Sunday, 11 November 2018

दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेनेकडून 27 ट्रक अन्नधान्य रवाना; उद्धव ठाकरे यांनी दाखवला भगवा झेंडा



महाराष्ट्रात दुष्काळ अक्राळविक्राळ रूप धारण करतोय. या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या घरात शिवसेना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करणार आहे. जरी शिवसेनेने अयोध्येचा मुद्दा घेतला असला तरी मंदिरातला दिवा पेटण्याआधीशेतकऱ्यांच्या घरातली चूल पेटवणं हेसुद्धा कर्तव्य आहेअसे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. अन्नधान्यांनी भरलेल्या 27 ट्रकना उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भगवा झेंडा दाखवला आणि हे ट्रक दुष्काळग्रस्त गावांच्या दिशेने रवाना झाले.


वांद्रे येथील लीलावती रुग्णालयासमोरील मैदानात अन्नधान्यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले 27 ट्रक सज्ज झाले. दुष्काळग्रस्त भागात निघालेले हे ट्रक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत रवाना झाले. दुष्काळाची परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे. या मदतीच्या माध्यमातून त्यांच्या घरातली चूल पेटती राहीलअसे उद्धव ठाकरे म्हणाले.
सौजन्य : सामना  

2 comments:

  1. हे फक्त "शिवसेनाच "करू शकते, धरणात मुतणारे आणि शेतकरी राजाला साला म्हणणारांचे हे काम नाही, याला म्हणतात ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण,आही चुली पेलवणारे आहोत,हे इतरांनी बघावे, आणि समाज बांधवांनी यांच्याकडे नंतर बघावे, जय महाराष्ट्र ! ! !

    ReplyDelete