लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
“वाघगर्जना: दिवाळी विशेष
लेखमाला”
दिवस सहावा – लेख बारावा
शिवसेना राममंदिराचं राजकारण करतीये?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
यांनी जुलै महिन्यात “सामना”ला दिलेल्या मुलाखतीत “चलो अयोध्या-चलो काशी” असा नारा
दिला. त्यानंतर हिंदुस्थानात राममंदिराचा मुद्दा पुन्हा मुख्य प्रवाहात आला. मागील
महिन्यात शिवसेनेच्या विराट दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुखांनी “मी 25 नोव्हेंबरला
अयोध्येला जाणार” अशी घोषणा केली. त्यानंतर देशात हिंदुत्वाची लाट पसरली. तमाम हिंदूंच्या
अस्मितेचा प्रश्न असलेल्या राममंदिर निर्माणासाठी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेच साधू-संत-महंतांनी
तसेच सर्वसामान्य जनतेनी स्वागत केलं. विरोधकांनी मात्र “शिवसेना लोकसभा निवडणुकीच्या
तोंडावर मतांसाठी राममंदिराच राजकारण करतीये” असं म्हणत शिवसेनेवर टीका केली. राममंदिराचा
मुद्दा शिवसेनेला आत्ताच का आठवला? असा बालिश सवाल शिवसेना विरोधक आज विचारात आहेत.
शिवसेनेला राममंदिर निवडणुकीच्या
तोंडावर आठवलं हा आरोप धादांत खोटा आहे. कोणीही तो सिद्ध करून दाखवावा हे आमचं विरोधकांना
जाहीर आव्हान आहे. शिवसेना पक्षप्रमुख सातत्याने राममंदिर प्रश्नावर पाठपुरावा करत
आले आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकीधी मतांसाठी भाजप आणि मोदी राममंदिर मुद्दा टाळत होते.
हो-नाही हो-नाही म्हणत लोकसभेच्या जाहीरनाम्यात भाजपने राममंदिर बांधण्याच आश्वासन
दिलं. तमाम हिंदूंनी त्यावर विश्वास ठेवत भाजपला मतदान केलं. त्याच बळावर २०१४ मध्ये
लोकसभेत भाजपचं प्रचंड बहुमतासह सरकार आलं. त्यानंतर भाजपला त्याचा विसर पडला. २०१५
च्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपला राममंदिराची आठवण करून देत “मंदिर वहीं
बनायेंगे,तारीख नहीं बतायेंगे” हे भाजपचं धोरण असल्याची टीका केली होती.
त्यावेळी राज्यसभेत भाजपचं संख्याबळ कमी आहे, उत्तरप्रदेश विधानसभेत
भाजपची सत्ता नाही अशी कारणे देत भाजपने पुन्हा राममंदिर मुद्दा बाजूला ठेवला. २०१७
साली भाजपला उत्तर प्रदेश विधानसभेत ४०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाला आणि विक्रमी
बहुमत मिळालं. सोबतचं भाजपचं राज्यसभेतील संख्याबळ वाढलं. हिंदुत्ववादी
अशी प्रतिमा असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे हिंदूंच्या
मनात “आता तरी राम मंदिर निर्माण सुरू होईल” अशी आशा पल्लवित झाली. तरीही भाजप आणि
कोणत्याही सरकारकडून राममंदिराबाबत काहीच भाष्य अथवा कृती झाली नाही.
अखेर २०१८ उजाडलं. २०१९ च्या लोकसभा
निवडणुकीची चाहूल लागायला सुरुवात झाली. अशा परीस्थितीत सुद्धा भाजपने राममंदिर मुद्दा
बाजूलाच ठेवणं पसंत केलं. २०१९ च्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा प्रभावी ठरतं नाही असं
वाटताचं राममंदिराचा मुद्दा पुढे करून भाजप पुन्हा मतं मागण्यासाठी हिंदुत्ववादी झाला
असता. आजकालचं कॉंग्रेसचं हिंदूंविषयीच ममत्व पाहता कॉंग्रेस सुद्धा हिंदू मतांसाठी
राममंदिराच निर्माण करण्याचं आश्वासन पुढे करून मतं मागू शकली असती. अशा परिस्थितीत
राममंदिराचा मुद्दा केवळ आणि केवळ मतांच्या राजकारणासाठी वापरला गेला असता. हेच राजकारण
थांबवण्यासाठी शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा केवळ उचललाचं नाही तर त्यावर कृती सुद्धा
सुरू केली आहे. कदाचित भाजपचा २०१९ ला मतं मागण्यासाठी राखीव ठेवलेला मुद्दा उद्धव
ठाकरेंनी आधीच निकालात काढल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला असावा आणि म्हणूनच मोदीभक्त
सुद्धा शिवसेनेवर टीका करत आहेत.
भाजपकडे लोकसभेत प्रचंड बहुमत आहे.
राज्यसभेत भाजपच संख्याबळ वाढलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत भाजपकडे पाशवी बहुमत आहे.
मग पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री योगी हे तथाकथित हिंदुत्ववादी कशाची वाट पाहत आहेत? इतक सगळं असताना राममंदिर निर्माण करायचं नसेलं तर मग ते कधी करायचं? नुसतं मतांपुरतं “मंदिर वहीं बनायेंगे” काय कामाचं ? सध्या भाजपला राममंदिर निर्माणचा विसर
पडला आहे. तमाम हिंदू मात्र आजही भाजपकडे सत्ता असल्याने आशेने पाहत आहे. न जाणो पुन्हा
भाजपची सर्वत्र सत्ता येईल न येईल. त्यामुळे राममंदिर निर्माण सुरू करण्याची हीच योग्य
वेळ आहे. याचीच आठवण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख हजारो हिंदूंसह अयोध्येला जातील
आणि राममंदिराची वीट रचतील. तरीही भाजप जागा न झाल्यास शिवसेना राममंदिर निर्माणसाठी
तीव्र आंदोलन करेल आणि राममंदिर निर्माण सुरू करेल. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या
नेतृत्वात बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिकच होते आणि हिंदूप्रजापती उद्धवसाहेब ठाकरेंच्या
नेतृत्वाखाली राममंदिर बांधणारेसुद्धा शिवसैनिकच असतील. हा इतिहास शिवसेना घडवेल व
तो काळाच्या भाळावर सुवर्णअक्षरांत लिहिला जाईल. शिवसेना राममंदिराचं राजकारण करत नाहीये
तर ते संपवतीये.
लेखक : शशांक देशपांडे
(कृपया लेख ब्लॉगच्या लिंक शिवाय कॉपी-पेस्ट करू नये. सर्व लेखांचे सर्व अधिकार लेखकाकडे राखीव आहेत. लेखांचा वापर करताना ब्लॉग लिंक व लेखकाच्या नावासहित वापर करावा. लेखात कोणताही बदल करून लेख प्रकाशित करू नयेत. )
No comments:
Post a Comment