Wednesday, 12 December 2018

महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा भाजपला “जोर का झटका”, एका मंत्र्यांसह 5 उमेदवार पराभूत

जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर..

महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा भाजपला “जोर का झटका”, एका मंत्र्यांसह 5 उमेदवार पराभूत





कालच लोकसभेची सेमिफायनल मानल्या जाणार्‍या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यापैकी मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या तीन महत्वाच्या व आत्तापर्यंत भाजपचे गड असलेल्या किंवा मागील वेळी भाजपने पाशवी बहुमतासह जिंकलेल्या राज्यांमध्ये भाजपला कॉंग्रेसने धूळ चारत विजय मिळवला. यामुळे मोदी-शहा जोडगोळीला घाम फुटला. त्याचबरोबर हवेत असणारे मोदीभक्त जमिनीवर आदळले, पण गिरे तो भी टांग उपर या उक्तीप्रमाणे भाजप भक्तांनी हा पराभव मान्य न करता आपली बौद्धिक दिवाळखोरी सुरूच ठेवली. महाराष्ट्रात मोदी भक्त व इतर पक्षाच्या लोकांनी “शिवसेनेला किती मतं मिळाली?” असे प्रश्न विचारात खिजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निकाल पुर्णपणे जाहिर झालेले नव्हते. काल रात्री उशिरा जाहीर झालेल्या अंतिम निकालानुसार शिवसेनेने महाराष्ट्राबाहेरही भाजपला “जोर का झटका” दिलेला आहे. शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे भाजपच्या मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्री महोदयांवर घरी बसण्याची वेळ आली. शिवसेनेच्या मतांमुळे भाजपचे मध्य प्रदेश व राजस्थानात प्रत्येकी 2 व छत्तीसगड राज्यात 1 उमेदवार असे एकूण 5 उमेदवार पराभूत झाले. शिवसेनेने फारशी तयारी न करता या निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यामुळे भाजपचे 5 उमेदवार घरी बसल्याने शिवसेनेची ही कामगिरी बेदखल करता येणार नाही.

काल कॉंग्रेसने मोदी लाट रोखली असं वाटत असलं तरी याची सुरुवात महाराष्ट्रात शिवसेनेने केली हे विसरून चालणार नाही. 2014 साली शिवसेना पक्षप्रमुखांनी स्वबळावर शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणत नरेंद्र मोदींचा अश्वमेध रोखला होता. त्यापूर्वी मोदी लाटेविरोधात लढण्याच आणि विजयी होण्याच धाडस कोणीही दाखवलं नव्हतं. आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त मोदींना आव्हान देणारा, त्यांच्या चुकीच्या अथवा न पटणार्‍या निर्णयांना खुलेआम विरोध करणारा दूसरा नेता या देशात नाही. नोटबंदीला सुद्धा शिवसेनेने ज्या कारणांसाठी विरोध केला त्याच कारणांमुळे काल भाजपचा दारुण पराभव झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी झंझावती “अयोध्या दौरा” करत “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” हा नारा दिला होता. यानंतर देशभरातील हिंदी –इंग्रजी व मराठी माध्यमांनी शिवसेना पक्षप्रमुख हे हिंदुस्थांचे नेते म्हणून पुढे आल्याच म्हटलं होतं. चार राज्यात शिवसेनेने केलेल्या कामगिरीवरून शिवसेनेची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याच दिसतं.

मिझोराम वगळता 4 राज्यांच्या निवडणुकांत शिवसेनेने काही जागांवर स्वबळावर उमेदवार उभे केले. राजस्थानात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी केलेल्या प्रचार दौर्‍याचा अपवाद वगळता शिवसेनेने या निवडणुका फारशी तयारी न करता व ठाकरेंच्या दौर्‍याशिवाय लढवल्या. तरीही या चारही राज्यात अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार 3 ते 5 क्रमांकावर आहेत. तसेच चारही राज्यात शिवसेनेची कामगिरी ही सपा, बसपा, रिपाई (ए), आप आणि इतर स्थानिक पक्षांच्या तुलनेत उत्तम आहे.

शिवसेना उमेदवार विजयी झाले नाहीत अथवा त्यांना प्रचंड मतं मिळाली नाहीत तरीही शिवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे भाजपचे 5 उमेदवार पराभूत झाले. आगामी काळात शिवसेना जर पूर्ण तयारीनिशी काही राज्यात लढली तर भाजपला ते अत्यंत महागात पडू शकत हे यावरून स्पष्ट होतं. शिवसेनेच्या या झटक्यामुळे 2014 लोकसभेनंतर शिवसेनेशी केलेल्या गद्दारीची फळं भाजपला चाखायला मिळाली. “करावे तसे भरावे” या म्हणीचा प्रत्ययच जणू या निवडणुकीतून आला. ज्या 5 मतदारसंघात शिवसेनेमुळे भाजपचा पराभव झाला त्यासंबंधी निकालाचं विश्लेषण व पुरावे खालीलप्रमाणे:    

(लेखन व विश्लेषण आणि आकडेवारी : शशांक देशपांडे)