Saturday, 1 October 2016


"वाघगर्जना"

(माझा आजचा लेख:)

जय जवान..! जय हिंदुस्थान..!!
दहशतवाद संपवावा लागतो तो असाच..!
हिंदुस्थानी लष्कराने पठाणकोट आणि उरी हल्ल्याचा बदला पाकव्याप्त काश्मिरात घुसून पाकड्या दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करत आणि तब्बल ४० पाकड्या दहशतवाद्यांना जहन्नुममध्ये पाठवत घेतला.हिंदुस्थानच्या शूर जवानांच्या धडाकेबाज, महापराक्रमी कामगिरीला आमचा सलाम.हिंदुस्थानी वीरांच्या या कामगिरीमुळे हिंदुस्थानची लष्करी जगाला समजली आहे.विशेषतः पठाणकोट आणि उरी हल्ले करून घडल्यासारखे दाखवत गालातल्या गालात हसणाऱ्या पाकड्यांना हिंदुस्थानच्या या "सर्जिकल स्ट्राईक" मुळे सणसणीत कानाखाली बसली आहे.पाकला बसलेल्या या चपराकेमुळे आलेल्या झिणझिण्या लपवत नवाज शरीफांनी "आम्ही शांत असलो तरी कमजोर नाही" असं सांगत आपली हतबलता आणि दुर्बलता लपवण्याचा प्रयत्न केला.हिंदुस्थानच्या एका "सर्जिकल स्ट्राईक" मुळे पाकमधील वातावरण टाईट झाले आहे.पाकने हिंदुस्थानवर नापाक हल्ले करणे ही काही नवीन गोष्ट नाही.पठाणकोट,उरी अशा हल्ल्यांच्या टपल्या पाकने मारल्या मात्र हिंदुस्थानच्या एकाच प्रतिउत्तराने पाकडे पार हतबल झालेत.

पठाणकोट हल्ल्यापाठोपाठ पाकड्या दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानच्या तब्ब्ल १८ वीरांना वीरमरण आले.या हल्ल्यानंतर हिंदुस्थानात पाकड्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली होती.वारंवार कुरघोड्या आणि कुरापती करणाऱ्या पाकड्यांवर हल्ला करून हिंदुस्थानने बदला घ्यावा अशी तमाम हिंदुस्थानवासीयांची इच्छा होती."किती काळ आपल्या जवानांनी वीरमरण पत्करायच? किती काळ हिंदुस्थान हे पाकडे चाळे सहन करणार? आता बस.खूप झालं.बदला घ्या." असा सूर हिंदुस्थानात उमटत होता.तमाम हिंदुस्थानी जनतेच्या पंतप्रधान मोदींकडून खूप अपेक्षा होत्या.पंतप्रधानांनी देशाचा सूर ओळखत लष्कराला पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करण्याचे आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करण्याचे स्वातंत्र्य दिले.युद्धासाठी सदैव तयार असलेल्या हिंदुस्थानी सैन्याला फक्त आदेशाचीच गरज असते.यावेळी तो मिळाला.आदेश मिळताच हिंदुस्थानी लष्कराने मध्यरात्री थरारक मोहीम राबवत दहशतवाद्यांचा खात्मा केला.यात ४० दहशतवादी,पाकचे ९ जवान ठार झाले .त्याचबरोबर पाकड्या दहाहशतवाद्यांचे तब्ब्ल ७ अड्डे हिंदुस्थानी लष्कराने उध्वस्त केले.

हिंदुस्थानी लष्कराच्या या सडेतोड प्रतिउत्तरामुळे पाकमध्ये एकच खळबळ उडाली आणि हिंदुस्थानात विजयोत्सव,साजरा झाला.हिंदुस्थानी सीमेवर पाकड्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या वीरांचे बलिदान लागले,त्यांना श्रद्धांजली मिळाली अशी भावना सर्वत्र व्यक्त झाली.हल्ल्याची माहिती मिळताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना तात्काळ फोन करून हिंदुस्थानी लष्कराचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन केले.तसेच पाकड्यांनी पुन्हा कुरापत त्यांना कायमचा धडा शिकवा असे खणखणीत केले.शिवसेनेने नेहमीच पाकड्यांना जशास तसे उत्तर शिकवण्याची मागणी केलेली होती. अखेर हिंदुस्थानी लष्कराने घेतलाच.पंतप्रधान मोदींनी लष्कराला आदेश देताच लष्कराने पाकड्यांच्या चिंधड्या उडवल्या.

शिवसेनेने सातत्याने मोदींकडे पाकला धडा शिकवण्याची मागणी केलेली होती.पाकड्यांशी चर्चा करू नये,तसेच कसलेच नयेत आणि पाकड्यांना प्रतिउत्तर द्यावे ही शिवसेनेची भूमिका होती,आहे आणि राहील.दहशतवाद्यांना आणि पाकला धडा शिकवण्याची मागणी काय आहे? "बदला घ्या" हा संपूर्ण देशाचा सूर होता.पंतप्रधानांनी त्याला साद दाद देत हिंदुस्थानी लष्कराला "सर्जिकल स्ट्राईक" करण्याचे आदेश आणि स्वातंत्र्य दिले आणि हिंदुस्थानी जवानांनी पाकड्यांना सीमा ओलांडून,पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून चारली.दहशतवाद संपवावा लागतो तो असाच..! हिंदुस्थानी लष्कर आणि पंतप्रधानांचे "सर्जिकल स्ट्राईक" यशस्वी अभिनंदन.दहशतवाद संपवण्यास हिंदुस्थानी लष्कर समर्थ आहे.त्यामुळे पाकने पुन्हा खोडी युद्धाची भाषा वापरल्यास हिंदुस्थानी जवान काय करू शकतात याचा ट्रेलर सर्वांनीच पाहिला आहे.पाकला खुमखुमी असल्यास संपूर्ण चित्रपट दाखवण्यास हिंदुस्थानी जवान सज्ज आहेत.जय जवान..! जय हिंदुस्थान..!!
जय महाराष्ट्र..!

No comments:

Post a Comment