवसेना नेतृत्व म्हणजे अन्यायावर वार. बाळासाहेबांनी दिलेला हाच विचार आज उद्धवजी
समर्थपणे पुढे नेत आहेत. आजही शेतकरी कर्जमाफी, मराठीला डावलण, सीमाप्रश्न, राममंदिर अशा प्रश्नांवर शिवसेना “मतपेटीचे
राजकारण” न करता जनहिताची भूमिका घेताना दिसते.
शिवसेना नेतृत्व म्हणजे जे पोटात
तेच ओठात.फसवेगिरी नाही.खोटी आश्वासनं नाही. बाळासाहेबांनी कधीच जनहितासाठी निर्णय
घेताना होणार्या परिणामांचा विचार केला नाही.तसेच त्यांनी जनतेला कधीच खोटी आश्वासने
देऊन जनतेची फसवणूक केली नाही. उद्धव ठाकरेंनीसुद्धा हाच मार्ग अवलंबला. अगदी
विधानसभेत विदर्भातील जवळपास सर्व जागांवर पाणी सोडावे लागू शकते हे माहिती असतांनाही
त्यांनी वेगळा विदर्भ होऊ न देण्याची भूमिका बदलली नाही. तसेच कल्याण-डोंबिवली मधल्या
२७ गावांच्या प्रश्नी सुद्धा त्यांनी मतांसाठी शिवसेनेची भूमिका बदलली नाही.
शिवसेना जशी बाळासाहेब असताना होती
तशीच ती आजही आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी
कोणती संकल्पनाच अस्तीत्वात नाही. बाळासाहेबांनी दिलेला विचार घेऊनच उद्धव ठाकरे शिवसेनेला
पुढे नेत आहेत हेच वरील सर्व मुद्यांवरून स्पष्ट होतं. शिवसेना नेतृत्व म्हणजे केवळ
एवढेच मुद्दे नाहीत मात्र या मुद्द्यांवरुन बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची
शिवसेना यांत फरक नाही हे समजायला हरकत नाही.
लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
जय शिवराय जय शंभुराजे जय बाळासाहेब जय महाराष्ट्र
ReplyDeleteजय महाराष्ट्र
Delete101% बरोबर,खूप छान लेख धन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद, जय महाराष्ट्र
Deleteअतिशय उत्तम लेख आहे. एकच नंबर. जय महाराष्ट्र.
ReplyDeleteधन्यवाद, जय महाराष्ट्र
Delete1ch number vicharahae
ReplyDeleteधन्यवाद, जय महाराष्ट्र
DeleteMast lekh 1 number
ReplyDeleteधन्यवाद, जय महाराष्ट्र
Deleteसुंदर विचार
ReplyDeleteधन्यवाद, जय महाराष्ट्र
Delete