Saturday, 20 August 2016



"वाघगर्जना"


(माझा आजचा लेख:)


सण-उत्सव आणि कायदे..! बोल बजरंगबली की जय..!


ऐन गोकुळाष्टमीच्या तोंडावर दहीहंडी उत्सव कसा साजरा करायचा यावरून न्यायालय आणि गोविंदा पथके व मंडळांत चांगलीच जुंपली आहे.अर्थात हे नेहमीचच आहे.हिंदूचा कोणताही सण आला की तो कसा साजरा करायचा हे न्यायालयेच ठरवतात.यंदाही दहीहंडी साजरी करण्याबाबत काही अटी घालून देत न्यायालयाने दहीहंडी कायद्याच्या कचाट्यात अडकवली आहे.दहीहंडी २० फुटावरच बांधली जावी आणि ती फोडण्यासाठी चारच थर लावावे अशा न्यायालयीन नियमावलीमुळे दहीहंडीच्या उत्साहाची हंडी मात्र फुटली आहे.त्यावर या न्यायालयातून त्या न्यायालयात धाव घेऊन दाद मागण चालू आहे.दहीहंडी उत्सवावर न्यायालयाने घातलेली बंदी ही फक्त सुरुवात आहे.त्यानंतर गणेशोत्सव येईल.त्यावेळी गणपतीची मूर्ती किती फुटांची असळी पाहिजे?,मंडप कसा आणि कुठे हवा,डेकोरेशन करताना काय मर्यादा पाळाव्यात? निसर्गाची काळजी कशी घ्यावी? लाउडस्पीकरचा आवाज किती ठेवावा अशी नियमावली न्यायालय तयार करेल आणि सरकार त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर कायदे करेल.नियम मोडल्यास दंड केला जाईल आणि गुन्हेही दाखल केले जातील.

दहीहंडी उत्सवात आधी दहा थरांचा मनोरा रचून हंडी फोडण्याची स्पर्धा असायची.त्यात एक वेगळाच जोश आणि जल्लोष असायचा.थरार असायचा.दहा थर लावण्याच्या नादात झालेले अपघात आणि दुर्दैवाने त्या अपघातामुले अपंग झालेल्या आणि मृत्यु ओढवेल्या गोविंदांचा विचार करून सुरुवातीला न्यायालयाने गोविंदा पथकांना आणि आयोजकांना गोविंदांच्या सुरक्षेबद्दल नियमावली घालून दिली.त्यानंतर गेल्या काही वर्षात ६ ते ७ थरांचा मनोरा रचून हंडी फोडण्याची अट घातली.आता २० फुटांची दहीहंडी बांधून केवळ ४ थर रचून ती फोडण्याचा “कायदा” न्यायालयाने आणला आहे.हे म्हणजे कमाल झाली.पुढील एक-दोन वर्षात न्यायालय गोविंदांनी आपापल्या घरातील पंख्याला दहीहंडी बांधावी आणि उडी मारून ती फोडावी असा कायदा आणेल.त्यानंतर त्यापुढील एक-दोन वर्षात दहीहंडी बांधायची आणि फोडायची काय गरज आहे? असा सवाल उपस्थित करून न्यायालय प्रत्येकांनी हंडीत काला भरावा आणि तो हंडी न फोडता त्यातून काढून खावा असाही कायदा आणेल.

त्याचबरोबर गणेशोत्सवावरही बंधने लादली जातील.नवरात्रीवर कायदे लादले जातील.दसऱ्याला सोने वाटल्याने निसर्गाची हानी होते असे सांगत कदाचित त्यावरही बंदी घातली जाईल.शिवसेनेच्या ऐतिहासिक आणि पारंपारिक दसरा मेळाव्यावरही बंधने लादली जातातच.शिवतीर्थ “शांतता क्षेत्र” असल्याचा हवाला देऊन मेळाव्यातील लाउडस्पीकरच्या आवाजावर ५० डेसिबलची मर्यादा घातली जाते.आगामी काळात कदाचित दसरा मेळाव्यात माईकचा वापर करण्यावरही बंदी घातली जाईल.शिवसेना पक्षप्रमुखांना जे बोलायचे आहे ते त्यांनी युवासेनाप्रमुखांच्या कानात सांगावे.युवासेनाप्रमुखांनी तेच शेजारील खुर्चीत बसलेल्या मनोहर जोशींना,मनोहर जोशींनी त्यांच्याशेजारील खुर्चीत बसेलेल्या दुसऱ्या नेत्याच्या कानात सांगावे.शिवसेना पक्षप्रमुखांचे बोलणे लाखो शिवसैनिकांनी कानोकानीच पसरवावे असा अजब-गजब निकालही न्यायालय देऊ शकते.त्यानंतर दिवाळीत प्रदूषणाच्या नावाखाली फटाक्यांवर बंदी.लग्नाची वरात काढायची तरी वाद्ये वाजवायची नाहीत.सगळीकडे बंदी,बंदी,बंदी.या देशात सगळ्याच गोष्टींना बंदी आहे.हे सगळ का आणि किती काळ सहन करायचं?

नुकाताच हिंदुस्थानचा स्वातंत्रदिन साजरा झाला.त्या दिवशी नेहमीप्रमाणे स्वतंत्र,समता,विविधतेतून एकात्मता आणि ऐक्याच्या पुंग्या सर्वत्र वाजल्या.हिंदुच्या सगळ्याच गोष्टींवर बंधन लादण हे कसलं स्वतंत्र्य? मुसलमानांनी दिवसातून ५ वेळा बेसूर भोंगे वाजवलेले चालतात.ख्रिश्चनांचे धर्म बाटवणे चालते.हिंदूंनी सण साजरा करायला मात्र कायद्याच्या चौकटी.अनधिकृत प्रार्थनास्थळे किंवा धार्मिक स्थळांचा प्रश्न आला की हिंदू धर्माच्या स्थानांची यादीच भलीमोठी केली जाते.त्यात चर्च आणि मशिदी चुकूनच समाविष्ट असतात.कारवाई करताना फक्त मंदिरांवर होते.ही कसली समता? अशाने विविधतेत एकात्मता नाही तर विषमता फोफावत आहे.प्रत्येक धर्माला वेगळे कायदे.त्यात हिंदू धर्माला दुजाभाव.अशाने ऐक्य कसे साधले जाणार? सण-उत्सव आणि कायदे यात समन्वय साधायला हवा.

आम्हाला न्यायव्यवस्था आणि लोकशाहीबद्दल पूर्ण आदर आहे.आम्ही त्यांचा सन्मान करतो,पण आमची गळचेपी किती काळ सहन करायची? कायदे फक्त हिंदूंसाठी आहेत काय? हिंदुंवर जसे निर्बंध लादले जातात आणि कायद्याचा बडगा दाखवला जातो तसा बडगा न्यायालये किंवा सरकार इतर धर्मियांच्या बाबतीत दाखवू शकेल का? सार्वजनिक उत्सवांचे मूळ हे समाजात एकी साधण्याचेच आहे हे विसरून कसं चालेल.अहो,लोकमान्यांनी त्याचसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली.हा इतिहास आहे.तो कसा विसरता येईल? राहिला प्रश्न तो निर्बंधाचा.कसले नियम? कसले कायदे? जोपर्यंत सर्वांना समान कायदा लागू होत नाही आणि हिंदूंना कायदा शिकवला जाईल तोपर्यंत हे कायदे आम्ही पाळणार नाही.आमचा प्रत्येक सण आम्ही उत्साहात आणि जल्लोषात साजरा करणारच.बोल बजरंगबली की जय..!

 जय महाराष्ट्र..! 

No comments:

Post a Comment