Friday, 25 December 2015

२५ डिसेंबर - "कृतज्ञता दिन"

विशेष लेख-:

वाघगर्जना

हे सगळ घडलच कस?

मी शून्य आहे..!

फेसबुकवरील माझ्या तमाम बांधवानो आणि भगिनींनो..आज २५ डिसेंबर.आपला “कृतज्ञता” दिन.आजपासून दोन वर्षांपूर्वी आम्ही लेख लिहायला सुरुवात केली होती.२५ डिसेंबर २०१३ च्या दिवशी आमचा पहिला लेख प्रकाशित झाला होता.तेंव्हापासून आजपर्यंत आमच्या प्रत्येक लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.२०१४ साली असणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आणि शिवसेनेची भूमिका सर्वत्र पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही लेख लिहायला सुरुवात केली.सुरुवातीपासूनच लेखांना तुफान प्रतीसाद मिळत गेला.पहिला लेख प्रकाशित झालेल्या दिवसापासून २०१४ साल अगदी जवळ होत.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारार्थ आम्ही प्रचारतोफा डागल्या.डागलेल्या तोफांच्या गोळ्यांमुळे अनेक विरोधक घायाळ झाले.तुम्ही सर्वांनी ते लेख सर्वत्र पोहोचवण्यास मदत केली.त्यामुळेच आमच्या प्रचारकार्यास बळ मिळाल.

२०१४ ची विधानसभा निवडणूक आपण स्वबळावर लढलो.तेंव्हा लिहिलेल्या लेखांना तर आधीपेक्षा दुप्पट प्रतिसाद मिळाला.तुम्ही शिवसैनिकांनी विधानसभा प्रचारार्थ मी लिहिलेल्या लेखांना अक्षरशः डोक्यावर घेतल.२०१४ च्या विधानसभेत आपल्या ६३ जागा स्वबळावर निवडणून आल्या.त्यानंतर मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी मी लेख लिहायला सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून प्रथमच “कृतज्ञता दिन” साजरा केला.त्या दिवशीही तुम्ही माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलात.आम्हीही आपले आभार मानले.त्याच दिवशी आम्ही माझ्या लेखांना “वाघगर्जना” नाव दिल.त्यानंतर काहीच दिवसात आम्ही शिवसेनेच्या २०१४ तील संपूर्ण वाटचालीचा आणि लढाईचा आढावा घेणारा लेख प्रकाशित केला.फेसबुकवर जास्त मोठा मजकूर प्रसिद्ध केला की सहसा तो कोणी वाचत नाही असा एक समज आहे.आमच्या लेखाच्या बाबतीत मात्र याच्या बरोबर विरुद्ध प्रकार घडला.आमचा हा लेख ६ पानांचा असूनही या लेखाला हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या.अनेक प्रतिक्रियाही आल्या आणि कित्येकांनी तो लेख शेअरही केला.मोठ्या मजकुराच्या बाबतीत सोशल मिडीयावर प्रचलित असलेल्या प्रथेला आमच्या या लेखाने तुम्हा सर्वांच्या प्रचंड प्रतिसादामुळे सुरुंग लावला.

त्यानंतर लगेच २०१५ साल उजाडल.याही वर्षी आम्ही दिल्ली विधानसभा,नवी मुंबई,संभाजीनगर महापालिका,वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणूक,वसई-विरार महानगरपालिका तसेच कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका आणि बिहार विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ लेख लिहिले.त्यानंतर या सर्व निवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण करणारे लेख लिहिले.या सर्व लेखांना आपला उत्तम प्रतिसाद लाभला.याव्यतिरिक्त सरकारच्या अनेक निर्णयांवर,सामाजिक प्रश्नांवर शिवसेनेची भूमिका पोहोचवणारे अनेक लेख आम्ही गेल्या वर्षभरात लिहिले.दोन वर्षांपूर्वी जवळपास ५० मित्रांच्या साक्षीने सुरु केलेला हा सगळा लेखप्रपंच आज दसपटीने वाढलेला आहे.आज आमच्या यादीतील मित्रसंख्या ५०० पेक्षाही जास्त आहे.विशेष म्हणजे ही नुसती वाढलेली आकडेवारी नाही तर जोडलेली जिवाभावाची माणस आहेत.

हा सगळा वाढता कारभार लक्षात घेऊन मी आज या वाघगर्जनेस अधिक मोठे आणि व्यापक स्वरूप देत आहे.आज कृतज्ञता दिनाचे औचित्य साधून माझ्या “वाघगर्जना” या ब्लॉगसाईट,वेबसाईट,ट्विटर अकाऊंट,युट्यूब चॅनलचा शुभारंभ होत आहे.या नवीन गोष्टींचे उदघाटन करण्याचा मानही आम्ही आमच्या  चाहत्यांनाच देत आहोत.वाघगर्जना बुलंद होणार असे आम्ही आमच्या “दसरा विशेष” लेखात म्हटलेले होते.आज कृतज्ञता दिनाचे औचित्य साधून या सर्व नवीन गोष्टींचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे.या सर्व नव्या गोष्टींनाही आपल्याकडून गेल्या दोन वर्षांपासून आमच्या लेखांना मिळत असलेल्या प्रतिसादाप्रमाणेच प्रचंड प्रतिसाद मिळेल इतकीच अपेक्षा.

आजच्या दिवशी मागे वळून पाहत असताना या प्रवासात पार केलेले अनेक अडथळे आणि तुडवलेल्या वाटेचे दर्शन घडते.तस पाहिलं तर ही काटेरी वाट आहे जिच्यावर दोन वर्ष प्रवास करण सोडाच पण काही दिवस चालणंही शक्य वाटत नाही,अनेकांना ते जमतही नाही.आम्हालाही या काटेरी वाटेवरून प्रवास करत असताना अनेक काटे टोचले,अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला मात्र तुमच्या प्रचंड प्रतिसादसमोर आणि प्रेमासमोर या सर्व गोष्टी खुज्या ठरल्या.हे सगळ घडलच कस असा प्रश्नही अनेकांच्या मनात असेल.त्याच उत्तर फक्त आणि फक्त तुमचा लाभलेला प्रतिसाद आणि प्रेम हेच आहे.तुमच्या पाठींब्यामुळेच हे शक्य झाल.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि प्रेरणा लाभल्यामुळेच आणि त्या प्रेरणेतून आम्ही करत असलेल्या प्रवासाला आपला प्रतिसादामुळेच हे शक्य झाल.या यशाचे मानकरी तुम्ही आहात,मी शून्य आहे.आपल्या प्रतिसादाचा आणि प्रेमाचा वर्षाव आमच्यावर सदैव होत राहो एवढीच एक इच्छा.तुम्हा सर्वांना कृतज्ञता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,सर्वांचे मनापासून आभार.

जय महाराष्ट्र..!