Friday, 14 June 2019

एकही खासदार नसताना आठवलेंना मंत्रीपद तर तब्बल १८ खासदार असून शिवसेनेला एकच मंत्रिपद असं का? नक्की वाचा:



केंद्रात नरेंद्र मोदी सरकार दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर चर्चा सुरु झाली ती मंत्रिपद आणि खातेवाटपाची. २०१४ प्रमाणेच यंदाही भाजपने संपूर्ण बहुमतासह सत्ता मिळवल्याने मित्रपक्षांच्या वाट्याला नेमकं काय येणार यावर चर्चा सुरु झाल्या. अखेर मोदींच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला आणि त्यात २०१४ प्रमाणेच प्रत्येक मित्रपक्षाला एक मंत्रिपद हे सूत्र भाजपने कायम ठेवले. त्यानुसार शिवसेनेचे अरविंद सावंत कॅबिनेट मंत्री झाले, तर रामदास आठवले यांनाही पुन्हा मंत्रिपद मिळाले. शिवसेनेचे १८ खासदार असल्याने शिवसेना एनडीए मधला भाजपचा सर्वात मोठा पक्ष म्हणून सलग दुसऱ्यांदा समोर आली. साहजिकच त्यामुळे शिवसेनेला एकपेक्षा जास्त मंत्रीपदे मिळतील असं बोललं गेलं मात्र तसं झालं नाही. त्याउलट एकही खासदार लोकसभेत नसलेल्या रामदास आठवलेंच्या रिपाइंला एक मंत्रिपद मिळालं आणि सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली.असं का झालं आपण जाणून घेऊया:

-भाजपच्या सूत्रानुसार सर्व मित्रपक्षांना एक मंत्रिपद मिळालं. यावेळी कोणत्याच पक्षाच्या खासदारांची संख्या लक्षात घेतली गेली नाही.

 -रामदास आठवलेंच्या रिपाईचे लोकसभेत शून्य खासदार आहेत म्हणून त्यांना मंत्रिपद देणं टाळलं असत तर आगामी महाराष्ट्र विधानसभेत भाजपला दलितांची मते मिळण्यास अडचण ठरली असती.

-आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होईल तेंव्हा शिवसेनेला आणखी मंत्रीपदे मिळतील परंतु त्यावेळी रिपाइंला मंत्रिपद मिळणार नाही.

-भाजपला केंद्रात बहुमत मिळालं नसतं तर शिवसेनेला चार केंद्रीय मंत्रीपदे आणि लोकसभा उपाध्यक्ष / लोकसभा अध्यक्ष किंवा थेट उप पंतप्रधान पद द्यायलाही भाजपने कमी केलं नसत मात्र तेंव्हा रिपाइंला मिळालेलं एकमेव मंत्रिपदं सुद्धा दुसऱ्या एखाद्या पाठिंबा देणाऱ्या पक्षाला मिळालं असत.

वरील मुद्द्यांवरून आपल्याला समजू शकेल की "एकही खासदार नसताना आठवलेंना मंत्रीपद तर तब्बल १८ खासदार असून शिवसेनेला एकच मंत्रिपद" या सोशल मीडियावरील चर्चेत काहीही तथ्य नाही. 

Thursday, 13 June 2019

या सहा कामांमुळे आदित्य ठाकरे आले चर्चेत..नक्की वाचा:


युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस.. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांनी केलेली सहा महत्वाची कामे ज्यामुळे आदित्य ठाकरे कायमन चर्चेत राहिले. 



युवती आत्मसंरक्षणमहिला आणि युवतींवर होणारे अन्याय अत्याचार हा जगभरातील ज्वलंत सामाजिक प्रश्न आहे. ज्या वयात मुलींमागे शिट्ट्या मारत फिरणं अनेक तरुणांना महत्वाचं वाटत त्याच वयाच्या आदित्य ठाकरेंनी युवासेनेच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांत जाऊन महाराष्ट्रातील लाखो युवतींना आत्मसंरक्षणाचे धडे देत त्यांना भयमुक्त केले आहे.



प्लास्टिक बंदीमुंबईसारख्या शहरात प्लास्टिक कचऱ्यामुळे पावसाळ्यात पूर येऊन हाहाकार उडतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक नद्यांना पूर येऊन गावंच्या गावं पाण्याखाली जातात. प्लास्टिकमुळे मुक्या प्राण्यांना आणि एकूणच निसर्गाला हानी पोहोचते. या सर्व प्रश्नांवर तोडगा म्हणून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा प्रस्ताव आणून तो कायदा मंजूर करून घेतला. सध्या सरसकट प्लास्टिक बंदी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर घटला आहे. भविष्यातील गंभीर समस्या टाळण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं ठरेल.



बारावी बोर्ड परीक्षा निकाल२०१३ साली बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या निर्णयाचा बसणारा फटका लक्षात घेऊन आदित्य ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली आणि प्रॅक्टिकल थेअरी या दोन्ही परीक्षांचे गुण एकत्रित करून निकाल लावण्याची मागणी केली.त्यामुळे फक्त थेअरी परीक्षेचे गुण ग्राह्य धरल्यास नापास होणारे अनेक विद्यार्थी पास झाले. तसेच २०१३ साली फिजिक्स विषयाची प्रश्नपत्रिका हि प्रमाणाबाहेर कठीण होती त्यावरही युवासेना प्रमुखांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती. बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी MH  CET परीक्षेपूर्वी युवासेना मोफत YS  CET या सराव परीक्षेचे आयोजित करते. शिवाय या परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची तज्ज्ञांच्या व्हिडीओ मार्गदर्शनासहित विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिली जातात.



महापालिका शाळांचे डिजिटल रूपविद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाहायला लागू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम सुरु करण्यात तसेच विद्यार्थ्यांना महापालिकेद्वारे मोफत टॅब देण्यात आदित्य ठाकरेंचा पुढाकार आहे. असं करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिली महानगरपालिका असून याद्वारे शिवसेनेने इतर पालिकांसमोर आदर्श ठेवला आहे.



तरुणांसाठी मैदाने आणि ओपन जिमतरुण वर्गाला शारीरिक तंदुरुस्त राहण्यासाठी शहरांत खेळाची मैदाने आणि ठिकठिकाणी ओपन जिम उभ्या करण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांचीच. आज अंधेरी क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान उभे असून त्यावर आंतरराष्ट्रीय आणि नावाजलेल्या क्लबचे सामने भरवण्यात आदित्य ठाकरेंची मोलाची भूमिका आहे. याशिवाय युवासेनेतर्फे महाविद्यालयीन खेळाडूंसाठी "युवा खेळ समिट" आयोजित केली जाते.



दुष्काळग्रस्तांना मदतदुष्काळ हा महाराष्ट्रासमोरील ऐक अत्यंत भीषण सामाजिक प्रश्न आहे.युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्यांना अन्नधान्य तसेच रोख रक्कम देत शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं कार्य केलं आहे. दुष्काळ प्रश्नावर स्वखर्चाने मदत पुरवणारा शिवसेना एकमेव पक्ष आहे तर थेट बांधावर जाऊन पाहणी करणारे आणि मदत पुरवून दुष्काळाची तीव्रता कमी करणारे आदित्य ठाकरे हे एकमेव युवा नेते आहेत.