Tuesday, 11 October 2016



"वाघगर्जना"

(विजयादशमी विशेष लेख:)

शिवसेनेचं सीमोल्लंघन..!

चला उठा,अटकेपार भगवा फडकवूया..!

आज विजयादशमी.आज सीमोल्लंघन करण्याचा आणि सोने वाटण्याचा दिवस.त्याचबरोबर शिवसेनेच्या वैभवशाली,गौरवशाली,सांस्कृतिक अन पारंपारिक दसरा मेळाव्याचा हा दिवस.आज शिवसेनेचा ५१ वा सुवर्णमहोत्सवी दसरा मेळावा होतोय.विक्रमी गर्दीच्या या विराट दसरा मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री.उद्धवसाहेब ठाकरे मार्गदर्शन करतील.दसरा मेळाव्यात फोडल्या जाणाऱ्या डरकाळीचा आवाज केवळ  महाराष्ट्र आणि हिंदुस्थानातच नव्हे तर जगभर घुमेल.आज शिवसेना पक्षप्रमुख काय बोलतात? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे.तमाम हिंदू-मराठी जनता आणि शिवसैनिकही साहेबांचे विचार ऐकण्यासाठी आतुर झाला आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवसेना पक्षप्रमुखांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी लाखो शिवसैनिक शिवतीर्थाकडे रवाना झालेले आहेत तर महाराष्ट्राच्या घराघरात दूरदर्शनच्या माध्यमातून साहेबांचं भाषण ऐकलं जाणार आहे.  

१९ जून १९६६ रोजी स्थापना झालेल्या शिवसेनेचं हे सुवर्णमहोत्सवी पन्नासावं वर्ष आहे.सध्या शिवसेना “प्रादेशिक पक्ष” म्हणून नोंदणीकृत असली तरी हिंदुत्वाचा भगवा देशभरात फडकवण्यासाठी शिवसेना कार्यरत आहे.शिवसेना पक्षप्रमुख नेहमी आपल्या भाषणात म्हणतात “होय,शिवसेना रिजनल आहे, पण ओरिजिनल आहे.दुसरे पक्ष फोडून शिवसेना वाढवली गेली नाहीये.”सध्या शिवसेना केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत आहे.२०१९ साली महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवून शिवसेनाप्रमुखांचं स्वप्न पूर्ण करण्याचं कार्य शिवसैनिकांनी हाती घेतलं आहे.हे करत असताना शिवसेनेनी आपली ध्येयधोरणे आणि तत्वं कधीही बदलली नाहीत अथवा त्यांच्याशी तडजोड केली नाही.२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना अजून ३ वर्षांचा अवकाश आहे,मात्र शिवसेनेची महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची असेल तर यासाठी आत्तापासूनच तयारीला लागायला हवं.आता गाफील राहून चालणार नाही.

आगामी वर्षात महाराष्ट्रातील तब्बल १० महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत.२०१९ साली महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवायचा असेल तर या दहाही महानगरपालिकांवर शिवसेनेचीच सत्ता यायला हवी.हे अवघड असेल,पण अशक्य नाही.शिवसेनाप्रमुखांच्या वाघांनी ठरवल तर काय अवघड आहे? हे झालं महाराष्ट्राच.आगामी वर्षात गोवा,उत्तर प्रदेश आणि इतर महत्वाच्या राज्यांतही विधानसभा निवडणुका आहेत.गोवा विधानसभेची निवडणूक शिवसेना संपूर्ण ताकदीने उतरणार आहे.त्याचबरोबर उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना २०० पेक्षा जास्त जागा लढवणार आहे.गोव्यात सुभाष वेलिंगकर यांच्या पक्षाशी युती करून निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे.तसेच ईतर आगामी निवडणुकांत समविचारी पक्षांशी युती करण्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख निर्णय घेतील.त्याचबरोबर युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे स्वतः सर्व महापालिका तसेच गोवा आणि उत्तरप्रदेश निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.हे शिवसेनेचं सीमोल्लंघन ठरणार आहे.

सध्या मुंबई,ठाणे आणि संभाजीनगर अशा महत्वाच्या आणि मोठ्या महापालिकांवर शिवसेनेची सत्ता आहे.तसेच केंद्रात आणि राज्यात शिवसेना सत्तेत सहभागी आहे.आगामी काळात शिवसेनेचा अश्वमेध हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात भगवा फडकवण्यासाठी सुटणार आहे.सध्या केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर हिंदुस्थानला शिवसेनेची गरज आहे.पेशवाईच्या काळात अटकेपार भगवा फडकावून महाराष्ट्राने हिंदुस्थानवर दबदबा निर्माण केला होता.या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे. चला उठा,अटकेपार भगवा फडकवूया..!

जय महाराष्ट्र..! 

No comments:

Post a Comment